Kondan Parva One - Part 34 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 34

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 34

भडाग्नी 

" श्वेता!! काल निघून गेलीस लवकर? " मी तीला चेक करण्यासाठी सहज विचारलं. तास सुरु व्हायला दहा मिनिटे अवकाश होता. म्हणून आम्ही बोलत होतो.

"हो अगं. तुम्हाला वेळ लागत होता ना. मग मी निघाले." श्वेता म्हणाली.

" हो.. ते जरा बोलत थांबलो म्हणून मग उशीर झाला. " मी म्हणाले.

" हो.. म्हणूनच मी पण निघाले... आणि?? कशी झाली तुमची पिकनिक?? टेकडीवर गेला होता ना दोघे? हा म्हणाला मला काल संध्याकाळी. " ती म्हणाली.

" जाडुने तूला सांगितलं? " मला शॉक होता हा.

" हो.. मी घरी गेले होते संध्याकाळी त्याच्या. तेव्हा बोलला मला." ती मला म्हणाली.

"असं कसं पण यार..? हा जाडू पण ना.. विचार करतं नाही बोलताना. तूला कसं वाटलं असेल वैगरे.." मी म्हणाले.

मला श्वेता बोलली त्याचं खरंच वाईट वाटलं. एकतर जाडुने अचानक मला ओढत नेली श्वेताला टाळून आणि वरून तीलाच सांगतोय कि "तूला कल्टी दिली." काय करावं या पोराचं?

" अगं!! .. उलटं त्याचं असं बिनधास्त आणि स्पष्टपने मला सांगणं मला आवडलं बरं का? यार तुम्ही दोघे एकदम चड्डी बड्डी आहात, मला कळायला नको का? सारखं काय मी मध्यें मध्ये घुसते. बरोबर केलं त्याने आणि त्याच्याजागी मी असते, तर मी पण हेच केलं असतं." श्वेता म्हणाली.

" ईईई.. चड्डी बड्डी काय यार.. शी ss" मला जाम हसायला आलं. असं कोणीतरी पहिल्यांदाच बोललं होतं मला.

"मग काय??! अगं तो मला म्हणाला सरळ, हे बघ तुझ्यामुळं मला सुनीला वेळ देता आला नाहीये काही दिवस. शिवाय मला पण चुकल्या चुकल्या सारखं होतंय. म्हणून आज तूला कटवलं आणि उंडरलो आम्ही. " 

"मी काही म्हणाले नव्हते गं त्याला.. खरंच सांगते. पण असं बोलावं का त्याने? त्याचं खरं बोलणं ठीके पण.. " मी म्हणतच होते.

"सुनेत्रा कूल यार.. त्याचं नाही चुकलं काही. उलटं असं ट्रान्सपरंट असणं सगळ्यांना नाही जमत. आणि तो बेपर्वाईने बोलला असं पण नाही हा? नंतर मला इतर कोणाकडून किंवा उशिराने कळलं असतं तर उलटं वाईट वाटलं असतं थोडंसं. असं तो म्हणाला. That means he cares.. आपण होऊन सरळ ठोक माझ्यासारख्या मुलीला असं सांगणे आणि स्वतःच्या आयुष्यात पण एका लिमिटमध्यें ठेवणं हे काही सगळ्या पोरांना नाही जमू शकत. तुझ्या जाडूमध्ये आहे ती धमक." ती म्हणाली. 

आणि एक सुस्कारा.सोडला तिने... 
"I wish यार..." ती पुढं म्हणाली.

"काय?" मी विचारलं.

" I wish बाबांची बदली इथं आठ दहा वर्षे आधी झाली असती. " ती म्हणाली.

" मग काय झालं असतं? " मी विचारलं.

"या स्वीट चार्मिंग बोक्याला पहिल्यापासून कोणासाठीच सोडला नसता मी." ती हसत म्हणाली.

" बोकाssss!!" मी केवढ्याने हसत ओरडले.

पल्ली एकदम उठून ओरडली.." ऐय्या!! कुठंय बोका??!!"

मग आम्ही दोघी तिच्या त्या reaction मुळे अजूनच जोरात हसत सुटलो. आमच्या बोलण्याकडे तिचं लक्ष असावं पण तीला ऐकू जात नव्हतं स्पष्ट असं.

" अगं खरं सांगते. खूप बावळट मुलं पाहिलीयेत मी. म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असणारी पण. मैत्री करायला ओळख, वाढवायला पुढे पुढे करणार. का? तर looks हेच कारण. पण माझं म्हणणं, माझे विचार, माझ्या ईच्छा..?? याबद्दल कोंणी बोलण्यासाठी तयार नसतं...ऐकण्याची क्षमता नसलेले कार्टून्स.. हा तसा नाही. सॉरी तूला ऑड वाटेल. पण मला आपल्या एज मध्यें लूक्स बघून वेड्यासारखं रिऍक्ट होणारी मुलं जास्त बघितल्यामुळे. याचं वेगळेपण जाणवलं. एकदम क्लिअर आणि focused असतो कायम. अजिबात डोळ्यात चलबिचलं नाही. 

मी गेल्या दोन वर्षात जेवढ्यापण मुलांच्या कॉन्टॅक्ट मध्यें आले असेन. त्यांच्यासोबत disappoint झाले. कारण त्यांचं मैत्रीच नको त्या गोष्टीत रूपांतर करायला बघण जीवावर यायचं.  मैत्रिणी होत्या मला तिकडे. पण ते टिपिकल gossiping and all मला नाही जमत. मग असं वाटू लागलं कि एकटी बरी.

आणि एक!!  मला वाटायचं मला फार कळतं.. एक इगोच म्हण ना सुंदर, समजूतदार आणि हुशार असण्याचा. पण हुशारी, चार्म्स, समजूतदारपणा जवळ असले तरी एका controlled manner मध्यें कसं वागायचं ते हा दाखवतोय मला. I dont know मी किती ओळखू शकले त्याला. तुलाच नीट माहित असणार तो. खरंतर माझ्या या जाणीवा मला कोणाशीतरी शेअर करायच्या होत्या. त्याला तर नाही सांगू शकत अजून. पण तू त्याची बेस्ट फ्रेंड आहेस. तूला सर्व माहित असावं म्हणून बोलले. 
सुनेत्रा.. मी काही चुकीचं बोलले असेल तर सॉरी हा? म्हणजे मला तुमच्या नात्याबद्दल पण अजून निटंसं ठाऊक नाहीये... " ती बरंच विस्तारून बोलली.

"अगं थांब.. रिलॅक्स.. आम्ही खूप जवळचे मित्र आहोत.. अगदी घरातल्या सारखे.. आमचं नातं जिवाभावाच्या मैत्रीचंच आहे आणि आम्ही ते खूप छान जपत आलोय.. तू त्याच्याबद्दल इतकं काही चांगलं जाणून घेऊन मला सांगतीयेस. त्यात काहीच चुकीचं वाटत नाहीमला. उलटं छान वाटलं, जाडूला कोंणी इतकं admire करतंय. " मी म्हणाले.

" thank god यार.. मला वाटलं तू कशी रिऍक्ट होशील... " श्वेता म्हणाली

" तूला काहीही वाटलं तर बोलत जा.. टेन्शन नको घेऊ. " मी श्वेताला म्हणाले. 

तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि "thanks" म्हणाली.
श्वेता जाडूसाठी भलतीच नादावली होती असं दिसत होतं. पल्ली नंतर हिचा नंबर लागला होता बहुतेक. जाडूच काही खरं नव्हतं.

"चला काढा वह्या..! सुनेत्रा!! मी तुझ्याकडे घरी आले तर चालेल ना गं? बोर होतं कधी कधी फार.. हा कधी असला नसला तर काय करणार?" श्वेता म्हणत होती.

" नाही चालणार!! कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी मला सुनी म्हणतात. सुनेत्रा म्हणणार असशील तर नकोच येऊस.. " मी मिश्किलपणे म्हणाले.

" बरं. सुने येऊ ना गं तुझ्याकडे..? " ती म्हणाली."

"हो आतापासून...अगदी कधीही!!" मी होकार भरला.

🍁🍁🍁🍁

आधीच म्हणाले तसं श्वेता खूप चांगली आणि स्पष्टवक्ती मुलगी होती. फक्त तिचं जे intellectual डोकं होतं. ते इथं कोंणी समजू शकत नव्हतं. एकटा जाडू सोडला आणि त्या खालोखाल मी, तर तिच कोणाशी फारसं जुळतंच नव्हतं. मी माझ्या घोळक्यात जास्त असल्यामुळे जाडूच तीला उत्तम पर्याय होता. त्यामुळे ती बऱ्याचदा त्याच्या सोबत असायची. पण जाडूची लिमिट तीला माहित होती. त्याचं माझ्यावर असलेलं लक्ष पण तीला कळलं होतं. ती आमच्या मैत्रीत कधीच लुडबुड करत नव्हती.

एकदा तिने आम्हाला दोघांना घरी बोलावलं. माझी तिच्या आईवडील आणि आजीशी ओळख करुन दिली. जाडू तर ओळखीचा होताच. छान माणसं होती ती. तिच्या आईकडून कळलं कि श्वेताला फ्रेंड्स फार कमी आहेत. 

"तुमच्याबद्दल ती खूप काही सांगत असते घरी. आम्हाला तर वाटलं होतं. सिटीतून इकडे येतोय रहायला पोरीचं मनं रमतंय कि नाही. पण पहिले हा आणि आता तू भेटलीस तीला. ती रूळत चाललीये." तिची आई म्हणत होती.

दहावीच्या वर्षी जागा बदलल्यामुळे त्यांना श्वेताच्या अभ्यासाचं टेन्शन होतं. पण जाडूच श्वेताला सहजपने वागवणं. त्याने तीला सांभाळून घेणं यामुळे त्यांचं सगळं टेन्शन गेलं. श्वेताचे आईबाबा पण जाडूला खूप प्रेमाने वागवत होते. हे बघून छान वाटलं. माझा जाडू आहेच गुणी.

🍁🍁🍁🍁

तास सुटले होते. आज मी जरा पोरींच्या ग्रुपमध्ये रेंगाळले. जाडू आणि श्वेता घरी निघाले होते.

"नवीन पिक्चर आलाय.. बघितला का?" पल्ली म्हणाली.

" कोणता गं? " मी विचारले.

" कूछ कुछ होता है.. " पल्ली म्हणाली.

"पाहिला नाहीये, पण स्टोरी कळली. आधी हिरो हिरोईन कॉलेजमध्यें मित्र मैत्रीण, मग दुसऱ्या हिरोईनची एंट्री आणि मग हिरो दुसऱ्या हिरोईन सोबत होतो. पहिलीला कल्टी. काही वर्षानी दुसरी मरते मग परत पहिलीसोबत हिरो. असं आहे बाई काहीतरी." स्नेहा म्हणाली.

" आपल्या शाळेतूनच ढापलीये असं वाटतं ना? " पल्ली म्हणाली.

" हो तर... रोजचं बघतोय कि आपण. " स्नेहा म्हणाली.

" आपल्या शाळेतून? ती कशी गं? " मी म्हणाले.

" तुमचीच कि.. तू तुझा मित्र आणि... " पल्ली म्हणाली.

" श्वेता!! " त्या दोघी ओरडल्या.

" काय??!! पल्ले काहीही फालतू बोलू नकोस हा?" मी चिडून बोलले.

" फालतू काय? सगळे म्हणतात हल्ली. " पल्ली आगाऊपणाने म्हणाली.

" बरोबर बोलला होता जाडू. तू बिनडोक आहेसच. ते ठीक आहे एकवेळ, पण तुझे विचार पण असले कुजकट असतील वाटलं नव्हतं मला. म्हणून तूला तो वाऱ्याला उभी करतं नाही. त्याला हे कळतं तेच मला कळत नाही. त्याच्या माझ्याबद्दल असलं बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? तूला माहित तरी आहे का आम्ही कसे राहतो, वागतो. तुझं सडकं डोकं घेऊन जा आणि परत माझ्याकडे येऊ नकोस... जाऊ दे मीच जाते.. माझंच चुकलं तुझ्यासारखीला मैत्रीण केली मी. " मी चिडून निघाले.

प्रज्ञा माझ्यामागे पळत आली.
" सुने.. प्लिज चिडू नको.. मूर्ख आहेत त्या पल्ली आणि स्नेहा.. श्वेता तुझ्याशीच बोलते ना मुलींमध्ये.. त्यात त्या पल्लीच त्याच्यामागे असणं पण सगळ्यांना माहित आहे.. श्वेता पण हल्ली त्याच्यासोबत असते ना जास्त.. म्हणून असलं काहीतरी करपट मनाने करत आहे ती." प्रज्ञा म्हणाली.

"अगं तो मित्र आहे माझा लहानपणीचा. तुमच्याही खूप आधीपासून. आमच्या मैत्री बद्दल असलं बोलणं मला नाही सहन होत." मी दुखावले होते. रडायला येत होतं मला. 

" हो मला कळतंय गं!! आणि मी त्या दोघीना पण चांगली झापते. तू प्लिज यार असं मनाला लावून नको घेऊ. सुनी आम्हाला खूप महत्वाची आहे... प्लिज नाराज नको होऊ." ती म्हणाली. 

मागून अनिता आणि नेहा पण आल्या. त्यांनी पण मला समजावलं. शेवटी मी प्रेमाने जोडलेल्या मैत्रिणी होत्या त्या. मला त्यांनी मला असं सोडणं शक्य नव्हतं. माझं माणसे जोडण्याचा स्वभाव चुकीचा नाही हे त्यांनी दाखवून दिलं होतं. पण सध्या मला एकटं असण्याची गरज होती. म्हणून मी निघाले.

सायकल काढतच होते. तितक्यात मागून नेहमीचा आवाज आला.
"नेत्रा!!"

🍁🍁🍁🍁

तुझं माझं कोणाला खुपतंय?
तुझं माझं कोणाला सलतंय?
कोणी कितीही आवया उठवल्या पर्वा नाही..
आहे तुझ्यावर जीव माझा , कोण नाकारतंय?

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁