चॉकलेटचे शहर बेल्जियम .
.पॅरिस मधुन बाहेर पडल्यावर आमचे पुढचे ठिकाण होते बेल्जियम.बेल्जियम हा फेमस चित्रकार रेने माग्रिटेचा देश.येथेच हुशार डिटेक्टीव टिनटिन होऊन गेला. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या सर्वापेक्षा बेल्जियम लहान आहे बेल्जियमची जागा मध्यवर्ती असल्याने सगळे लोकं भांडायला मध्यवर्ती पडते म्हणून इथं येत असतBattlefield of Europe म्हणून बेल्जियमची ओळख आहे नेपोलिअन जिथे लढाई हरला ते वाटर्लु इथलंच. अनेक वर्षानंतर बेल्जियम आता प्रगती करतेय .ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी. ब्रुसेल्स फार छान टुमदार शहर आहे. गजबजलेल्या फॅशनेबल पॅरिसमधून या ब्रुसेल्स गावात आल्यावर फार छान आणि शांत वाटते आमच्या जेवणाच्या हॉटेलच्या आसपास सुंदर रेसिडेन्शिअल बंगलो असलेली कॉलनी होती. वीकएंड असल्याने सुट्टीचा दिवस होता आणि लखलखीत सुर्य असल्याने लोकं कडक ऊन सुद्धा एन्जोय करीत होती आपल्यासारख्या अतिउष्ण देशातून आलेल्या लोकांना सूर्यस्पर्शाचं हे वेड समजत नाही पण त्या लोकांना त्याची अपूर्वाई असते ब्रुसेल्स छान नीटनेटकं गाव आहे. जुना परिसर देखणा आहे आणि तो तसाच जपलाय त्या लोकांनी . नव्या हायक्लास चकचकीत बिल्डींग्जना इथं मज्जाव आहे .ब्रुसेल्समध्ये ऑटोमियम नावाची अणूच्या स्ट्रॅक्चरची प्रतिकृती असणारी एक मोठी चकचकीत स्टेनलेस स्टीलची प्रचंड मोठी इमारत उभारली आहे. 1958 साली ती उभारली आहे . ऑटोनियम (Autoneum) ही एक स्विस कंपनी आहे, जी ध्वनी आणि उष्णता व्यवस्थापनासाठी (acoustic and thermal management) वाहन उद्योगासाठी उत्पादने बनवते. जर्मनीमध्ये ऑटोनियमचे उत्पादन प्रकल्प आहेत. ती एक जागतिक स्तरावरची कंपनी आहे आणि तिचे ग्राहक जगभरातील वाहन उत्पादक आहेत. ऑटोनियम ही एक स्विस कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय विंटरटर, स्वित्झर्लंड येथे आहे. इथे एक सुंदर असा भला मोठा बगीचा आहे ज्यातील झाडे कलात्मक प्रकारे वाढवली आहेत .येथून जवळच बृपार्क येथे मिनी युरोप वसवलेले आहे .इथे युरोपमधील प्रत्येक शहरातील महत्वाच्या स्थळांची मिनिएचर प्रतिकृती बनवलेली आहे .युरोपात प्रत्येक शहरात एक चौक असतो. त्याच्या अवतीभवती मोठी आणि जुनी दुकानं असतात. अनेक लोकं एकमेकांना इथेच भेटतात. कॉफी आणि बिअर पितात. गप्पा गोष्टी आणि मजा करतात, कोर्टिंग करतात नाच गाणी पण करतात .असाच ब्रुसेल्सचा ग्रँड स्क्वेअर हा युरोपातील सर्वात सुंदर चौकांपैकी एक आहे. इथं असलेलं विशाल कॅथेड्रल , बिअर म्यूझियम, टाऊन हॉल आणि इतरही इमारती अप्रतीम सुंदर आहेत .दिवसभर इथे जणु लोकांची जत्रा भरलेली असते खाणे पिणे नाचणे गाणे मजा करणे बास इतकेच इथे चालते वर्तमानकाळ जगतात इथले लोक त्यांना ना भूत ना भविष्य..आमच्या पण दोन मैत्रिणींना इथे चालू असलेल्या नाचात भाग घ्यायची संधी मिळाली आणि आम्हाला तो प्रसंग बघायची मजा मिळाली ब्रुसेल्स इथे ग्रँड स्क्वेअर मध्ये एक साधू स्त्रीचा पुतळा आहे या पुतळ्यावर हात फिरवला असता परत इकडे यायची संधी मिळते असे म्हणतात .अनेक प्रवासी इथे गर्दी करून पुतळ्याला हात लावत होते .ग्रँड स्क्वेअर जवळच इथे ब्रुसेल्सचे प्रसिद्ध शिल्प आहे 'मॅनेकेन पीस' हे शिल्प असलेले ठिकाण ब्रुसेल्समधील सर्वात विचित्र आणि प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे . मॅनेकेन पिस हा एक लहान कास्य पुतळा आहे जो खाली असलेल्या कारंज्यात लघवी करत असलेल्या एका लहान मुलाचा आहे. स्थानिक लोक शहरातील कार्यक्रमांसाठी मुलाला सजवतात हा पुतळा ब्रुसेल्सच्या चौकटीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्या लहान मुलाचा फोटो काढण्यासाठी शहरभरातून पर्यटक येतात. या विषयी अनेक दंतकथा आहेत . यातली एक दंतकथा अशी की तेराव्या किंवा चौदाव्या शतकात या गावातल्या एका लहान मुलाने शत्रूच्या छावणीत जाऊन स्फोटकांवर शू करून शत्रू जर्मनीची फसगत केली ,म्हणून स्थानिक लोकांनी त्याचा शू करतानाचा पुतळा उभारला. मग त्याची शू वाहून जायला छोटी पुष्करणीही बांधली . हा शू करणारा लहान मुलगा एरव्ही नग्न असतो पण कधीकधी त्याला कपडेही घालतात. वेगवेगळ्या देशांचे पोषाख त्याला आहेत. त्याला भारतीय पोषाख पण आहे. हा शू करणारा छोटू एकप्रकारे या ब्रुसेल्स गावचा जणु देवच आहे . बेल्जियमची वॅफल्स तर जगप्रसिद्ध आहेत.ही वॅफल्स अक्षरशः शेकडो चवीची आणि प्रकारची मिळतात .गरम गरम वॅफल्स आणि आईस्क्रीम थंड हवेत खायला खुप मजा येते .इथे अनेक प्रकारची चॉकलेटस मिळतात त्यात वाईन भरलेली चॉकलेटस खुप प्रसिध्द आहेत .नंगू शू करणाऱ्या लहान मुलाच्या पुतळ्याच्या शेपमधली चॉकलेटस पण मिळतात.युरोपात मोठ्या प्रसिद्ध दुकानात चायनीज विक्रेत्यांनी आक्रमण केले आहे. बेल्जियम होजिअरी पण सुरेख असते. शुभ्र नाजुक लेसचं काम फार सुंदर होतं यावर पिकासो , व्हिन्सेंट व्हॅन गॉग , गुस्ताव क्लिम्त , जॉन मिरो सगळे कुशन कव्हर्स, चादरी , पोंचो , चष्मा केस , बॅग्ज वर विणले होते. ब्रसेल्स हे चविष्ट चॉकलेट बनविण्यात निष्णात असलेल्या अशा लोकांचे गाव आहे..या टुमदार गावाने मात्र मनावर मोहिनी घातली एवढे नक्की -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------