(बॉसवर क्रश ......)
इकडे पूर्वा आपल्या हॉटेलच्या क्लबमध्ये होती... सगळीकडे लाऊड म्युझिकचा आवाज आणि डिस्को लाईट्स चमकत होत्या... ती एका बाजूंला बार काउंटर बसून दारू पित होती ... तिच्यासोबत आलेले तिचे मित्र डान्स फ्लोअरवर नजॉय करत होते...
तिने एक नजर त्याच्याकडे पहिली आणि परत ड्रिंक करत राहिली . ती एकटीकंच वाटत होती. ड्रिंक करताना तिच्या डोक्यात जुन्या आठवणी येत होत्या, जेव्हा अद्वैत तिच्यासोबत होता.. तिला आठवलं कि, बाहेर जाताना अद्वैत तिची किती काळजी घ्यायचा . तिच्या आवडीनिवडी नेहमी त्याने विचार केला होता. पण कधीतरी पूर्ववाला हे सगळं 'ओवर 'वाटायला लागलं... अद्वैतची काळजी तिला त्याच्या पझेसिव्ह आणि टॉक्सिक स्वभावाचा भाग वाटू लागली होती, जे प्रत्यक्षर स नव्हतं आणि तिच्या याच विचारामुळे ती अद्वैतपासून दूर गेली....
पूर्वा हे सगळं आठवत दारू पिट राहिली. तिने एक खोल श्वास घेतला आणि तिथून उठून आपल्या खोलीत निघून गेली.....
--------------------------
पुढच्या सकाळी ......
स्वराची झोप उघडली आणि डोळे उघडताच तिच्या झोपेचं पार गायब झालं ... कारण होत-ती अद्वैतच्या खूपच जवळ होती... अद्वैतने तिला आपल्या बाहुपाशात अडकवलं होत....
तिने पटकन आपले डोळे झपकावत अद्वैतकडे पाहिलं.... तो खूप शांतपणे तिला पकडून झोपलेला होता.... तिने हळूच आपला हात पुढे केला आणि एका बोटाने अद्वैतच्या जॉ -लाईनवरून फिरवलं . ती मोठ्या मनपूर्वक त्याच्या चेहऱ्याचे फीचर्स न्याहाळत होती... कदाचित तिने त्याला आज पहिल्यांदाच इतक्या बारकाईने पाहिलं होत... तिची बोट अद्वैतच्या पकडला ... स्वरा आश्चर्याने मोठे डोळे करत त्याच्याकडे पाहू लागली... तिला वाटलं होत तो अजून झोपलेला आहे... अद्वैतने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं..... ते तिने पटकन आपले डोळे बंद करून त्याच्या छातीत डोकं लपवळील . अद्वैत तिच्या या कृतीने हसू लागला.... त्याला माहित नव्हतं कि सकाळ सकाळी इतकं गॉड दृश्य बघायला मिळेल...
त्याने स्वराकडे पाहून विचारलं "काय करत होतीस तू....?माहित नाही का, झोपलेल्या ना त्रास देऊ नये....??"
स्वराने हलक्या आवाजात डोकं उचलून त्याच्याकडे पाहिलं आणि पटापट सफाई देत म्हणाली"मी त्रास देत नव्हते . फक्त बघत होते...."
अद्वैत अचानक पलटी घेत तिच्या वर आला ... स्वराने घाबरून मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं अद्वैत तिच्या वर आला झुकलेला होता.. तो अजून जवळ जात हळू आणि गडद आवाजात म्हणाला"आणि काय बघत होतीस....?"
त्याच्या एवढ्या जवळ येण्याने स्वरांचं काळीज धडाडधडायला लागलं आहि हे अद्वैतही जाणवलं....
स्वराने त्याला एवढं जवळ पाहून पटकन आपल्या दोन्ही हातानी चेहरा झाकला.. अद्वैत तिची हि कृती पाहून हसू लागला... त्याने प्रेमाने तिचे हात बाजूला केले आणि तिच्या कपाळावर किस घेतलं... स्वराने त्याला पाहिलं. ती काहीतरी बोलणार होती किंवा अद्वैत काहीतरी म्हणणार होता... त्याच्या हा क्षण पुढे सरकणार होता, तेवढ्यात कोणीतरी जोरजोरात दरवाजा ठोठावला आणि आवाज इतका उतावळा होता कि जणू बाहेर काही मोठं घडलं... आहे...
अद्वैत पटकन तिच्यापासून दूर झाला आणि त्याने दरवाजा उघडला . दरवाजा उघडताच अथर्व आत पळत आणि थेट स्वराच्या छातीत लपला... स्वराने त्याला आपल्या मिठीत घेत विचारलं "एवढ्या लवकर उठलात तुम्ही....?"
अथर्वने फक्त मान हलवत होकार दिला... अद्वैत दोघांना बघत होता... जो अथर्व सग्ल्याप्सून दूर राहायचा , ज्याला कोणी स्पर्श करायलाही परवानगी नसे, तो मुलगा आज स्वराच्या मिठीत शिरलेला होता.... अद्वैतने हसत एक खोल श्वास घेतला आणि त्यांना पाहत म्हणाला "मी ओंघोळीला जातोय... तुम्ही देवर वाहिनीचा खेळ संपवून फ्रेश व्हा.... "
हे बोलून तो आंघोळी ला गेला.... त्याची हि प्रतिक्रिया ऐकून अथर्वने त्याला रागाने बघितलं. पण अद्वैतला याची कल्पनाही नव्हती....
अद्वैत जेव्हा अंघोळ करून आला, तोपर्यंतते दोघे खोलीतून गायब झाले होते. तो हसत म्हणाला "वाटत , या दोघांनी एकमेकात छान साथीदार सापडला आहे...."
तो पटकन तयार झाला आणि बाहेर आला. त्याने दोघांना खेळताना पाहिलं आणि पुन्हा आत जाऊन म्हणाला"आई त्या दोघे मुलांना जेवायला दे... नाहीतर खेळण्यातच गुंग होतील...."
इकडे बानीने अद्वैतला मधेच अडवलं आणि म्हणाली "इथे माझ्या मुळाशिवाय अजून कोण मूळ आहे...?"
तितक्यात गर्व म्हणाला "ओ माय लिटिल आत्या , तुम्हाला समजत नाहीये का...?ते आपल्या पत्नीला म्हणत आहेत . त्याच तर आहे ज्या अथर्वंसोबत खेळत हे..."
बानीने अद्वैतकडे पाहिलं आणि चिडवणाऱ्या टन मध्ये म्हणाली"ओहो ...!बर , हे असं आहे का...?आम्हाला कळलंच नाही....!"
अद्वैतने तिला दुर्लक्ष केलं, जणू काही फरकच पडत नव्हता. इतक्यात सार्थक म्हणाला "तशी परवा एनिवर्सीरी आहे आणि अजूनही काही ठरलं नाहीये..."
अद्वैतने त्याच्यकडे पाहिलं आणि आरामात म्हणाला "काळजीची गरज नाही... सगळं होईल, फक्त माझ्या भावाकडून आणि बहिणीकडून सल्ला घेऊ नका, मी आधीच तुम्हला वॊर्निंग देतोय...."
आहिरा आणि गर्वणे त्याच्या बोलण्यावर त्याला रागाने पाहिलं , तर सरहक त्याच्या बोलण्यावर हसला.... अद्वैत ब्रेकफास्ट करून ऑफिसला निघाला. तो बाहेर निघत असताना पाय आपोआप स्वराच्या दिशेने वळले,ती अजूनही अथर्वंसोबत खेळण्यात मग्न होती ... अद्वैतने तिच्या कडेवर जाऊन तिला स्वतःकडे ओढलं . त्याच्या या अचानक कृतीने स्वरा थेट त्याच्या छातीत धडकली... अद्वैतने तिच्या कंबरेला धरलं आणि स्मितहास्य करत म्हणाला"मी ऑफिसला चाललो आहे.... स्वतःची काळजी घे... ... वेळेत जेवण कंकर आणि जर तुमचं खेळून झालं असेल तर अथर्वला घेऊन दोघेही अंघोळ करून घ्या ..."
स्वराने त्याच बोलणं ऐकून चेहरा वाकवले आणि म्हणाली "तुम्हाला आमच्या खेळण्याचा काय प्रॉब्लम आहे...?"
अथर्वसुद्धा अद्वैतकडे रागाने पाहत होता, कारण तो स्वराला बाहुपाशात घेऊन उभा होता...
अद्वैतने हसून स्वराच्या कपाळावर किस घेतलं आणि म्हणाला "मला काहीच प्रॉब्लम नाहीये .. फक्त वेळेत जेवण करा... बाकी सगळं चालेल..."
हे बोलून अद्वैतने स्वराला सोडलं आणि बाहेर निघून गेला... स्वरा त्याला जाताना फत्तराहिली. इतक्यात अथर्वने तिच्या ड्रेसचा कोपरा ओढला.. स्वरांचं लक्ष त्याच्याकडे गेलं, तर ती हसून म्हणाली "काय झालं...?"
"चाल खेळूया..."अथर्वने प्रेमाने सांगितलं.. स्वराने लगेच त्याच ऐकलं आणि दोघे पुन्हा खेळण्यात रमले ....
-------------------
इकडे आहिरा ऑफिसला पोहचली. तिने आपल्या शेड्युलप्रमाणे मिहिरसाठी सगळं सेट केलं... मिहीर आल्यानंतर तिने त्याला त्याच शेड्युल समजावण्यासाठी केबिनमध्ये गेली आणि नेहमीप्रमाणे आज पुन्हा तीच गोष्ट झाली... तिची नजर मिहीरच्या चेहऱ्यावरून हालत नव्हती . त्याला पाहून तिच्या हृदयात ठोके वाढले होते.... तिला कधीच कळायचं नाही, हे असं का होत पण एक गोष्ट नक्की होती , जर कोणी तिला म्हणाल कि फक्त बसून मिहीरला पाहायचं आहे... तर ती आनंदाने ते... करेल...
मिहीर अत्यन्त शांत स्वभावच होता... कामाशिवाय तो कोणाशी बोल्ट नव्हता... आणि त्याची नजर त्याच्या कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीवर जात नव्हती...
आहिराला पुन्हा स्वतःकडे पाहताना पाहून यावेळी मिहीर चिडला... त्याने तिला कठोर नजरेने पाहून विचारलं "मिस आहिरा ..!तुम्हाला काही काम नाहीये काळ मला पाहण्याशिवाय....?"
त्याच्या थंड आवाजाने ती दाहकली आणि भानावर आली.... घाबरत ती म्हणालाय "सॉरी ..!खूप खूप सॉरी सर.."
मिहीरने तिला थंड नजर टाकत पाहिलं आणि आहिराने मान खाली घालून तिथून निघून गेली... बाहेर येताना तिने स्वतःचा कपाळावर चॅप्टर मारली आणि म्हणाली"मला काय होती...? आणि ते कसे घुरून बघत होते ...!जणू कच्च खाऊनच टाकतील.."
तिने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाली "काहीही होऊ दे, पण कधीही आपल्या बॉसवर क्रश ठेवायचा नाही... तुला तर त्याला नीट पाहायलाही मिळत नाही.. मग असा क्रश ठेवण्याचा फायदा काय,.....?"
हे बोलून तिने चेहरा वाकवला आणि आपल्या डेस्कवर जाऊन पुन्हा कमला लागली ...
तिच्या वाकड्या तोंडाकडे पाहून तिच्या शेजारी बसलेल्या ख़ुशी ने विचारलं "काय झालं तुला...?असा चेहरा का केला आहेस...? बॉस ओरडले का तुला...?"
आहिराने तिच्याकडे पाहून उत्तर दिल"यार,बॉसवर कधीही क्रश ठेवायचा नाही ... त्याला नीट पाहायलाही परवानगी नाही...!"
ख़ुशी तिच्या बोलण्यावर आणि चेहऱ्यावर पाहून हसत म्हणाली"यार....!त्या माणसावर कुठल्याही गोष्टीचा काही परिणाम होत नाही.... तो बर्फ़ा सारखा आहे, ज्याला कोणीही वितळून शकत नाही...."
हे बलून तिने तिला कोपर मारून समोरपाहायला सांगितलं.... आहिराने त्या दिशेने पाहिलं, जिथे एक मुलगी मिहीरच्या केबिनकडे जात होती.... तिने थ्री लेन्थ ड्रेस घातला होता, जो बॉडी फिटेड आणि खूपच रिव्हिलिंग होता....
खुशीनी त्या मुलीकडे पाहून आहिराला सांगितलं"ती आपल्या Advertising Department ची हेड आहे... तीच नाव मलिष्का आहे... आणि ती इथे दर दुसऱ्या दिवशी चक्कर मारते.... तुला माहित आहे का...का....?"
आहिरा तिला पाहून निरागसपणे नाही म्हणत मान हलवली..... तर ख़ुशी म्हणाली"तिला माहीत सर आवडतात ... म्हणून आपल्या आदाने जादू त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही..."
तीच बोलणं ऐकून आहिरा मिहीरच्या केबिनकडे पाहायला लागली... पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु होत.... खुशीने तिला पाहत "डोन्ट वरी यार ...!मिहीर सरसोबत तीच काही जमणार नाही... तशी ऑफीमधल्या कितीतरी मुली त्याच्या लूकची दिवाणी आहेत... पण ते कोणाकडे नजरही टाकत नाहीत...."
तीच बोलणं ऐकून आहिरा मिहीरच्या केबिनकडे पाहायला लागली. पण तिच्या मनात काहीतरी वेगळाच सुरु होत.. खुशीने तिला पाहत विचारलं"डोन्ट वरी यार ...!मिहीर सर सोबात तीच काही जमणार नाही .. तस हि ऑफिसमधल्या कितीतरी मुली त्याच्या लूकची दिवाणी आहेत .... पण ते कोणाकडे नजरही टाकत नाहीत...."
आहिराने तीच ऐकून उत्तर दिल"तुझं बोलणं खार आहे . पण मी काय करू..?माझं मनच ऐकत नाही, याना न पाहता...."
खुशीने तिच्याकडे पाहून हसत म्हटलं"मग पहा कि आरामात...!कोणी मना केलं..?तशी तू त्याची personal Assistant आहेस. त्यामुळे त्याच्या जवळपास राहून तुझं काम आहेच .... अशा परिस्थितीत तू मनसोक्त त्यांना पाहू शकतेस...."
काय खाक मनसोक्त पाहते....!त्यांना पाहण्याच्या नादात मी माझं कामही विसरते.... त्याचा आवाज सुद्धा माझ्या कानापर्यंत फार कठीण जातो.... अशा वेळी मी त्यांना काय पाहणार..?आणि त्यात त्याचा रांग ...!"आहिराने मनात स्वतःशीच म्हटलं...
मग एक खोल श्वास घेत म्हणाली "सोड यार...!काम करूया.. तशी ते आता त्याच्या त्या मलिष्का सोबात बिझी असतील..."
शेवटचं वाक्य हळू आवाजात म्हटलं , जे ख़ुशी ऐकू शकली नाही....
क्रमशः ........