Lagnantar Hoichal Prem - 6 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 6

The Author
Featured Books
Categories
Share

लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 6

(शॉपिंग ......)
      
      
      
      
      
      
      
      
  त्याच वागणं नेहमीसारखं नव्हतं , पण एकमेकांसोबत ते दोघे खूप हसत खेळत होते.... अद्वैत ची नजर स्वराकडे स्थिरावली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू त्याला एक टक बघत राहायला लावत होत... ती आता थोडी नॉर्मल होत होती जे त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती.. तीच जणू रूप काहीस बदलत होत....     
      
      
      
      
  आता पुढे .... 

  अद्वैतने स्वराला आनंदी पाहून खुश झाला... त्याने अथर्व आणि तिला हाक मारत म्हटलं"तुमचं खेळणं नंतर चालू ठेवा, आधी जाऊन फ्रेश होऊन या..."

त्याचा आवाज एकटाच दोघे थांबले आणि त्याच्याकडे बघायला लागले. मग त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पार्ट अद्वैतकडे बघून एकत्र म्हणाले "आम्हाला नाही फ्रेश व्हायचं , आम्हाला अजून खेळायचं आहे...."

हे बोलून ते पुन्हा त्याच्या खेळात गुंतले... अद्वैत त्यांना पाहून आश्चर्यचकित आला.हे काय होत...? ते दोघे खरोखर त्याच्या नेहमीच्या वागणुकीच्या उलट वागत होते... 


तो त्याच्याकडे बघून हसला आणि आत जाताना म्हणाला"ठीक आहे , खेळून पॉट भरलं कि जाऊन फ्रेश व्हा आणि खा...."


स्वराने त्याच बोलणं ऐकून "ओके..."म्हणत पुन्हा अथर्वंसोबत खेळायला सुरुवात केली... अद्वैत जाताना पार्ट वळून एकदा त्याच्याकडे पाहून गटपणे हसला... 

इकडे बानी उठली तर नजर सार्थकवर स्थिरावली आणि तिच्या ओठावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. तो कितीही काही का म्हणत असेना, खर तर त्याच्यासारखा माणूस तिच्या आयुष्यात आनंदाचा खजिना होता.... 


सार्थकशी तिची भेट जवळपास ८ वर्षांपूर्वी एका शोमध्ये झाली होती... त्याला ती नेहमी शांत आणि गंभीर स्वभावाचा माणूस समजत होती, जो तो खऱोखोरच होता... त्याच्या प्रोफेसर असण्याचाही परिणाम असेल. पण त्याला पाहून कोणीही सहज ओळखू शाक्त नव्हतं कि तो एक प्रोफेसर आहे... 

त्याची पर्सनालिटी खूप चार्मिंग होती.... वय साधारणतः ३८ वर्ष असावं , पण तो अजूनही खूप फिट होता.... त्याच वय कुठून हि ३८ वाटत नव्हतं.... 

बानी ने हलकस हसत त्याच्या गालावर किस केलं नि उठून जणार तेवढ्यात सार्थकने तीच मनगट पकडत म्हटलं"माझ्या कडूनही घेत जा..."


हे बोलून त्याने एका झटक्यात बानीला आपल्याकडे ओढलं . बाणी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. त्याच क्षणी सार्थकने तीला करत म्हटलं"अशा करतो कि तुझी तक्रार दूर झाली असेल...."



त्याचबोलणं ऐकून बानी ने चेहरा वाकडा केला.. सार्थकने तिचा चेहरा पाहून हसत म्हटलं "कधी कधी वाटत कि अथर्वच्या जागी एक मुलगी असायला हवी होती मग माझं डबल एन्टरटेनमेन्ट झालं असत तुमच्यामुळे ....."


बानी ने त्याला रागाने पाहत म्हटलं "खबरदार ...!माझ्या मुलाबद्दल काहीही बोललास तर..!"



सार्थक हसत म्हणाल"काळ तोच मुलगा तुला माझ्यासारखा सिरीयस आणि बोर वाटत होता..."


बानीने त्याच बोलणं टाळत म्हटलं"पहा मिस्टर प्रोफेसर ..! तो माझा मुलगा आहे .... मी काहीही बोलू शकते .. आता हटा इथून , मला जायचं आहे..."

हे बोलून तिने सार्थकला ढकललं .... पण तो हल्लाही नाही.... बानी ने त्याला तिरसट नजरेने पहिलं आणि सार्थक हसत तिच्या वाटेतून बाजूला होत म्हणाला"ठीक आहे जा माफ केलं..."


बानी पटकन उठून निघून गेली आणि सार्थक तिला बघून हसू लागला .... 



इकडे आहिरा एका अथकवाद्यांत्र ऑफिसला गेली होती... अद्वैतच्या लग्नामुळे तिने सुट्टी घेतली होती... ती ऑफिसमध्ये पोहोचली , तेव्हा तिच्या कलिगने तिला पाहत म्हटलं"बऱ्याच दिवसांनी दिसली आज.."

आहिराने हसून न येण्याचं कारण सागितलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली ... 

तिच्या कलिगने तिला पाहून म्हटलं "तुझ्या न येण्यामुळे बॉसच शेड्युल खूप डिस्टर्ब् झालं आहे...."


आहिरा गोधुळून तिच्याकडे पाहू लागली . ती म्हणाली "तुझ्या शिवाय बॉल कोणाचं हि बनवलेलं शेड्युल समजत नाही आणि आम्हाला सगळ्यांची त्यांनी खूप खराब अवस्था केली आहे... एक तर तू त्याचा नेचर ओळखतेस, किती खडूस आहेत आणि वरून जेव्हा काही मनासारखं होत नाही, तेव्हा ते जास्तच चिडचिड करतात..."


आहिराने तिच्याकडे पाहून म्हटलं"असं काही नाहीये..."



तिच्या कलिगने हसून म्हटलं "तुला तर कधीच नाही वाटणार, कारण त्यांना तुझं काम परफेक्ट वाटत .... म्हणून च ते कधी तुझ्यावर रागवत नाहीत.."

आहिरा या विषयावर काहीही ना बोलता.. पुन्हा शांतपणे आपल्या कामात गुंतली.... ती इथे as personal assistant काम करत होती... तिला जॉईन होऊन अजून दोनच महिने झाले होते... पण तीच काम बॉसला खूप आवडत होत...  

अद्वैत आणि राम यांनी तिला त्याच्या कंपनीत काम करण्याचा सल्ला दिलंहोतं, पण तिने स्पष्ट नकार दिला .तील ते काही करायचं होत ते स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या मर्जीने करायचं होत... म्हणूनच ती इथे काम करत होती... 



थोड्या वेळाने तिच्या एन्टरकॉमवर फोन वाजला तिने फोन उचलला , तर समोरून एक गंभीर आवाज आला "come into my cabin .."

आहिरा ताबतोब उठून केबिनच्या दिशेने निघाली.... तिने जाऊन केबिनच दार क्नॉक केलं, तर आतून "come in ..."अशी आवाज आली... ती आत गेली आणि समोर बसलेल्या व्यक्तीवर नजर गेली.. जो आपल्या लॅपटॉपमध्ये डोळे खुपसून काम करत होता... आहिरा ने त्याला एक आठवड्यानंतर पाहिलं होत.. अचानक तीच हृदय जोरात धडधडू लागलं... 


हे तिच्यासोबत पहिल्यांदाच होत नव्हतं, ती जेव्हापासून या माणसाला भेटली होती तेव्हापासून हे रोजच होत . ती त्याला पाहण्यात किठेतरी हरवून जात होती.... 


समोर एक साधारण अद्वैतच्या वयाचा माणूस बसलेला होता.... नाव मिहीर शेरावत . त्याची पर्सनॅलिटी खूपच reserved होती. तो फक्त गरजेपुरता बोलायचा . हैत जवळपास ६ फूट २ एच, गोरा रंग, काळ्या खोल डोळ्यामध्ये एक तीव्रता, धारदार नाक , आणि पातळ ओठ . त्याचा बांधा अजूनच आकर्षक दिसायचा आणि त्याच सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तो workaholic होता.... 

मिहीरने डोकं वर करून आहिराकडे पाहिलं , ज एकटक त्याच्याकडे बघत होती.... त्याने तिला पाहून शांतपणे म्हटलं "जर पाहून झालं असेल , तर काम कर..."


त्याचा आवाज ऐकून आहिरा भानावर आली तिने गडबडीत म्हटलं "सॉरी सर ..."


"शेड्युल साग आजच...." मिहीराने त्याच गंभीर स्वरात म्हटलं. आहिरा त्याला त्याच शेड्युल समजवायला लागली.. 

मिहीर त्याच सगळं लक्षपूर्वक ऐकत होता.... आणि आज त्याच्या चेहऱ्यावर गेल्या ७ दिवासारखी झुझालाहत नव्हती. कारण गेले ७ दिवस कसे गेले , हे फक्त त्यालाच माहित होत.... आहिराने शेड्युल सांगून पूर्ण केलं, तेव्हा मिहीरने तिला पाहून म्हटलं "एक ब्लँक कॉफ़ी .." 

आहिराने स्मित करत मान डोलावली आणि बाहेर निघून गेली... मिहीर पुन्हा कोणत्याही भावनेशिवाय आपल्या कामात गुंतला.... 


आहिरा बाहेर आली , तेव्हा तीच कलीग पुन्हा म्हणाली "पाहिलास ना.. आज रागावले नाही.... मी आधीच सांगितलं होत, तुझ्या कामामुळे बॉस शांत राहतात . पण तेच काम कोणी दुसरं केलं आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर ते सगळ्या ऑफिसचं डोकं खाल्ल्यागत चिडचिड करतात..."


आहिराने फक्त खांदे उडवले आणि बॉस्टही ब्लँक कॉफि घ्यायला निघाली .. 


इकडे घरात बाकी सगळे च होते आणि आजच्या गप्पच विषय होता बानी आणि सार्थकचि ऍनीव्हर्सीरी . 


गर्वने सगळ्याकडे पाहत म्हटलं "मी आधीच सांगत होतो मास्क पार्टी ठेऊ मजा येईल.... थीमबेस्ट असायला हवी ..."



शैलवी जीनी तिला पाहिलं आणि म्हणाल्या "नाही, हे बोरिंग वाटेल.... नॉर्मलच ठेवूया ना काहीतरी . हो, तुम्हाला हवं असेल तर ड्रेस कुठल्याही थीम वर आधारित ठेऊ शकत्तो, पण मास्क नाही . चेहरा दिसणारच नाही मग फायदा काय....?"


गर्व त्यांना पाहिलं आणि दात दाखल म्हणाला"थेट सांगा ना मम्मी , तुझा मेकअप दिसणार नाही म्हणून तुला मास्क घालायला नाहीये .."

हे बोलून तो हसू लागला.... शैलवीजींनी त्याच्या डोक्यावर हलकं थप्पड मारलं आणि म्हणाल्या"खूप बोलायला लागलाय तू..."


बानी ने त्यांना पाहिलं आणि मग शांतपणे म्हणाली "एक काम करूया, संध्याकाळी मिटिंग सुरु ठेवू . आत्ता आपण शॉपिंग करूया. संघ्याकाळी अद्वैत राम आणि सिया सगळेच इथेच असतील मग निर्णय घेणं जास्त सोपं होईल..."


शैलवी जीनी तीच ऐकलं आणि म्हणाल्या "हो हे योग्य राहील . मग चला, शॉपिंग जाऊया "

स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या "स्वरा तू पण तयार हो... शॉपिंग ला जाऊया.."

त्यांनी स्वराकडे पाही आणि निरागसतेने म्हणाली"पण दीदी तर इथे नाहीये.."


"तिच्यासाठी आपण काहीतरी आणू. तू काळजी करू नकोस आणि तशी तिला एकटीने शॉपिंग करायची सवय आहे.... तू आमच्यासोबत ये. तशी तू इथे आधी राहिली नाहीये.... त्यामुळे एकटी जाऊ शकणार नाहीस आणि अद्वैत आता कामात व्यस्त असेल. त्यामुळे आम्हीच आहोत . म्हणून आमच्यासोबत.. चल ...."

स्वराने त्याच्या म्हणण्यानुसार मेनी ककेल. ते सगळे लवकरच तयार झाले आणि शॉपिंग निघाले... 


स्वरा खूप आनंदी होती.... इथे येऊन तिला आपली किंमत कळत होती.... या कुटूंबात तीच स्थान आहे.... हे तिला समजलं होत प्रत्येकजन तिला महत्व देत होत... प्रत्येक गोष्टी तिचा दृष्टीकोन आणि मत विचारलं जात होत तिला कुठलीही कमी नव्हती . ती आनंदी होती सगळ्या गोष्टी ची काळजी घेतली जात होती. पहिल्यांदाच तिला जाणवलं होत कि कुटूंब काय असत 







ते सगळं लवकरच शॉपिन्ग मोल मध्ये पोहोचले. शैलवीजींनी बानी कडे पाहिलं आणि म्हणाल्या"मल्ल तुमच्यासारखे कपडे नकोयत . त्यामुळे मी वेगळं पाहते. तुम्ही तुमच्यासाठी पहा..."


हे बोलून त्या निघून गेल्या . स्वराने बानी कडे पाहिलं आणि म्हणाली "आपल्यालाही आईसोबत जावं लागेल..."

बानी ने तिला पाहिलं आणि हसत म्हणाली"ओह मे लिटिल गर्ल ..!तू खर्च खूप भोळी आहेस माझी जान ... वहिनीला साड्या घालायच्या आहेत मला खात्री आहे कि त्या पार्टी तही साडीमध्येच दिसतील पण आपल्याला काहीतरी वेस्टर्न शोधायचं आहे , ज्यामुळे आपल्याला नवर्याच्या डोळ्यासमोर वीज पडेल..."

ती ज्या अंदाजात हे बोलली , ते पाहून स्वरा हसू लागली . बानी ने तिचा हात धरला आणि पुढे गेली... त्या दोघी क्लॉथ सेक्शन मध्ये आल्या आणि कपडे पाहू लागल्या .... 


बानी ने अनेक ड्रेसेस पहिल्या आणि मग सगळ्या स्वराकडे दिल्या आणि म्हन्लाली "जा, एकेक छेज करून ये. मला बघायचं आहे कि कोणती तुझ्यावर जास्त बेस्ट दिसते......"



स्वराने त्या ड्रेसेस पहिल्या. त्या जवळपास ९ ते १० होत्या... तिने आश्चर्याने विचारलं "पण इतक्या सगळ्या का....? जी हवी तीच बघूया ना मी किती वेळ चेंज करत बसू.....?"


बानी ने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली"मी बोलतेय ना, चुपचाप जा आणि चेंज करून ये......."


स्वराने छोटासा चेहरा केला आणि गप्पच सगळ्या ड्रेसेस घेऊन चेंजिग रुममध्ये गेली.... 

बानी तिची हालचाल पाहून हसली. ती जाणून होती कि स्वरा परदेशात राहिले आहे.. अशा परिस्थितीत वेस्टर्न क्लोथ घालुन तिच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती. पण लग्नानंतर तिने स्वराला कधीच वेस्टर्न घालताना पाहिलं नव्हतं.... 


पण कधीकधी स्वराच्या दृष्टीकोनातून विचार केला.. तर तिला थोडं वाईट वाटायचं ती नेहमी विचार करायची कि ती खर्च मनापासून या नात्याला स्वीकारू शकली आहे का...?पण मग अद्वैत आणि स्वराला एकत्र पाहायची आणि त्यांना आनंदी पाहून तिचे सगळे प्रश्न नाहीसे व्हायचे. 


क्रमशः