Badla - Gosht Atyacharachi - 5 in Marathi Horror Stories by DEVGAN Ak books and stories PDF | बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 5

Featured Books
Categories
Share

बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 5

संध्याकाळी सुस्मिता व सुरेश घरी आले .  आल्या आल्या सुस्मिताची नजर मुलांना शोधू लागली . निकीता काही तिला दिसली नाही . तिने करणला जवळ घेतले," तुझी दिदी कुठे आहे ?""  ती संपूर्ण दिवस खोलीत झोपूनच राहते ", करण म्हणाला . सुस्मिता ," म्हणजे तिने जेवणही केले नाही काय ?"" ती खाली आली नव्हती , मघाशी ओरडत होती . मला फार भिती वाटली तिला पाहून म्हणून मी तिथे थांबलो नाही.", करण म्हणाला ." बापरे ! ", सुस्मिता लगेचच निकीताच्या खोलीत शिरली .  निकीता आपले तोंड उशीत शिरवून झोपली होती . " निकीता उठ काय होतेय तुला , तू जेवणही केले नाहीस", सुस्मिता काळजीने तिला विचारते . पण निकीता काहीच उत्तर देत नाही . निकीता झोपलेली आहे असे वाटून सुस्मिता लगेचच ‌ जेवणाच्या तयारीसाठी स्वंयपाकघरात शिरली. थोड्या वेळातच तिने जेवण तयार केले .  हे दोघे बाप लेक तर वाटच पाहत होते . " निकीता कुठे आहे ?", सुरेशने सुस्मिताला विचारले. " ती आज येणार नाही ती आपले जेवण खोलीतच करेल", सुस्मिता म्हणाली . तिने एक प्लेट निकीतासाठी वेगळी काढली  व ती घेऊन निकीताच्या खोलीत शिरली . निकीता अजूनही त्याच अवस्थेत झोपली होती .  " बाळ उठ!  जेवण करून घे",काही वेळ शांततेत गेला निकीता उठत नाही म्हणून तिला उठवण्यासाठी सुस्मिताने तिला हात लावला तसे , निकीता खाडकन उठून बसली , त्यासरशी तिची हाडे मोडल्यागत काड्... आवाज झाला . केस सुटले होते आणि ते तिच्या चेहऱ्यावर पसरले होते . तिने आपली मान  हळूच सुस्मीताच्या हातात असलेल्या प्लेटवर फिरवली आणि ती नाकपुड्यातून सुस्कारे सोडू लागली .पुढच्याच क्षणी तिने सुस्मिताच्या हातातील प्लेटवर फटकारा मारला तसे , प्लेट दुर जाऊन पडली . त्यातील सर्व अन्न इतस्ततः विखुरले गेले ." निकीता काय झाले आहे तुला ? अशी का वागत आहेस तू ?", असे म्हणत सुस्मिता निकीताजवळ सरकली . ती तिला स्पर्श करणार तोच निकीता जोरात किंकाळली . त्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला झाले ." नाही खाणार मी ते मांसाहार ..... तुझी हिम्मत कशी झाली हे सर्व ईथे आणन्याची हा !",  घोगऱ्या आवाजात निकीता गर्जत होती . तिची लाल तांबुस पडलेली डोळ्याची बुबुळे गरागरा भीरभीरत होती .‌ तिच्या चेहऱ्यावर अनेक वर्ण निर्माण झाले होते . काहीतून हलकेसे रक्त बाहेर पडलेले होते व निकीता चे संपुर्ण शरीर पांढरे फटफटीत पडले होते .एकूणच सुस्मिता घाबरून मागे सरकली .

तो झालेला आवाज एकून सुरेश धावतच निकीताच्या खोलीत शिरला . सुस्मिता घाबरून मागे सरकली होती . तिचे शरीर थरथरत होते . सुरेश खोलीत शिरला तो सगळा प्रकार पाहून तोही स्तब्ध झाला . निकीता कस्याचा तरी वास घेऊ लागली .  तिने तिचे शरीर.  गार्रकन फिरवले तिने एक उडी कोपऱ्यात घेतली  व विखुरलेल्या अन्ना शेजारी जाऊन आखूड बसली . ते खाली विखुरलेले अन्न ती लगबगीने खाऊ लागली . तो सगळा प्रकार पाहून सुस्मिताला रडू फुटले  . तिने एक पाऊल पुढे टाकले. " बाळ....." पण सुरेशने तिचा हात धरला  तो मानेनेच नाही बोलला . ते दोघेही खोलीचे दार हळूच बंद करून बाहेर पडले . करणला त्यांनी आपल्या बरोबर खोलीत झोपवले .सुस्मिता सुरेशच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली होती . सुरेश मात्र कोणालातरी सारखे सारखे फोन लावत होता . " डॉक्टरांचा फोन लागत नाही", सुरेश निराश होत म्हणाला . " मग! आता काय करायचे ? ", सुस्मिताने काळजीच्या सुरात विचारले ." आता जे काही ते उद्या बघू! आता झोप बरं !", सुरेश निकीताला थोपटत म्हणाला , पण आज दोघांनाही झोप काही येतच नव्हती .

डॉक्टरांना फोन लावून झाला होता . नितेशही वेळ न दवडता लगेच तिकडे निघाला होता . दारावरची बेल वाजली . सुस्मिता व सुरेश आधीच वाट पाहतच बसले होते अपुरी झोपेमुळे त्यांचे डोळेही सुजले होते . सुरेश लगेच उठला व त्यांने दरवाजा उघडला बाहेर नितेश एक स्माईल देत उभा होता .  " या ...  डॉक्टर  या.... ", सुरेश म्हणाला .दोघांच्याही चेहऱ्याकडे नितेशचे लक्ष जाताच त्यांच्या लक्षात आले की दोघेही फारच चिंतेत आहेत . " काय झाले , आपण एवढ्या काळजीत का ? ", नितेशने न राहवून विचारले . " आम्हाला तर काहीच कळत नाही डॉक्टर काय झाले आहे ते , तुम्हीच बघा", सुस्मिता म्हणाली .लगेचच ते सर्व निकीताच्या खोलीत शिरले . निकीता बिछान्यावर पडली होती . नितेश तिला पाहून हादरलाच . "हे सर्व कसे घडले, आय मीन तुम्ही मला आधीच का नाही सांगीतले", नितेश दोघांनाही म्हणाला . "तुमच्याकडे एखाद्या मजबूत दोर असेलच?", नितेश ने दोघांनाही विचारले . सुस्मिता ,"होय आहे मी आत्ताच घेऊन येते."असे म्हणत सुस्मिता खोलीबाहेर पडली . नितेश निकीताकडे पाहतच राहिला . तिचे ते पांढरे पडलेले शरीर आणि चेहऱ्यावरती झालेल्या त्या खोल जखमा .ते सर्व पाहून त्याचे डोळे डबडबले . सुस्मिता काही वेळातच काही जाड व मजबूत दोऱ्या घेऊन आली .  तिने येताच विचारले ," काय झाले आहे डॉक्टर तिला? " नितेश तिच्या ह्या प्रश्नाने काहीवेळ शांतच उभा होता . " तिच्यावर एखाद्या वाईट शक्तीने  आघात केला आहे ,म्हणजे निकीता आता त्या वाईट शक्तीच्या अधीन आहे , अस्यात तिला असे खुले सोडने घातक आहे . म्हणून तिला बांधून ठेवने गरजेचे आहे . " नितेश एक खोल श्र्वास घेत म्हणाला . सुस्मिताला त्यांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता ,"काय सांगता डॉक्टर....."" केव्हापर्यंत डॉक्टर..." , सुरेशने विचारले. "तो पर्यंत , जो पर्यंत माझा भाऊ रुद्र !  इथे येत नाही .", नितेश म्हणाला.नितेशने दोरी हातात घेतली . एक दोर सुरेशकडे पण दिला  व त्याला निकीताचा उजवा हात बांधन्याचा इशारा केला . तोही तिचा डावा हात बांधण्यासाठी खाली बसला . त्यांचे हात बांधने सुरू होतेच तोच निकीताने डोळे उघडले . तिचे डोळे अगदी पांढरे फटफटीत होते . निकीताला पाहूनच सुस्मिता दोन पाऊले मागे सरकली . आतापर्यंत दोघांच्याही लक्षात आले होते की निकीताला आपन काय करत आहोत ह्याची जाणीव झाली आहे .  निकीताने एक जळजळीत नजर सुरेशवर रोखली ‌ . त्यासरशी सुरेश हवेत उडाला . तो भिंतीवर जाऊन आदळला. सुस्मिता सुरेशच्या दिशेने धावली . निकीता ने आपला डावा हातही जोरात ओढला  . त्यामुळे हातातील दोर शैल झाले व नितेशच्या हातातून निसटले . निकीता पलंगावर उचलली गेली .  नितेश ने एक वेळ निकीताकडे पाहीले व त्याने सुरेशला इशारा केला की मला मदत करा . निकीता पुढे काही करणार तोच नितेशने तिला पकडले . ती धडपडू लागली मोठ्याने किंचाळू लागली . पण नितेश ने तिला घट्ट पकडले होते . ह्या संधीचा फायदा घेऊन सुरेशने व सुस्मिताने निकीताचे हात व पाय घट्ट बांधले . नितेश बाजूला झाला त्याला आणखी एक काम होते . त्याने बाजूला जाऊन  रुद्राला फोन केला  काही वेळातच त्याने फोन उचलला.," रुद्रा इकडे फार मोठी समस्या निर्माण झाली आहे , तुझी मदत हवीय."रुद्र," इकडचे काम काही संपलेले नाही , ते झाले की लगेच येतो." असे म्हणत त्याने फोन ठेवला .

रुद्र येईल आणि सर्व निट करेल पण केव्हा ?