Kondan Parva One - Part 35 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 35

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 35

द्विधा


" नेत्रा!! निघालीस? " सचिन म्हणाला.


" हो!!" मी जरा वैतागलेल्या सुरातच म्हणाले.

" थोडा वेळ आहे??" सचिनने विचारले.

" सचिन आत्ता माझा मूड नाहीये. तेव्हा प्लिज मला थांब म्हणू नको." मला शांतता हवी होती. 

"ठीके." तो म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावर पण उदासीचे ढग स्पष्ट दिसत होते. मी हल्ली सतत त्याला rude सारखं वागवणं मलाच बरोबर वाटलं नाही. 

" चल मला घरी सोड." मी म्हणाले. आम्ही चालत निघालो.

" thanks! काय झालं गं..? चेहरा पडलेला वाटतोय तुझा. " तो जरा उजळला आणि म्हणाला.

"चं!! काय सांगू अरे! ती पल्ली आणि ती स्नेहा मूर्ख पोरीं आहेत. काहीही बरळतात. माझं डोकं फिरवलं त्यांनी.. म्हणून मग तूला उगाच rude सारखं बोलले. सॉरी." मी म्हणाले आणि थोडक्यात त्याला घडलेला प्रसंग सांगितला 

"हम्म!! नेत्रा मी तूला बोललो होतो. जग खूप वाईट गोष्टींनी भरलेलं आहे. इथं अति चांगलं रहाणं आणि वागणं लोकांना खुपतं. वाईट माणसं चांगलं वागणाऱ्याला आपल्यात घेऊ पाहतात. तसं वागणाऱ्यांची संख्या इथं खूप आहे. त्यामुळं इतकही कोणाशी चांगलं वागू नये कि समोरचा आपल्याबद्दल मनात काय धरून बसलाय कळणार नाही. ती पल्लवी तुझी आजवर इतकी चांगली मैत्रीण होती पण तुझ्याबाबतीत मनात किती काही वाईट धरून बसली आहे, तूला वाटलं तरी होतं का? 

तीला माहित नाही का तुझ्या त्याच्या मैत्रिबद्दल? पण तरीही तिने असं केलं कारण श्वेता आल्यामुळे तुझ्या मित्रात तीला असलेला इंटरेस्ट आता तीला आवरावा लागणार हे तिने ओळखलं, त्यात तू तीला मदत न करता श्वेताशी मैत्री केली, हे पण तीला खुपलं असणार.. मग लगेच तुमच्या इतक्या दिवसांच्या मैत्रीवर पाणी फिरवून तुझ्याबद्दल काहीही बदनामीकारक बोलू लागली." तो म्हणाला.

"हम्म.. वाईट तिने टोमणे मारायचं नाही वाटलं. दुसरं काही असतं तर इतकी रागवले नसते.  पण जाडू आणि माझ्या मैत्रिबद्दल तिने असं बोलावं? हे जास्त त्रासदायक आहे." ती म्हणाली.

"मी असं तर नाही म्हणणार कि लोकं काय काहीही बोलतात. आणि आपण आपल्याला हवं तसंच वागावं. कारण ते तुझ्यासारख्या शाळेत नावाजलेल्या आणि हुशार मुलीला सूट नाही करणार. नेत्रा खरंतर कुठल्याही नात्याला थोडीतरी लिमिटेशन पाहिजेत." तो म्हणाला.

" म्हणजे?? कसले लिमिटेशन? " मला त्याचा मुद्दा नीट नाही कळला.

"आता हेच बघणं.. तुझ्या त्याच्याबद्दल असं बोलल्या गेल्याच कारण तुमची मैत्री आणि तरीही त्याचं श्वेताशी वाढत असणारी जवळीक आहे. उद्या त्यांच्यात तसं काही तयार झालं. तर मग तुझ्याबाबतीत चुकीचं बोललं जाणार. जसं कि हे तर एवढे क्लोज होते. मग यांच्यात कशावरून असं काही झालं वैगरे.. गैरसमज नको करुन घेऊ.. हे मी नाही पण इतर लोकांचं बोलणं असू शकतं." सचिन म्हणाला.

" मग काय करायला हवं मी? " मी म्हणाले.

" थोडंतरी अंतर वाढवणे. कारण तुमची मैत्री आहे. आज ना उद्या कुठल्यातरी इतर बंधनामुळे त्या मैत्रीला आपोआप थोडं दूर व्हावं लागणार. तुम्ही काही एकमेकांना मग पहिली जागा नाही देऊ शकणार. तेव्हा काय करशील? " सचिनचा प्रश्न माझा गोंधळ वाढवतं होता.

"असं.. असं नाही होणार.. जाडू मला नाही तसं वागवायचा. " मी म्हणाले.

" बरं तुझं घेऊ. तुझ्या आयुष्यात कोंणी आले. आणि त्याला ही गोष्ट एका लिमिट पर्यंत ठीक वाटली. पण म्हणून आजच्या लेव्हल ने तुमची मैत्री तो तशीच मान्य करणार नाही. सेम हेच तुझ्या मित्राच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीमुळे सुद्धा होईल. मग काय करशील? " त्याने विचारले.

" इतक्या लांबचा विचार मी नाही करतं. " मी त्याला म्हणाले.

" मग अचानक समोर येणाऱ्या त्रासदायक परिणामांना तोंड द्यावं लागेल नेत्रा.. समजतंय का मी काय म्हणतोय? " तो म्हणाला.

" कसले परिणाम? " मला कळलं नाही. हा वयाच्या फार पुढचं बोलायचा.

" अगं म्हणजे पुढं तुझी ही मैत्री अशीच राहिली आणि तुझ्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला ते नाही पटलं.. आणि अचानक त्याने हरकत घेतली तर? किती मोठा डिस्टर्बन्स तयार होईल कल्पना कर... सवय त्याची असावी ज्याची आयुष्यात fix जागा असते.. मैत्री प्रेमाच्या वादळात उडून जाते नेत्रा... " तो म्हणाला.

मैत्री प्रेमाच्या वादळात उडून जाते? खरंच? असं होऊ शकतं? मी याचा विचार कधीच नाही केला.

"म्हणून तर महत्वाच्या व्यक्तीला न गमवण्यासाठी एका बंधनात बांधावं लागतं... तूला काय वाटतं ती श्वेता किंवा पल्लवी तुझ्या मित्रा बाबतीत असं का करतात? त्यांना तो हवा आहे. दुसऱ्या कुठल्याही नात्यात नाही. फक्त खास नात्यात. कारण त्यांना ठाऊक आहे. मैत्रीत माणूस गमावण्याचे चान्सेस प्रेमाच्या नात्या पेक्षा जास्त असतात. 

.अजून एक सांगायचं होतं. आता विषय निघालाचं आहे तर बोलतोच! नेत्रा तू.. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस.. आणि नेहमी असशील.. म्हणून तर मी...मी माझा प्रयत्न केला... आणि मी परत परत करत राहिन. कारण तुझं आयुष्यात असणं मला खूप महत्वाचं वाटतं. नुसतं मैत्रीचं नातं आयुष्यात जितका सपोर्ट करत नाही, तितकं प्रेमाचं करतं." सचिन आणखी विस्तारून बोलला.

मी काय बोलावं मलाच कळत नव्हतं. सचिन ने आज सपशेल संभ्रमित करुन टाकलं होतं मला. त्याचं बोलणं योग्य वाटत होतं मला. नात्याला नाव असेल आणि ते नातं घट्ट असेल तर मैत्रीपेक्षा ते आपोआप मोठं होत जातं आणि मग मैत्री नक्कीच मागे पडते. मग जाडूसुद्धा उद्या आपल्याला डावलेलंच. आपल्याकडूनही कदाचित त्याला तसं वागवलं जाईल.

"नुसती तुझी मैत्री घेऊन अर्धवटपणे तुझ्या आयुष्यात असण्यापेक्षा सतत तुझ्या सोबत असण्यासाठी प्रेमाचं बंधन मला तुझ्याशी बांधावं वाटलं. अशा बंधनात नावं जोडली गेली तरी त्याचा त्रास नाही होत. कारण त्यात क्लिअर असते कि दोघांची एकमेकांच्या कडून अपेक्षा काय आहे." तो पुढे म्हणाला.

"सचिन मी यावर आत्ता काय बोलू मला कळतं नाहीये." मी म्हणाले.

" नेत्रा.. तू आत्ता यावर काही बोलावं असं मी म्हणत पण नाहीये. पण मनात एक गोष्ट कायम ठेव. मी तुझ्याबद्दल जे मनात ठेऊन आहे ते कधीचं बदलनार नाही. कारण मी तूला त्याचं रूपात बघत आलोय. वरवर ही मैत्री असली तरी तिच्या आत मला माहित आहे आपल्यात काय उगवतंय. आणि ते वाढून बहरणार हे पण मला ठाऊक आहे...मी तुझी साथ सोडणार नाही, कधीच!!" तो म्हणाला.

" सचिन घर आलं. " मी भानावर येत म्हणाले.

" ठीके.. येतो मी. काळजी घे. ताण घेऊ नकोस. तू आनंदी असणं महत्वाचं आहे मला. " तो म्हणाला आणि गेला.

🍁🍁🍁🍁

त्यादिवशी माझं मनं लागत नव्हतं. जाडू यायला हवा होता खरंतर, पण आला नाही. 

"गुंतला असेल कुठेतरी... गुंतला असेल? खरंच? जाडू गुंतला तर सुनीला काय करावं लागेल? एरवी मी टीमक्या वाजवते मला खूप मित्र परिवार असण्याच्या. पण हा एकटा नसला कि सगळं रिकामं होतं. किती सवय आहे ना याची. सचिन म्हणतो तशी ही सवय घातकचं म्हणावी लागेल. उद्या तो म्हणाला त्याप्रमाणे नाही खपलं आमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या खास व्यक्तीला आमचं मित्र असणं, तर मग आम्ही आमच्या मैत्रीला जपायचं कि प्रेमाला? सचिन म्हणतो प्रेमाच्या हक्काला मैत्रीच्या वरचीच जागा असते का? म्हणून सचिन ती मिळवू पाहतो? माझा कोंणी मित्र असणं यात माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रेमाला खटकन्यासारखं काय असेल?

मग सचिन ती मिळवू पाहतोय आणि तो म्हणतो तशी त्याला ती मिळाली.. तर त्याला पण आमची मैत्री खटकणार का? याचं उत्तरं त्याच्याकडे काय असेल? तो म्हणतो मी आनंदी असणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी. मग माझा आनंद माझ्या जाडूशी असणाऱ्या मैत्रीमध्ये सुद्धा आहेच कि. त्याचं हा काय करणार? सचिन खूप आतमध्ये एक जागा मिळवून बसलाय. मी अमान्य करतं नाहीये. मला वाटतं त्याच्याबद्दल सुप्त आकर्षण. पण जाडू इतका सुशील तो नक्कीच नाही. सचिन possesive आहे. त्याने आजपण आपल्याला सरळ सांगितलं कि मैत्रीच्या पुढचेच त्याचे विचार आहेत.

पण सचिनसारखा जाडू नाही. तो मनमोकळा आणि दुसऱ्याच्या मनाची काळजी घेणारा आहे. तो possessive वैगरे नाहीये.
कशावरून? कशावरून जाडू possesive नसेल? तो मित्र म्हणून आणि एक चांगला हुशार मुलगा म्हणून आपल्याला माहित आहे आणि तसाच आवडतो. दुसऱ्या अँगलने आपण कुठे त्याचा कधी विचार केला? काहीच जाणवलं नाही आपल्याला तसं. मग मला कसं माहित असेल कि तो प्रेमात कसा वागेल? 

ए मूर्ख सुने.. असली तुलना का करतीयेस? हा सचिनपण ना.. कुठला विषय कुठे नेऊन ठेवला याने..आजचा दिवसच खराब गेला... त्यात हा जाडू पण कुठं गेलाय... खूप आठवण येते कार्ट्या तुझी.. आणि नेमका नसतोस तू.. "


🍁🍁🍁🍁


कधी कधी नाही एकटीला उमजत
उधळल्या धुक्यात दिशाच नाही समजत.
पण तुझ्या हाताची उब सगळं समजवते.
अन तुझ्या हृदयाची साद दिशा दर्शवते.

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁