European Highlights - 7 in Marathi Travel stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | युरोपियन हायलाईट - भाग 7

Featured Books
Categories
Share

युरोपियन हायलाईट - भाग 7

 इटली ..

 इटलीत आम्ही प्रथम व्हेनिसला गेलो .व्हेनिस ही दक्षिण इटलीतील व्हेनेटो प्रांताची राजधानी आहे .हे शहर सांस्कृतिक कला आणि व्यापाराचे एक केंद्र आहे .इथे १०० पेक्षा जास्त बेटे आहेत .“कालव्यांचे शहर “म्हणून व्हेनिस ओळखले जाते .संपूर्ण शहर कालव्यांच्या आसपास वसल्याने इथले वाहतुकीचे मध्यम फक्त बोटी आहेत .लांबलचक बोटीतून शहराचा सर्व व्यवहार आणि इकडे तिकडे येणेजाणे चालते .या बोटींना “गंडोला” असे संबोधले जाते .गंडोला राईड मधुन पर्यटकांना सर्व शहरभर फिरवले जाते .व्हेनिस म्हणले की सर्वप्रथम आठवते ते THE GREAT GAMBLAR चित्रपटातील झीनत आणि अमिताभ वर चित्रित केलेले ..दो लब्जो की है दिल की कहानी हे गाणे ..गंडोला राईड करताना त्यामध्ये हेच गाणे सगळीकडे लावलेले असते .आम्ही पण याच गाण्यावर आमचे हौसेने व्हिडिओ शूट केले .सगळ्या युरोप सारखाच इथेपण एक सेन्ट्रल स्क्वेअर आहे .इथल्या रस्त्यावर बरीच गंमत जंमत चाललेली असते .लोकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे खेळ खेळले जातात .पिझा आणि पास्ताच्या असंख्य व्हरायटी इथे खायला मिळतात .इथून पुढे गेल्यावर बेल टॉवरआहे .एक भलीमोठी घंटा उंचावर टांगली आहे .पुढे सेंट मार्क बेसेलिका आहे इटली ही कॅथलिक लोकांचे श्रद्धास्थान आहे इटलीत आलो की बरेचसे भारतात आल्यासारखे वाटते  इथले रस्ते भारता सारखेच खराब असतात . हवा युरोपच्या तुलनेत उष्ण असते . रस्त्याकडेने इकडेतिकडे कचरा  दिसतो .हा युरोपच असल्याने इथली घरं सुंदरच आहेत पण जरा साधेपणा कडे झुकलेली आणि रंगीत आहेत चकचकीत फिल्मी चित्रातल्या  चित्रातल्या जगातून  वास्तव जगात आलोय अस वाटू लागते इटलीला भारतासारखाच प्राचीन इतिहास आहे.इटलीतली नोकरशाहीमध्ये आपल्यासारखीच भ्रष्ट व्यवस्था आहे .इटालियन खाद्यजीवान भारतासारखेच अगदी चविष्ट आणि प्रसिद्ध आहे.इटालियन समाजव्यवस्था एकत्र कुटुंबाची होती आता बदलतेय  हेही अगदी भारतासारखेच घडतेय   युरोपात जरी ठिकठिकाणी पेड टॉयलेट होती पण इटलीत मात्र फ्री टॉयलेट मिळाली जिथे पेड टॉयलेट होती तिथे मशीनऐवजी पैसे घ्यायला माणसे होती आणि कित्येकदा तितकेच पैसे देऊनही इटलीतली टॉयलेटस जर्मनी स्वित्झर्लंड किंवा इतर युरोपइतकी स्वच्छ नव्हती .युरोपमधे इटली मात्र शॉपिंग साठी सर्वात स्वस्त आहे पिसाच्या कलत्या मनोऱ्याच्या  रस्त्यावरती  भरपूर दुकाने आहेत. अनेक प्रकारच्या वस्तू असतात इथे विकायला . इथली बहुतेक दुकाने बांगलादेशी लोक चालवतात. मोरेक्को आणि निग्रो विक्रेते नुसते हातात वस्तू रचून फिरत असतात. रस्त्यावरची दुकानदारी असल्याने इथं भरपूर बार्गेनिंग चालतं . लेदरच्या बॅग्ज इथेऊत्तम मिळतात. टी शर्ट आणि सोव्हिनियर्स  पण खूप स्वस्त दरात मिळतात.युरोपात शॉपिंग साठी एक्सचेंज करून घेतलेले रुपये संपवायचे इटली हे शेवटचे ठिकाण आहे त्यामुळे सुद्धा टुरिस्ट इकडे भरपूर शॉपिंग करून परदेशी चलन संपवुन टाकतात   नंतर इटली येथील पाडोवा मध्ये पिसाचा झुकता मनोरा पाहायला गेलो पिसाच्या मनोरा पाहिला की हा इतका कलला आहे कधीतरी पडेल  की काय असे वाटते.भरपूर फोटो काढून झाले की त्याच्याकडे पाहून पाहून आपलीच मान वाकडी होऊन दुखून येते . जमीन अस्थिर असल्याने तो बांधल्यापासून असा झुकलेलाच आहे अजून अनेक वर्ष पिसा असाच झुकताच राहणार.पिसा पुर्वी जगातल्या सात आश्चर्यांमधे समाविष्ट होता .  पण त्याला सरळ करायचे प्रयत्न केले गेले त्यामुळे त्याने सात आश्चर्या मधल नाव गमावलं असे म्हणतात .पिसा टॉवरमागे हिरवळीवर ' फॉलन एंजल' शिल्प आहे ते प्रेक्षणीय आहे. इगोर मितोराज नावाच्या पोलिश शिल्पकाराने केलेलं हे शिल्प पिसा मनोराच्या काळाला  समकालीन वाटते.इटलीची राजधानी असलेल्या रोमच्या उंचसखल अशा रस्त्यावरून असंख्य पर्यटक फिरत असतातआम्हीही मजेत फिरत होतो फिरता फिरता परदेशी पर्यटकांचे लव्ह सीन सुद्धा पहायला मिळत होते  या रस्त्यावरून नुसत फिरायला सुखद वाटत होते हवा आल्हाददायक होती आणि गर्दी लहरत्या रंगांची होती .  जवळच्या ट्रॅव्ही फाऊंटनवर तर गर्दीचा महापूर लोटला होता दोन किंवा पाच सेंट हात धरून ते फोटोमध्ये दाखवत मागे फाऊंटनमधे फेकले जात होते. असं केलं की रोममधे परत येता येतं म्हणे असा समज आहे हे फाऊंटन शहरातील मोठे असून जगप्रसिद्ध आहे .अनेक इंग्रजी सिनेमातून हे फाऊंटन दिसते .इथे चविष्ट इटालियन चॉकलेट आईस्क्रीम खायला मिळते.यानंतर रोममधे कलोसियम पाहिले जुन्या ग्लॅडिएटर सिनेमात हे दाखवले आहे . सध्या मात्र याची सगळी पडझड झालेली आहे. इथे एके काळी बेफाम हिंसाचार झाला होता त्याची साक्षीदार ही वास्तू आहे .असे म्हणतात “ALL ROADS LEAD TO ROAM “याचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे जगातल्या प्रत्येक देशाकडून रोमला यायला रस्ता आहे आणि दुसरा अर्थ असा की व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर बॅसिलिका हे कॅथलिक लोकांचे महान श्रद्धास्थान असल्याने जगभरातले सगळ्या रस्त्यावरचे सगळे कॅथलिक  रोम पाहायला उत्सुक असतात . व्हॅटिकन सिटीची भेट म्हणजे युरोप ट्रीपचा शेवटचा आणि प्रेक्षणीय अनुभव होता . व्हॅटिकन सिटीत सेंट पीटर बॅसिलीकात जायला चांगले दीड दोन तास रांगेत उभं राहायला लागले  व्हॅटिकन सिटी बाहेर सिरियन निर्वासित आणि बरेच भिकारी होते .व्हॅटिकन सिटी म्हणजे जगातील सर्वात चिमुकला देश. हे रोमचे हृदय आहे असे म्हणता येईल व्हॅटिकन सिटी मधला भव्य शुभ्र स्क्वेअर डोळ्यांचे पारणे फेडतो जणु येशूनेसर्वांना  आपल्या कवेत घेण्यासाठी हात पसरले आहेतअसं वाटतं .अनेक इंग्रजी चित्रपटात व्हॅटिकन सिटीचा समावेश आहे .सेंट पीटर बॅसिलिका म्हणजे मायकेल अँजेलोचं अप्रतिम काम आहे जे पाहून नवल वाटते याचा प्रत्येक डोम अतिशय देखणा आहे . इथे पिएता शिल्प आहे पिएता याचा अर्थ “सहानुभूती.”“पिएता शिल्प” बघुन मनात काहीतरी हलते हे नक्की   मदर मेरी कृसीफीकेशननंतर येशूचं शव घेऊन बसली आहे असं हे शिल्प आहे अपत्य गमावलेल्या मातेचं हे दुःख  संगमरवरी शिल्पात प्रत्यक्षाचा आभास देते एका अखंड संगमरवरातून हे अप्रतिम शिल्प मायकेल अँजेलोने दोन वर्षापेक्षा कमी काळात घडवलंय. यात दिसणारी मेरी जाणीवपूर्वक तरूण घडवली आहे कारण ती कुमारी आहे हे शिल्प प्रदर्शित केल्यावर लोक थक्क झाले . तोपर्यंत मायकेल अँजेलो इतका प्रसिद्ध झाला नव्हता. हे कुणाचं शिल्प आहे असा सगळ्यांना प्रश्न पडला समकालीन इतर कलाकारांची नावं समोर येत होती इतर कलाकारांना श्रेय मिळते आहे हे बघून रागाने तरातरा जाऊन मायकेल अँजेलोने पिएता शिल्पावर स्वतःची सही कोरली .हे एकमेव शिल्प आहे ज्यावर मायकेल अँजेलोची सही आहे .शिल्प पाहून आपल्याही मनात मदर मेरीचे हे दुखः दाटून येते कित्येक शतके सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी ही शिल्पकला अजरामर ठरली आहे या शिल्पातून देवाच्या अस्तित्वाचा भास होतो   इटलीला या शिल्पामुळे अशा ईश्वरी स्पर्शाचा आशीर्वाद लाभलेला आहे म्हणून Ti Amor Italia   असे म्हणले जाते . म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे इटालिया!  युरोप दर्शन झाल्यावर ही सुंदर टूर संपल्याने दुःखी मनाने  युरोपला अलविदा केले  आणि परतीच्या मुंबई प्रवासासाठी रोमच्या लिओनार्डो दा विन्ची विमानतळाकडे निघालो .हे विमानतळ इटलीतील सर्वात प्रमुख आणि व्यस्त विमानतळ आहे .परतीच्या विमानाच्या गेट पर्यंत जाण्यासाठी इथे पाच मिनिटांचा रेल्वे प्रवास करावा लागतो .तरीही भरपूर मोठे विमानतळ असल्याने एस्केलेटर वरून पण जावे लागते आणि पायी पण चालावे लागते .मुंबईकडे निघालो आणि संपली आमची युरोप टूर