Lagnantar Hoichal Prem - 10 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 10

The Author
Featured Books
Categories
Share

लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 10

(आहाराच्या हरकतीच्या फस्ट्रेट मिहीर....)
     
     
दोघेही आश्चर्याने दरवाजाकडे पाहत होते... 


दरवाज्यापाशी अथर्व उभा होता , जो त्या दोघांकडे रोखून पाहत होता... अद्वैतने त्याच्याकडे पाहिलं आणि मग अथर्वने त्याला घुरला... हा छोटा मुलगा वारंवार त्याच्या मध्ये येत होता,... आणि यावेळी त्याने रोमान्स च्या मध्ये युन काबाबमधे हाडासारखी अडचण निर्माणकेली होती... जेव्हा अथर्वला जाणवलं कि अद्वैत त्याच्याकडे घुरतोय , तेव्हा त्यानेही त्याला घुरायला सुरुवात केली... 

आता स्वरा सुद्धा अद्वैतकडे रोखून पाहत होती, जणू तिच्या नजरेनेतूनच सांगत होती..."मी तुम्हाला आधीच सांगितलं होत कि कोणी येईल , पण तुम्ही माझं ऐकलं नाही.."


ती त्याच्याकडे रोखून पाहत होती.... अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि गोधळून गेला.... आता परिस्थिती अशी होती कि अथर्व आणि स्वरा दोघेही त्याच्याकडे रोखून पाहत होते.... 



स्वराने त्याच्याकडे एक सखोल नजर टाकली, स्वतःला आरशात पाहून कपडे आणि केस नीट केले आणि अथर्वला उचललं आणि ती तिथून बाहेर निघून गेली.... अद्वैत बेचारा आश्चर्यचकित झाला आणि गोंधळून गेला.... तो त्यांना पाहतच राहिला आणि स्वतःशीच म्हणाला "यांचा अर्थ काय..?माझी बायको आता माझी राहिलीच नाही.."त्याचा चेहरा पडला आणि अथर्वला शिव्या घालत तो सुद्धा पार्टीत पार्ट गेला.... 

हळूहळू सगळे पाहुणे निघून जात होते.... पार्टी संपत आली होती ... कमल म्हणजे आहिरा आपल्याच कामात इतकी गुंतली होती कि तिने अजूनही मिहीरला पाहिलं नव्हतं, पण मिहीरने तिला पाहिलं होत.... 


निघण्याआधी एकदा अद्वैतला भेटला... अद्वैतने त्याला ह्ग करत पार्टीला येण्यासाठी धन्यवाद दिल... मिहीर हलकंसं हसत म्हणाला"तू बोलावलं तर यावंच लागलं..."


अद्वैतही त्याच हसून उत्तर देत होता... इतक्यात इतक्यात आहिराचा आवाज आला"भाई...!वहिनीला काय झालं...?ती का मूड खराब करून फिरते आहे....?"


हे एकटाच अद्वैतने मागे वळून पाहिलं.. मिहीरच लक्षही त्या दिशेने गेलं... आहिराने मिहीरकडे पाहिलं आणि एकदम पॉज झाली... डार्क ब्लु थ्री पीस सूटमध्ये तो खूप च डँशिंग दिसत होता..... नेहमीप्रमाणे ती पुन्हा त्याच्याकडे पाहत राहिली, पापण्या लावययला विसरली, आणि मिहीर तिच्या या गोष्टी मुले चिडला... 


त्याने अद्वैतकडे पाहून सागितलं "मी निघतो..."

अद्वैतने त्याला हात मिळवून होकार दिला आणि मिहीर एका कटाक्षाने आहिराकडे पाहत निघून गेला... मनातल्या मनात त्याने स्वतःशीच म्हटलं"अजबच मुलगी आहे..."


आहिरा त्याच्या जाण्यानंतर भानावर आली... अद्वैतने तिच्याकडे पाहत विचारलं...."तुझ्या वहिनीला काय झालं...?चाल पाहूया..."


दोघे भाऊ बहीण पारत सगळ्यांसोबत आले... थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सगळे आपापल्या खोल्यामध्ये निघून गेले... इतक्या वेळ मस्तीत सगळ्यांनी खूप धमाल केली होती, त्यामुळे आता सगळे थकले होते.... सगळे आपल्या खोल्यात झोपायला गेले..... 

पूर्व यांच्या खोलीत आला आणि पटकन कपडे बदलूनबेडवर बसला... तेव्हाच आहिरा आत आली.... तिने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन त्याच्या जवळ बाजूला बसत म्हणाली"चाल, सगळे फोटो आणि व्हिडीओ पाठवून दे,..."



गर्व ने तिच्याकडे फिल आणि म्हणाला"असं कास देऊ...?बदल्यात मला काय मिळेल ..?मी सगळ्याचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केलेत... त्यामुळे मला काहीतरी मिळायलाच हवं..."


आहिराने चेहरा पडला आणि म्हणाली "काय हवंय तुला आता....?"


गर्व ने दात दाखवले.. आणि म्हणाला"वेळ आल्यावर सांगतो.... आटा मात्र तू मजा कर..."



हे बोलून त्याने सगळे फोटो आणि व्हिडीओ पाठवले .... दोघांनी आपापला इन्स्टा उघडला आणि एक एक फोटो , व्हिडीओ पोस्ट करू लागले... बऱ्याच दिवसांनी घरात असा जश्न चा माहोल होता, जिथे सगळे खूप आनंदी होते.... 

गर्व ने अद्वैत आणि स्वरा याची व्हिडीओ वेगळी एडिट केली आणि त्यावर एक छान गाणं लावून शेअर केली.... आहिराने पाहिलं आणि म्हणाली "हे किती गोड दिसतात ना एकत्र ...?"

गर्व ने हसून उत्तर दिल "हो खार आहे... कदाचित दादा सोबत इतकी छान पूर्वा पण दिसली नाही..."




आहिराने तीच नाव ऐकलं आणि चेहरा वाकवत म्हणाली "तीच नाव घेऊ नकोस ... दादासोबत तिने जे केलं , त्यानंतर ती मला आधीच कमी आवडायची आता तर नफरत च आहे,..."

गर्व त्याच्याकडे पाहून म्हणाला "ठीक आहे.... चाल जा आता आणि जाऊन झोप.... आणि मला पण झोपू दे... तसेही मी खूप मेहनीतीच काम केलं...."


हे बोलून त्याने एक अंगडाई घेतली आणि बेडवर पसरला ... आहिरा त्याच्याककडे फट चेहरा करून तिथून निघून गेली... 


--------------------

पुढच्या दिवंशी सकाळी....

अद्वैत उठला आई नजर स्वरावर स्थिरावली... त्याला काल पार्टीमध्ये तीच त्याला बोलावण आणि जवळीक आठवली.... तो हलकासा हसला. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि हळूच आवाजात त्याला म्हणाला"इतका बेचेन आधी कधी नव्हतो , जेव्हढा आता होऊ लागला आहे.... तुला मिळवल्यावर समजलं कि , मी स्वतःपासून हि परका होऊ लागला आहे..."



तो हसला आणि उठून वोशरूममध्ये गेला... तो अंघोळ करून तयार होईपर्यंत स्वरा अजूनही झोपलेली होती... त्याने तिच्याककडे पाहिलं आणि हसला .... तिला उठवायचं त्याला काहीही मन नव्हतं .. म्हणून तिला न उठवता तो ऑफिसला निघून गेला.... 



इथे आहिरा... सुद्धा ऑफिसला पोहोचली होती.... तिने जाऊन मिहीर ला त्याचा शेड्युल सांगितलं आणि म्हणाली "सर. आज साईट व्हिजिटसाठी जायचं होत... "


मिहीर ने तिच्याकडे पाहिलं आणि अगदी सध्या स्वरात "ओके.."म्हणाला..... 


थोड्यावेळाने ते दोघे साईट व्हिजिटसाठी निघाले... लवकरच ते पोहोचले.... हा अंडर कन्स्ट्रक्शन एरिया होता,जिथे मिहीरच काम सुरु होत... हा एरिया शहराच्या बाहेर होता... पण आज खूप आनंदात दिसत होती... कारण मिहीर तिच्या सोबत होता.... आता ती साईटवर होती, तर ती जितकं वेळ शक्य तितका मिहीरसोबत घालवयच ठरवू न आली होती... मिहीर तिला रिस्पॉन्स देत नसला , तरी तिला त्याचा काही वाटत नव्हतं.. 

सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून मिहीर ने साईडवर काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्या आणि मंद आहिरा कडे पाहून म्हणाला "आणखीन माही बाकी आहे.... का..?"

आहिराने पटकन उत्तर दिल "हो,काही साहित्य आणली त्याची क्वालिटी चाल करायची होती.... वर्कर्स म्हणतायत कि ते वेगळं वाटतंय आणि कदाचित त्यात काही त्रुटी असू शकतात..."


मिहीर ने तीच बोलणं ऐकलं आणि म्हणाला "ठीक आहे, चला..." ते दोघे तिकडे निघाले ,,,



मिहीर कामात बिझी होता आणि आहिरा त्याला बघण्यात .... तीच लक्ष मिहीरच्या हातातल्या घड्याळावर गेलं आणि मग ती स्वतःच्या दुपट्ट्याकडे पाहत काहीतरी प्लॅन करू लागली .... तिच्या डोक्यात बॉलिवूड सिनेमातले सीन्स सुरु झाले, जिथे हिरोच्या घड्याळात हिरोनीचा दुपट्टा अडकतो तिलाही तसेच काहीतरी करायचं होत... 


तिने हळूच स्वतःचा दुपट्टा मिहीरच्या घड्याळावर टाकला, पण तो अडकला नाही.... हे बघून तिचा चेहरा पडला... तिने पुन्हा प्रयत्न केला, पण मिहीर ने चिडून तिच्याकडे पाहिलं.... त्याला काही कळलं नव्हतं कि ती काय करायला बघत होती... 

आहिराने त्याच्याकडे पाहून विचित्र हसली आणि मग दुसऱ्या दिशेला पाहत डोळे फिरवत म्हणत म्हणाली " हे बॉलिवूड वाले सगळं खोत दाखवतात.... दुपट्टा सहज कसा अडकत...?माझा तर जबरदस्तीने हि अडकलात नाही..."


हे विचारत च होती ती पुढे निघाली.... ते दोघे आता पुढे निघून गेले होते,... पण आहिराच्या डोक्यात अजूनही काही खुरापती चालू होत्या.... तीच लक्ष तिथे सांडलेल्या पाणी कडे गेलं... पण तिला हे लक्षात आलं नाही कि एकीकडे तेच पाणी स्टोर करण्यासाठी एक मोठी टक जमिनीमध्ये बनवली ईलि होती.... 


तिने तिथेच पाहिवर मिहीरसमोर फिसळण्याचं नाटकच केलं आणि तिला वाटलं कि मिहीर तिला वाचवेल ... पण म्ह=इहिरीने तिला पकडण्याची तसदीही घेतली नाही .. ती खरोखर पडली.. आणि कमल म्हणजे ती जमिनीवर टॅन्कमध्ये पडली ... ती पूर्णपणे भिजली ... तिचे कपडे पूर्ण खराब झाले होते.... मिहीरने तिला फ्रस्ट्रेशनने पाहिलं.... 

"हि मुलगी मुद्दामच समस्यांना स्वतःच्या गळ्यात अडकवते.."मिहीरने मनातल्या मनात विचार केला... त्याने तिला पाहिलं आणि चिडून बोलला "डोकं खराब आहे का..?बघून चालत येत नाही का..?"

हे बोल्ट त्याने आपला हात तिच्या दिशेने पुढे केला.. आहिराने त्याचा हात पकडला आणि मिहीरने तिला बाहेर काढायला मदत केली.. मिहीरच लक्ष तिच्या कपड्याकडे गेलं, ते भिजून तिच्या शरीराला चिकटलं होते... त्याने आपल्या नजर दुसरीकडे वळवल्या आणि खोल श्वास घेत मनातंच म्हणाला "काय मुलगी आहे...!जर हि अद्वैतची बहीण नसती , तर आला दाखवत असत... काय करतेय हे समजतंय का...?


तो तिच्यावर खूपच चिडलेला होता, पण काही बोलू शकत नव्हता.... त्याने आपला कोट काढला आणि तिच्या खांद्यावर टाकत म्हणाला"हे घाल..."

आहाराने जेव्हा त्याच तिच्याककडे councern पाहिलं , तेव्हा ती लगेच हसली आणि आनंदाने तो कोट घालून घेतला.... 

मिहीरच मन स्वतःकडे डोकं ठेऊन घेरण्यास तयार झालं होत "हि मुलगी खर्च वेडी आहे..."त्याने विचार केला ... अशा परिस्थितीतही ती फक्त या गोष्टीवर खुश होती कि मिहीरने तिला आपला कोट दिला .... 

पण त्या क्षणी त्याने तिला काहीही सांगितलं नाही ... त्याने खोल श्वास घेतला आणि लवकरच आपलं काम पूर्ण करून तिला परत घेऊन गेला... त्याला अजिबात नको होत कि हि मुलगी त्याच्यासाठी अजून काही समस्यांना जन्म देईल...

अहिरा मिहीरसोबतच्या सीटवर बसली होती ... ती कधी तिच्या अंगावर असलेल्या त्या कोर्टकडे पाहत होती तर कधी मिहीरकडे ... मिहीर तिच्या वेंधळ्या वागण्यामुळे इतका frustrated झाला होता कि जर तिने आणखी की वेडसर गोष्ट केली, तर त्याच राग नक्कीच तिच्यावर फटकेल ... पण आहिरायापासून अनभी धन होती आणि त्याच्या एका छोट्याशा कृतीने ती खूप आनंदी झाली होती.... 



मिहीरने तिला घरी सोडलं आणि स्वतः ऑफिससाठी निघून गेला... आहिराने त्याला पाहिलं , मग कोटमध्ये पाहून म्हणाली "तुमचा कोट.."



मिहीरने एक नजर तिला घुरकून पाहिलं मग स्वतःला शांत केट खोल आवाजात बोलला "राहू दे तुला गरज पडेल..."


हे बोलून तो टिक अजून काही ना एकटा... ऑफिससाठी निघून गेला... आहिरा काही समजू शकली नाही... तो नाराज होता.... का...?पण तिला याची काहीही पर्वा नव्हती ... ती तर तिच्या आनंदात खुश होती.... ती हसत हसत गाणं गुणगुणत घराच्या आत गेली... 

क्रमशः...