(अथर्वंची मासूम आणि प्रेमळ वाहिनी ....)
अद्वैत स्वरा सोबत घरी पोहोचला तेव्हा सगळे त्यांना हॉलमध्ये भेटले..... बानीने चिडवत म्हटलं "आमचे newly wed couple फिरून आले आहेत...!"
अद्वैतने तिला रागाने पाहिलं आणि म्हणाला"तुमच्याकडे दुसरं काही काम नाही का माझ्या आयुष्यात कमेंट्री करण्याशिवाय ....?" त्याच बोलणं ऐकून बानीने तोड वाकड केलं...
अद्वैत चे वडील मिस्टर कैशव राणा यांनी अद्वैतकडे पाहत विचारलं"काय सोल्युशन निघालं मग त्याच्या भांडणाचं.....?"
अद्वैत त्याच्या जवळ जाऊन बसत म्हणाला"पप्पा तुम्हाला माहीतच आहे ना...!त्याचा हे दर दुसऱ्या दिवशीचा ड्रॅमा आहे... काळजी करण्याची काहीच गरज नाही.... नेहमीप्रमाणे ते पुन्हा lovey dovey झाले आहेत...."
त्याच बोलणं ऐकून कैशवजी हसले आणि म्हणाले"तस मानावं लागेल तुझ्या मित्राला. जगात असा देवाने असा एकच नमुना बनवून पाठवलं आहे...."
त्याच बोलणं ऐकून शैलविजीम्हणाल्या"मी सुद्धा याच्याशी पूर्ण सहमत आहे.... दर दुसऱ्या दिवशी मुलगा इथे येतो आणि मग अद्वैत त्याला घेऊन जातो तेव्हा सगळं सॉर्ट आऊट झालेलं असत..."
अद्वैतने त्याच्याकडे बघत म्हटलं"त्याच जाऊच दे आई. आयुष्यभर मला त्याला असच सहन करावं लागणार आहे..."
शैलवीजींनी सगळ्यांना जेवायला बोलावलं . सगळेजण एकत्र जेवायला बसले... अद्वैतच लक्ष आजही स्वराकडे होत.... तो मोठ्या एकाग्रतेने पाहत होता कि ती काय खाते आणि काय नाही... जेवण झाल्यावर सगळे आपल्या आपल्या खोलीत गेले ...
----------------------------
स्वरा आज खोलीत जाण्यापासून कचकली होती... काल तिला काहीच कळालं नव्हतं, पण आज ती पूर्ण शुद्धीत होती... अद्वैत आधीच खोलीत गेला होता.. स्वरा जिन्याजवळ उभी राहून विचार करत होती कि वर जावं कि नाही.... तेवढ्यात तिचा फोन वाजला... तिने पाहिलं कि आयुषमानचा कॉल होता.... हलकासा हसत तिने फोन उचलला ....
उलट बाजूने आयुष्मानचा आवाज आला"कशी आहे माझी जण..."
स्वरा प्रेमाने म्हणाली"मी एकदम ठीक आहे.. तू कसा आहेस...?आणि घरातले बाकी कसे आहेत....?"
ती हळूहळू वर जात होती.... पण खोलीत न जाता ती थेट terrace वर गेली . दोन्ही घरामध्ये फार अंतर नव्हतं , पण तरीही ती आपल्या घरात जाऊन शकत नव्हती....
आयुष्मानने तिच्याशी हलक्याफुलक्या गप्पा मारल्या आणि तिने स्वतःची काळजी घ्यावी असं सागितलं. त्याचा कॉल आल्याने तिला बरंच चांगलं वाटत होते... असं नव्हतं कि इथले लोक तिच्याशी वाईट वागत होते.. त्यांनी तिला घरातील सदस्य मानलं होत आणि चांगले वागत होते.... पण तरीही तिला वेळ लागत होता..... ती कोणालाच ओळखत नव्हती आणि ओळख होण्यासाठी थोडा वेळ आवश्यक होता....
ती terrace वर भीतीच्या आधाराने उभी राहून चंद्राकडे पाहत होती.... तेवढ्यात अद्वैतचा आवाज आला "झोपण्याचा मूड नाहीये का आज...?"
स्वराने चकित होऊनत्या दिशेने पाहिलं... अद्वैत तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला"इथे काय करतेय..." झोपण्याची वेळ झाली आहे.... खूप उशीर झाला आहे...."
आवरणे त्याच्याकडे बघत हलक्या आवाजात म्हटलं"आयूचा कॉल होता, त्याच्याशी बोलता बोलता इथे आले..."
अद्वैतने तिचा हात धरत विचारलं" त्याची आठवण येत आहे...?"
स्वराने हलकासा हसत उत्तर दिल"माझ्या आयुष्यात तो एकटाच आहे ज्याच्याशी मी मन मोकळं बोलू शकते..... बाकीच्या कुटूंबायाशी माझं कधी काही जुळल नाही... कदाचित त्याचाही माझ्याशी काही जुळलं नसेल...."
अद्वैत तिच्या प्रत्येक शब्दावर लक्ष देत होता... हेच तर तो जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता कि दोन्ही बहिणीमध्ये एवढं अंत का आहे... स्वराने त्याच्यकडे पाहत विचारलं "तुम्ही अजून झोपला नाहीत..?"
अद्वैतने उत्तर दिल"तुझी वाट पाहत होतो. पण तू आलीच नाहीस..."
त्याच उत्तर ऐकून इ थोडी गड्बली . काल रात्रीच्या आठवणी ताज्या झाल्या... असं नव्हतं कि ती त्याला आपलस करू शकत नव्हती.... जे झालं होत ते ती बदलूही शकत नव्हती.. तो तिचा पती होता... त्याच्यावर तिचीही तितकाच अधिकार होता.. पण तरीही काहीशी झिझक शिल्लक होती, जी अद्वैतने समजत होता....
अद्वैत ने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं . ती थेट त्याच्या छाती वर आदळली. त्याने तिच्या कंबरेला हातानी धरून मृदू आवाजात म्हटलं"काल जे झालं, ते माझ्या मनात नव्हतं स्वरा...!मला तुला आणि या नात्याला वेळ द्यायचा होता, पण माझ्या बहिणीने सगळं बिघडवला . त्यामुळेच कालची रात्र घडली. पण हे असं आहे कि ते कधी ना कधी होणारच होते.... आपण नवरा बायको आहोत ... आपल्या नात्याला फक्त आपला अधिकार आहे.. तुला जितका वेळ हवा आहे घे... पण हे नातं फक्त आपलं आहे.... समजलं....... ?"
स्वराने हलकाच होकारार्थी मान हलवली... अद्वैतची परिपक्वता तिला प्रत्येक क्षणी जणूवून देत होती कि ती योग्य नात्यात आहे... जिथे तिची नाती सुटून गेली होती... तिथे या एका व्यक्तीने तिला घरून ठेवलं होत,...
अद्वैतने तिचा हात धरला आणि तिला खोलीत नेलं... त्याने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला "अजूनही कंफर्टेबल वाटलं नसेल तर मायाकडे शेवटचा पर्याय फक्त तो काऊचं आहे... खोलीच्या जाऊ शकत नाही..."
""मी असं तर नाही म्हटलं..."स्वराने पटकन म्हणाली..
तिला वाटल खरोखर अद्वैत त्या कौचवर झोपणार आहे...
अद्वैत हसत म्हणाला"ओ माय लिटिल वायफी ..!मी त्या काऊचवर झोपणार नाही ... आणि काळजी करू नकोस , तुला मी तिथे अजिबात झोपू देणार नाही. हो, हे होऊ शकत कि आपण तो काऊचं बदलवून मोठा काऊचं ठेवू ... कधी जर राम आणि सियासारखी परिस्थिती आपल्या मध्ये आलीच तर तू मला घरातून तर काढणार नाही, निदान खोलीला काऊचं वर तरी झोपायला मिळेल...."
स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळूच म्हणाली "पण मी तुम्हला का काढेन ...?"
अद्वैत ला तिच्या निरागसपणावर हसूही आलं आणि एक गोडस भावही उमटला . तो तिचा छोटासा चेहरा धरून म्हणाला"माझं पूर्ण बोलणं ऐकायचं ना... मी म्हणलो , जर कधी भविष्यात आपण राम सियासारखं भांडलो किंवा वाद झाला, तर तुला मला घराबाहेर काढायची गरज नाही. मी काऊचं वर शिफ्ट होईन . मग तू घराबाहेर काढायची गरज नाही . मी काऊचं वर शिफ्ट होईल... मग तू आरामात बेडवर झोपू शकतोस. समजलं...?"
हे बोलून त्याने तीच नाक ओठाला.. स्वराने हसत नाक सावरलं. अद्वैत म्हणला"चाल, कपडे बदल आणि झोप."तिने मान डोलावली आणि कपडे बदलायला गेली.. थोड्याच वेळात ते दोघे झोपले होते....
--------------------------
दिवस काहीसे निवांत जात होते.... अद्वैतने पूर्वाच्या जाण्यानंतर एकदाही तिचा उल्लेख केला नव्हता... स्वराला या नात्यात काहीही विचित्र वाटावं असं त्याला काही करायचं नव्हतं आणि त्याला स्वतःलाही हे नातं अजिब बनवायचं नव्हतं.. त्याने पूर्वावर प्रेम केलं होत, म्हणून लग्नापर्यंत गोष्ट पोहोचली होती... पण लग्नाच्या विधीमध्येच पूर्वाने त्याला सोडून जाण त्याला मुळीच पसंत आलं नव्हतं... तेव्हापासून मनात पूर्वाबद्दल एक विचित्र भावना तयार झाली होती .जी मुलगी लग्नमंडपात साथ देऊ शकली नाही, ती आयुष्यभर काय साथ देणार होती...?"
खैर , तो जुन्या गोष्टी सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता.. स्वरासोबत आपलं. आयुष्य योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होता.. हळूहळू स्वराने त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली होती.. जास्त काही ती बोल्ट नव्हती , पण ज्या गोष्टीबद्दल ती विचार करत होती त्यावर तो तीच मत विचारताच ती प्ले विचार नक्की मांडत होती आणि अद्वैतला याच गोष्टीने समाधान मिळत होत किती काहीशी नॉर्मल होत होती... अन्यथा तो तिला फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना ऐकत होता....
पाहता पाहता... २० दिवस कसे गेले, कुणालाही कळलं नाही... या २० दिवसात स्वरा सर्वाशी थोडी फार मोकळी झाली होती... तिचा स्वभाव अद्यापही शांत होता... पण तरीही तिच्या बोलण्यावरून तिच्यात झालेला बदल सर्वानाच जाणवत होता....
एका दिवशी बानीने शैलवी ला म्हटलं "वाहिनी , आज सार्थक येत आहे... आणि यावेळी आम्ही आमची ऍनिव्हर्सरी सुद्धा इथेच साजरी करणार आहोत..."
शैलावविने आनंदात म्हटलं"हे तर फारच छान आहे.. तिशीत इथे क्वचितच थांबता..."
बानीने तोड वाकड करून म्हटलं"त्याला फक्त आपल्या कॉलेजवर प्रेम आहे.. कधी कधी तर मला वाटलं कॉलेज माझी सवत झाली आहे ..."
तीच बोलणं ऐकून शैलवी हसायला लागल्या .......
सायंकाळपर्यँत सार्थक आला होता . सर्व जण हॉलमध्ये च बसले होते आणि गप्पा मार्ट होते... स्वराची नजर सार्थक जवळ बसलेल्या त्या छोट्या मुलाकडे गेली तो संधारणतः पाच वर्षाचा दिसत होता पण चेहऱ्यावर पूर्ण शांतता होती... जिथे या वयातील मूल उधळत असतात , तो मात्र शांत पाने बसला होता....
बानीने आपल्या मुलाकडे पाहिलं नि मग पोळ्या नवर्याकडे , जो आल्यापासून फक्त आपल्या कामाच्या प्रोफेसर गिरीच्या आणि कॉलेजच्या गोष्टीमध्येच गुंतला होता... तिने नाराजीने आपल्या भावाकडे पाहिलं जो मोठ्या आवडीने त्या गोष्टी ऐकत होता.. मग तिने सगळ्याचे हावभाव बघितले आणि शेवटी स्वराकडे पाहिलं , जी एकटक तिच्या मुलाकडे पाहत होती...
बानीने हसत विचारलं"काय पाहत आहेस स्वरा....?"
ती हसत म्हणाली "हा तुमचा बेबी आहे का....?"
बानीने मान डोलावत म्हटलं"हो.."
"त्याच नाव काय आहे...?"स्वराने पुढचा प्रश्न विचारला. तेव्हाच तो छोटा मुलगा म्हणाला"माझं नाव अथर्व आहे . तुम्ही माझ्या वाहिनी आहेत..."
स्वराने डोळे पाणावून त्याच्याकडे पाहिलं.... काय...? तो छोटा मुलगा तिचा दीर होता....?तीच मन त्याला जवळ घेरण्यासाठी आतुर झालं . तिने त्याच्याकडे पाहून प्रेमाने विचारलं"मी तुला उचलू का....?"
खर तर अथर्व अतिशय शांत आणि गंभीर स्वभावाचा मुलगा होता.. पण स्वराची निरागसता पाहून त्याने चटकन नकार दिला नाही आणि मान डोलावली.. त्याच्या या वागण्याने सगळे थक्क झाले होते .. त्याला कधीच कोणाच्या मांडी वर जायला आवडत नव्हतं, पण स्वराने एकदाच विचारतच त्याने मान्य केलं...
स्वराने त्याला पटकन उचललं आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली "तू खूपच गोड आहेस...."
पण अथर्व अजूनही शांत होता.. तो फक्त हलकाच हसला. त्याच्या वहिनीला वाईट नको वाटलं असं त्याला वाटलं... स्वराला तर जणू एक नवीन खेळाचं मिळालं होत... कदाचित ती दिवसभर त्याच्यासोबत गुंतलेली राहणार होती, अद्वैत त्याच्याकडे पाहून सुखावला होता....
---------=========---------------
हेय गाईज कशी वाटतेय स्टोरी नक्की कळवा ....पुढच्या भागात काय होईल... त्यासाठी वाचत राहा ....