Badla - Gosht Atyacharachi - 8 in Marathi Horror Stories by DEVGAN Ak books and stories PDF | बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 8 ( शेवट )

Featured Books
Categories
Share

बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 8 ( शेवट )

" अरे रुद्र तू आलास पण", रुद्रला पाहताच नितेश त्याला म्हणाला.

" होय आलो  ,पण मला तसे काही दिसत नाही ?", रुद्र इकडे तिकडे पाहत म्हणाला.

नितेश," काय ?"

रुद्र," तुझी समस्या मला तर इथे काहीच जाणवत नाही."

नितेश ," अरे हो ती , ती एका मुलीला होती पण , मी सकाळीच तिच्या घरी गेलो होतो . ती मला पुर्णपणे बरी झालेली दिसली ."

रुद्र," मी जोपर्यंत स्वत: पाहत नाही तोपर्यंत कसा विश्वास ठेवू . एकदा मला तिला बघितलेच पाहिजे . ज्याप्रमाणे तू सांगितले होतेस , त्यावरुन तरी मला वाटते . तसेही कोणतीही आत्मा सहजासहजी ताब्यात घेतलेल्या शरीराला सोडत नाही."

नितेश," तू म्हणतोस आता , आता तर रात्र होईल रे . तरी पण एकदा जाऊन बघू."

दोघेही कारमध्ये बसले . गाडी पळाली व रस्त्यावर आली .

नितेश रुद्रला म्हणाला," अरे ते तुझे चेटकीणीचे प्रकरन संपले काय." 

रुद्र," होय ते काम करूनच ईथे आलोय."

नितेश," मग ती चेटकीण कुठे आहे ."

रुद्र," असल्या दुष्ट आत्मांना मी बंदी बनवत नाही , मी तिचा अग्नीत नाश केला."

नितेश," मला तिथे यायचे होते , एकदातरी बघायचे होते की चेटकीण दिसते तरी कशी ?" नितेश हसत म्हणाला . पण रुद्राचे तिकडे लक्ष नव्हते तो शिटला रेलुन झोपला होता . आता गाडीने शहरात प्रवेश केला होता . तसा अंधारही दाटला होता .

रुद्र व नितेश दोघेही भैरवनाथची मुले होती . भैरवनाथ तांत्रिक होते ते आपल्या विधेचा वाईट हेतूने उपयोग न करता लोकांच्या चांगल्यासाठी करत असत . त्यांना सारखे वाटे की आपले काम कोणीतरी पुढे चालवावे म्हणून त्यांनी रुद्राची म्हणजेच आपल्या मोठ्या मुलाची निवड केली व त्याला सर्व गोष्टीत पारंगत केले . 

घराचे दार उघडेच होते . निकीताने आत प्रवेश केला . समोरच तिचे आई-वडील व भाऊ घराच्या सजावटीत गुंतले होते . निकीता. ते सर्व पाहून म्हणाली," ही सजावट कसली ?"

तिचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या . तिला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद  पसरला.

सुस्मिता," अगं ,तू केव्हा आलीस आणि हा ड्रेस केव्हा चेंज केलास."

निकीता," ते ते मी मॉलमध्ये केला ,पण ही सजावट कसली ? " 

तिने परत एकदा प्रश्न विचारला .

" अगं, ही उद्या दिवाळी आहे ना ? घर सजवायला वेळ भेटणार नाही म्हणून आत्ताच आम्ही तयारीला लागलो आहोत." ,सुस्मिता म्हणाली . 

" दिवाळी.... निकीताचा चेहरा खाली गेला , तिचे सुटलेले केस तिच्या चेहऱ्यावर आले . घरातिल दिवे चर्र...चर्र..करत चालू बंद होऊ लागले . सुस्मिताने करणला जवळ ओढले . ते निकीताकडे काहीसे भितीपोटी पाहत होते .

निकीता ओरडली," ...ह्या घरात कोणताही सण साजरा होणार नाही , ईथे दुःख आणि वेदना होत्या , ईथे सुख कधीच असणार नाही ." तसे घरातिल काही दिवे फुटले . तिचा चेहेरा आता स्पष्ट दिसत होता . तीच्याकडे पाहुणच ते हादरले. थोड्याच वेळात ती तिथुन दिसेनाशी झाली . थोडा वेळ शांतता पसरली . तेवढयातच करणच्या ओरडण्याचा आवाज आला . 

" आई.... वाचव.." सुस्मिताला एक झटका बसला तिने पकडलेल्या करणला कोणीतरी खेचत होते . सुस्मिताने करणला घट्ट पकडले . निकीता करणला ओढत होती . तिच्या हातातील लांब नखे त्याच्या बाहुत रुतले होते . तेथून रक्त गळत होते . तो प्रकार पाहून सुरेशही मदतीला धावला . पण तिने करणला ओढुन दुर फेकले .   करण मागे जाऊन पडला . सुस्मिताही त्याला उचलन्यासाठी तिथे धावली . त्यांच्या मदतीला येणाऱ्या सुरेशला जोराचा धक्का बसला तो काही अंतरावर जाऊन पडला . तिथलाच सोफा हवेत उचलला गेला तो नेमका जाऊन सुरेशवर पडला , तो त्याच्या खाली दाबला गेला . सुरेशने . एक किंकाळी फोडली . त्याने हलन्याचा प्रयत्न केला .पण तो वजनी सोफ्याखाली दडपला गेला होता .  निकीता हळूहळू करण व सुस्मिताच्या दिशेने जाऊ लागली . तिने हात पुढे केला तिच्या हातात एक लोखंडी रॉड येऊन स्थिरावली . 

सुस्मिताने मागे वळून पाहिले . समोरच निकीता उभी होती . तिच्या त्या विदृप चेहऱ्यावर एक भेसुर हास्य होते . तिने रॉड हवेत फिरवली . घडणाऱ्या घटनेकडे सुरेश हताशपणे पाहत होता . त्याच्या डोळ्यातुन आसवे ओंघळत होती . हवेत उचललेली रॉडने सुस्मितावर एक जोरदार वार केला  . ती ती खाली पडली . करण आपल्या बहिणीच्या ह्या अवताराला पाहून मोठमोठ्याने रडत होता.

समोरच्याच काचेच्या खिडकीतून बाहेरील दिव्याचा प्रकाश  आत येत होता . बेसुध्द पडलेल्या आपल्या आईवर वार करण्यासाठी . निकीताने रॉड उचलली पण तेवढ्यात तिथे एक मोठा आवाज निर्माण झाला व लख्ख प्रकाश . निकीता जोरत हवेत उडाली ती थेट काचेची खिडकी फोडुन खाली  आपटली . सुरेशला काय होत आहे ह्याची काहीच कल्पना येत नव्हती . पण तेवढ्यात त्याची नजर दरवाजावर गेली . तिथे डॉक्टर आणि त्यांच्यासोबत आणखी कोणीतरी उभे होते .  नितेश व रुद्र घरात शिरले . नितेशने लगेचच  रुग्नवाहिकेला  (ॲम्ब्युलन्स)फोन केला . दोघेही आत आले आधी त्यांनी सोफ्याखाली अडकलेल्या सुरेशला सोडवले . नंतर ते सुस्मितापाशी आले . सुस्मिता बेसुध्द झाली होती . तिच्या डोक्याला एक खोल जखम झाली होती व त्यातून रक्त वाहत होते . करणलाही जागोजागी जखमा झाल्या होत्या . काही वेळातच रुग्नवाहिका आली  दोघांनाही त्यात टाकले . 

रुद्र , नितेश व सुरेश परत एकदा घरात शिरले . ते त्या जागेवर आले जिथुन निकीता खाली पडली होती . तिघांनी खाली डोकावून पाहिले पण खाली काचांचे तुकडे आणि लाकडी पट्यांशीवाय काहीच नव्हते . घराच्या वरच्या मजल्यावरुन काहीतरी आवाज येत होते .

नितेश," बहुदा ती वरती असावी." 

तिघांची पाऊले उचलली गेली . ते तिघे निकीताच्या खोलीपाशी येऊन थांबले . रुद्राने हळूच दरवाजा ढकलला पण आत कोणीच नव्हते . तिघांनी आत प्रवेश केला . थोडासा खोलीत प्रकाश होता  त्या प्रकाशात त्यांना हवेत तरंगनाऱ्या वस्तू दिशल्याच नाहीत . त्यांना जाणवले की आपल्या आजूबाजूच्या सर्व लहान मोठ्या वस्तू हवेत उचलल्या गेलेल्या आहेत .  ते पुढचे काही पाऊल उचलणार तोच त्या सर्व वस्तू त्याच्यांवर येऊन आदळल्या. त्यांना जागोजागी खरचटले गेले . तोल जाऊन खाली पडलेल्या रुद्रची नजर वरती गेली  छतावर निकीता पालिसारखी चिकटलेली होती . तिच्या विदृप काळवंडलेल्या चेहऱ्यावर एक विचीत्र हास्य पसरले होते . तिघेही सावरून उठले . रुद्राने आपल्या पिशवीत हात घातला त्यातुन एक काचेची बाटली काढली . त्यातील पाणी आपल्या हातात घेतले , त्याने डोळे मिटून काही मंत्र पुटपुटले व ते पाणी निकीतावर भिरकावले निकीता छतावरून सरळ पलंगावर आपटली एक धाब.. असा आवाज झाला . 

सुरेश लगेचच धावला तिथे  गेला , त्याला आपल्या मुलीची काळजी होती. अंधारात निटशे दिसतही नव्हते तोच . सुरेशवर निकीताने कस्यानेतरी वार केला . सुरेश कळवळतच मागे सरकला व खाली पडला . रुद्रही पलंगाजवळ धावला त्याच्या हातात ते मंतरलेले पाणी होतेच पण निकीता काही तेथे नव्हती . रुद्राने इकडे तिकडे आपली मान फिरवली . त्याची नजर सर्वत्र भिरभीरत होती .  खोलीतील दिवा चरचर करत पेटला व पुन्हा विझला . निकीता नितेशच्या मागे उभी असलेली रुद्रला दिसली . 

रुद्र ओरडला ," नितेश ... सांभाळ." पण तोच  नितेशवर  तिने जोरात वार केला नितेश बाजूलाच जाऊन पडला . रुद्र धावला.  त्याने हातातील पाणी तिच्यावर फेकण्यासाठी म्हणुन हात उचलला . पण निकीताने त्याच हातावर लोखंड रॉडने फटका मारला .  रुद्र थोडा खाली वाकला.  ती संधी साधुन निकीताने त्याच्या डोक्यावर वार करण्यासाठी रॉड फिरवली . अगदी वेगात रॉड डोक्याजवळ आली पण रुद्रने ती आपल्या हाताने पकडली .  त्याने लगेच आपल्या काखेत अडकविलेल्या पिशवीत हात घातला  व त्यातून एक दोरा काढून तो हवेत टाकला तो थेट निकीताच्या हाताला घट्ट आवळला .  निकीता ओरडतच खाली कोसळली . तिच्या संपूर्ण शरीरात काळसर आकृती फिरत होती .  रुद्रच्या हातातील लोखंडी रॉड आपोआप नाहीशी झाली.

सुरेश व नीतेश सावरले होते . नितेशच्या डोक्याला मार  लागला होता . तिथे थोडीशी सुज आली होती . 

रुद्रने आपल्या पिशवीतून काचेची मोठी बाटली काढली . 

तेवढयात खाड.. असा मोठा आवाज झाला . खोलीतील काचेची खिडकी फुटली होती .

निकीता तशीच बेशुद्ध पडली होती . आता सर्व काही सुरळीत झाले होते . रुद्रने खाली वाकून परत एकदा सुटलेला दोरा घट्ट बांधला . खोलीतील दिवा पुर्ववत चालू झाला .

सुरेश," निकीता बरी झाली का ?"

रुद्र," त्या दुष्ट शक्तीने तिचे शरीर सोडले आहे  ती काही वेळातच सुध्दीवर येईल . आम्ही उद्या सकाळी पुन्हा येऊ एक काम बाकीच आहे."

अर्धी रात्र झाली होती . साहिल गाढ झोपला होता . तो तुरूंगात होता . त्याच्यावर घरेलू हिस्साचा गुन्हा दाखल होता .  तसेच श्रुती बेपत्ता असल्याने पोलिसांनी त्याला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले होते . समोरच ठेवलेली मातीची घागर मोठा आवाज करत फुटली . त्या आवाजाने साहिल दचकून उठला . घागर फुटली होती व त्यातील पाणी सर्वत्र पसरलेले होते . साहिल घाबरा घुबरा होऊन इकडे तिकडे पाहत होता . त्याला कोपऱ्यात एक काळी सावली‌ दिशली .

" कोण आहे तिथे... कोण आहे?"

ती सावली पुढे सरकली . 

" श्रुती तू.."

"होय मिच!"

श्रुतीच्या आत्म्याने लगेचच साहिलच्या शरीराचा ताबा घेतला . समोरच पडलेली थाळी साहिलने उचलली . ती लोखंडी थाळी त्याने तोंडात  धरली व मधोमध कागद फाडावा तशी फाडली . आता त्याच्या हातात धारदार  पत्रा होता त्याने तो आपल्या मानेवर फिरवायला सुरुवात केली . मानेतून रक्ताच्या सरी बाहेर पडलेल्या . श्रुतीच्या आत्म्याने त्याचे शरीर शोडले होते . साहिल आपली मान पकडत खाली कोसळला तिथेच पाय झाडत त्याचे प्राणपाखरू उठले .

सकाळ होताच . रुद्र व नितेश पुन्हा निकीताच्या घरी आले आधीच सगळे काळजीत त्याची वाट पाहत होते . तिथे पोहोचताच रुद्र म्हणाला," आपण सर्व इतक्या काळजीत का ?"

सुरेश," अजूनही आमच्यावरून संकट ओसरले नाही का?"

रुद्र," तसे नाही आज माझे इथे येण्याचे कारण वेगळे आहे . पुर्वी ह्या घरात राहणाऱ्या एका बाईचा ईथे खुण झाला होता . तिच्याच आत्माने तुम्हाला त्रास दिला . अजूनही तिचा आत्मा मुक्त आहे . तिचे मृत शरीर इथेच कुठेतरी लपविले आहे तेच शोधायचे होते . ते काम रात्री करू शकत नाही म्हणून आता यावे लागले."

त्याच्या गप्पा चालू होत्या तोच दारावरची बेल वाजली . सुस्मिता उठली व तिने दार उघडले . बाहेर पोलिस उभे होते . ते लगेचच आत आले . 

पोलिस अधिकारी सुभाष," आम्हाला माहिती मिळाली आहे की श्रुती नावाची बेपत्ता मुलगी इथेच राहत होती . "

रुद्र," होय तुम्ही झडती घेऊ शकता."

काही हवालदार आत शिरले.

सुभाष," तुम्ही कोण ? ह्या घरात राहता काय ?"

रुद्र," नाही ह्या घरात, ही माणसे राहतात . तुमच्याच प्रमाणे मी सुद्धा श्रुतीचे मृत शरीर सोधायला ईथे आलेलो आहे ."

सुभाष," काय श्रुती मेलेली आहे."

तेवढयात हवालदार बाहेर आले.

," सर... काहीच सापडले नाही."

सुभाष," तुम्ही आत्ताच श्रुतीविसयी बोललात की ती मेलेली आहे , तुम्हाला हे कसे समजले ."

रुद्र," ते महत्त्वाचे नाही , पण साहिल नावाच्या तिच्यासोबत राहणाऱ्या पुरूषाने तिची हत्या केली."

सुभाष," साहिल मी आता विचारनार नाही की तुम्ही त्याला कसे ओळखतात ते पण त्याने काल रात्रीच आत्महत्या केली व त्याने आम्हाला काहीच सांगीतलेले नाही की श्रुतीचा मृतदेह कुठे आहे उलट तो म्हणाला होता की ती परत दिल्लीला गेली होती आपल्या घरी . तिच्या बापाच्या बॅक खात्यात नव्वद हजार रुपये श्रुतीच्या मोबाईद्वारे पाठवण्यात आले होते . म्हणून आमचा पक्का संसय होता की त्यांचाच काहीतरी हात आहे त्यात. असो ज्याप्रमाणे आपण म्हणता तर सिध्द करा."

रुद्र," तसे माझ्याकडे कोणता प्रुफ नाही तुमच्यासाठी , पण मी तुम्हाला तिचा मृतदेह शोधुन देऊ शकतो. चला बाहेर ." 

सुभाषला काहीच कळत नव्हते . की ह्याला इतकी माहिती कशी पण रुद्र कडे पाहून तोही समजला होता की हा साधारण माणूस नाही . म्हणून उगाचच त्याच्यावर संशय नको.

रुद्रने आपल्या पिशवीतून काचेची बाटली बाहेर काढली . ज्यात पांढरा दुर साचला होता . रुद्रने त्यावरील दोरे आधी सोडले व आपले डोळे त्याने मिटले . काही वेळातच त्या बाटलीचे झाकण त्याने उघडले . त्या बाटलीतून पांढरट काही बाहेर पडले . तिथेच घरावर बसलेल्या कावळ्याकडे ते वेगाने गेले . कावळा विचीत्र आवाजात ओरडला त्याचे डोळेही पांढरे झाले . सर्वच जण तो घडणारा प्रकार स्तब्ध होऊन पाहत होते . कावळा काही वेळ हवेत तरंगत होता व उडत जाऊन  बागेतील एका उंचवट्यावर बसला .

रुद्र," तिथे आहे श्रुतीचा मृत्युदेह ." 

रुद्राने परत एकदा आपले डोळे झाकले . कावळा पुर्वीसारखा होऊन तेथून उडून गेला . रुद्राच्या हातेतील काच्याच्या बाटलीत पुर्ववत पांढरा धुर साचला . त्याने ती पहील्यासारखी बंद केली व आपल्या पिशवीत ठेवली .

" सर ईथे काहीतरी आहे ."

हवालदारांनी आपल्या तोंडाला रुमाल लावला . काही वेळातच सुभाष रुदजवळ आला ," आपले फार फार आभार आपण आज मला फार मोठी मदत केली." 

दोघांनी हात मिळवले . 

तिथे ॲम्बूलन्स आली होती . तो कुजलेला सांगाडा खड्यातून बाहेर काढला जात होता . त्याचबरोबर एक माती लागलेला लोखंडी रॉडही."

रुद्र कारमध्ये शिटला रेलुन बसला होता 

नितेश कार चालवत होता . त्याचा चेहेरा अजूनही गंभीर दिशत होता.

रुद्र," का ? काय झाले तू इतका गंभीर का ?"

नितेश," मला एकच गोष्ट समजली नाही , तुला ह्या श्रुतीचा इतिहास कसा समजला ."

रुद्र," जेव्हा काल रात्री तिने माझ्यावर त्या रॉडने हमला केला होता . तेव्हा तो मी हातात पकडला तेव्हाच तिचा भुतकाळ मी पाहिला व तिला तिचा बदला पुर्ण करता यावा म्हणून तिला तेथुन मी जाऊ दिले."

नितेश आचर्य व्यक्त करत म्हणाला,"तुनी तिचा भुतकाळ पाहिला पण कसा ? ," 

रुद्र त्याला काही सांगणार तोच  फोन घनाणला .

रुद्र ," कोण आहे?"

नितेश," अननॉन"

निकीता खाली सोफ्यावर आराम करत बसली होती . समोरच न्युजपेपर पडला होता . कंटाळा करतच तो तिने हातात घेतला . पहिल्याच पानावर बातमी होती .

शहरातील दोन तरुणांचा त्यांच्याच घरात निर्घुण पने खुण खुण्याचा तपास जारी आहे . मेलेल्या दोघांची ओळख पटली आहे एकाचे नाव अनिकेत व दुसऱ्याचे काडूस.....

निकीताने ती बातमी वाचली . तिला दिपालीचे शब्द आठवले ," तुच आता न्याय करु शकतेस तुच..."

.........

इथे रुद्र आणि नितेश आपला निरोप घेत आहेत तरी ते लवकरच येतील पुढील कथेत .