निकीता फार घाबरलेली होती . समोरच तिच्या आई बाबांची खोली होती जिचे दार किल-कीले उघडे होते . निकीताने आपल्या हाताच्या धक्क्याने ते दार लोटले पाहते तर काय ? आत कोणीच नव्हते .
खोलीत आई - बाबा नव्हते की तिचा भाऊ ही नव्हता . आता निकीता खुप हादरली ती जिण्याकडे वळली तर तिची आईही जिण्यावर नव्हती . निकीता धाड धाड जिणा उतरून खाली आली . उजवीकडे काही पावलांच्या अंतरावर घराचे मुख्य प्रवेशद्वार होते पण तीकडे काहीच नव्हते . निकीता लगेच डावीकडे वळाली तिची नजर किचनरूमकडे वळाली , किचन रूम. बंद होते .
आता निकीता चे लक्ष नेहमीच बंद असणाऱ्या खोलीकडे गेली . तिला तिची आई त्याच खोलीच्या दिशेने जातांना दिसली . निकीता वेगात आपल्या आईच्या दिशेने धावली . काही अंतरावरच तिची आई होती , निकीता ने तिला पकडण्यासाठी हातही पुढे केला पण तिची आई खोलीत शिरली . निकीता अगदी जोरात दारावर आपटली व काही अंतरावर मागे जाऊन पडली .
तिच्या डोक्याला अगदी जोरात मार लागला होता . वेदनेची कळ सर्व शरीरात पसरली होती . निकीता वेदनेने कण्हू लागली होती , तिच्या डोळ्यातून अश्रु ओंगळत होते. तिने उठण्याचा प्रयत्न केला पण, तिचा उजवा पाय एकदम टनकला . वेदनेने ती विव्हळली , " आई! ss"
निकीताच्या पायात काहीतरी रुतले होते. तिने आपल्या थरथरत्या हाताने पायात रुतलेली वस्तू काढली . तिने ती निहाळली तो काही चाव्यांचा गूच्छा होता . ज्याला काही प्रमाणात गंज लागला होता व त्याला काही ठिकाणी माती चिकटली होती . तो चाव्यांचा गूच्छा आता निकीताच्या रक्ताने पुर्ण माखला होता .
निकीता कशीबशी उठली. समोरच्याच खोलीचे दार नेहमीच बंद असते कारण त्याची चावी आतापर्यंत सापडलेली नव्हती , परंतु आताच निकीताने आपल्या आईला त्या खोलीत जातांना पाहिले होते . निकीता कशीबशी दारापाशी आली ती आपल्या वेदना गिळू पाहत होती .
एक नजर तिची दारावरील कुलपावर गेली व एक नजर तिने आपल्या हातातील चाव्यांवर टाकली . निकीताचा चेहरा चमकला , हातातील चाव्या याच कुलपाच्या आहेत असे तिला वाटले . लगेच चावी तिने कुलपात घातली आणि फिरवली . काही वेळातच कुलूप खाडकन उघडले गेले . तिने ते दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते काही केल्या उघडेना, निकीता ने आपली पुर्ण ताकद लावली.
दार करर आवाज करुन उघडले . निकीता ने आपल्या आईला शोधण्यासाठी खोलीत प्रवेश केला, तिची नजर संपूर्ण खोलीत भिरभीरली खोली मोठी होती पण तिला एकही खिडकी नव्हती कधीपासून बंद पडलेल्या त्या खोलीत अचाट धुळ साचली होती . जागोजागी कोळ्यांनी जाळे निर्माण केले होते. निकीताची नजर संपूर्ण खोलीत फिरत होती . तिने पलंगाच्या वरती छताकडे पाहीले . समोरचे दृश्य पाहून तिचे संपूर्ण काळीज थरारले , समोरच हवेत एक काळी आकृती तरंगत होती ,तिचे डोळे संपूर्ण लाल होते , तिच्या विद्रुप चेहऱ्यावर एक विचीत्र हास्य पसरलेले होते .
निकीताचे संपूर्ण शरीर भितीने थरथरू लागले होते , ती फारच घाबरलेली होती , तिने भितीने एक मोठी किंकाळी फोडली ती किंकाळी संपूर्ण बंगल्यात घुमली .
तो आवाज एकून आपल्या खोलीत झोपलेले सुरेश आणि सुस्मीता दचकून उठले ते धावतच खाली आले . आपल्या आई वडिलांना पाहून निकीता कशीबशी धावली .ती येऊन आईच्या कुशीत शिरली व ती रडू लागली.
" काय झाले निकीता तू अशी रडतेस का?" सुस्मीताने तिला विचारले , पण निकीता काहीच उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हती . भितीने तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते . दोघांचेही लक्ष त्या उघडलेल्या खोलीकडे गेली आणि खाली सांडलेल्या रक्ताकडे . दोघेही हादरले हा प्रकार नेमका काय आहे ते दोघांच्याही लक्षात येत नव्हते .
दोघांची नजर निकीताच्या रक्ताळलेल्या पायाकडे गेली व सुजलेल्या कपाळाकडे .
सुस्मीता फारच घाबरली ," हे..हे.. सर्व काय आहे बाळ ? हे रक्त आणि हा प्रकार काय आहे ? काय झाले होते ?"
परंतू निकीता काहीच उत्तर देऊ शकली नाही , तिची सुध्द हरपली होती . सुस्मीताला जानवले की निकीताचे संपूर्ण शरीर पुण : खुप तापले होते .ती काळजीने ओरडली ," सुरेश , लवकर गाडी काढ ! " सुस्मीताचा कंठ दाटला होता . तिचे अश्रू अनावर झाले होते . सुरेशही लगेचच आपल्या खोलीकडे धावला . गाडीच्या चाव्या व रडणाऱ्या करणला घेऊन खाली आला . त्यांनी निकीताला कसेबसे आधार देऊन गाडीत बसवले . सुरेशने गाडी वेगात शहराच्या दिशेने पळवली .
........
गाडीने वेग घेतला होता . गाडी शहरात शिरली होती .ती एका प्रायव्हेट रुग्णालयापाशी येऊन थांबली . निकीताला त्यातुन बाहेर काढले व आत नेले .
नर्सने लगेच डॉक्टरला बोलावले. डॉक्टर तिथे आले ते त्या तरुणीला पाहतच राहिले ," किती सुंदर आहे ही मुलगी" म्हणून विचार करत राहिले , त्यांना ती एका नजरेत भाळली होती . " डॉक्टर!", नर्सने आवाज दिला . डॉक्टर भानावर आले . त्यांनी तिला तपासले पायाची जखम फारच खोल होती , त्यातून बऱ्याच प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता . निकीताच्या जखमा बांधन्यात आल्या .
डॉक्टर तिच्या आई वडिलांना घेऊन बाहेर आले .
डॉक्टर," हे सर्व कसे काय घडले , तिची सुध्द हरपण्याचे नेमके कारण काय ? हे कसे घडले. "
सुरेश ," ते आमच्या घरात काहीतरी वि...."
सुरेशचे बोलने पुर्ण होण्या अगोदरच सुस्मीताने त्याचा हात धरला त्याचे बोलणे अडखळले . सुस्मीताने त्याला काही बोलू नकोस म्हणून इशारा केला . ती मध्येच म्हणाली
," अं.. हे तिच्या पायाला खिळ टोचून , ती जिण्यावरून पडली."
तेवढयात नर्स बाहेर आली," मुलगी सुध्दीवर आली आहे, आपण भेटू शकता ."
डॉक्टर," नर्स तिच्या हातापायाला कोणते फॅक्चर वैगरे झाले आहे का?"
"नाही डॉक्टर!"
ते आत आले निकीता सुध्दीवर आली होती. पण तीने आपली मान फिरवली होती . ती काहीच बोलत नव्हती.
डॉक्टर," कशी आहे तब्येत तुझी." तो आवाज एकून निकीता ने आपली मान वळवली . आपल्या समोर उभा असणाऱ्या तरूनाकडे ती पाहतच राहिली .
डॉक्टर ने हात पुढे केला ," हाय , मी नितेश , आपणाला कसे वाटते ते विचारतो ." निकीता ने आपला हात पुढे केला व म्हणाली ," मला बरं वाटते."
सुरेश," डॉक्टर आम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकतो काय?"
नितेश," होय नक्कीच आणि हा माझा फोन नंबर काही अडचण आल्यास लगेच फोन करा."
सुरेश," ठिक आहे."
रात्री तिन वाजेपर्यंत सुरेश आणि सुस्मीता घरी आले होते. सुस्मीताने आपल्या मुलाला खोलीत झोपवले . तिने निकीताला आधार देऊन खोलीत आनले व पलंगावर बसवले.
सुस्मीता , " झोप, आता कसे वाटते."
,"बरं आहे आई !, तू सुद्धा झोप"
," गुड नाईट!"
निकीता ," आई , तो दिवा बंद नको करू!"
," ठिक आहे."
दार लोटून सुस्मीता आपल्या खोलीजवळ आली आत सुरेश नव्हता. सुस्मीता खाली आली तिला घराचे दार उघडेच दिसले , तिने बाहेर डोकावले ,तर सुरेश बाहेर बँचवर बसला होता . सुस्मीता त्याच्या जवळ गेली . ती सुद्धा त्याच्या बाजूला बसली .
सुस्मीता," कसला विचार करतोस सुरेश?"
," दिवसा हे घर किती शांत आणि सुंदर असते ना ? पण रात्री ते किती भयावह वाटते . आपणाला काही अडचण आली तर चालेल परंतु आपल्या मुलांवर नको . ह्या घरात नक्कीच काहीतरी आहे , त्या दिवशी मी काहीतरी पाहिले होते ."
सुस्मीता," तसे काही नसावे सुरेश , तसे काही असेल तर आपण दिवाळीयेण्या अगोदरच ह्या घराची वास्तूशांती करून घेऊया . ठिक आहे!"
," चल आता रात्र फार झाली आहे , उद्या आपणाला उशीर व्हायला नको."
नितेश आपल्या भावासोबत काहीतरी बोलत होता . तेवढयात दारावरची बेल वाजली . नितेशने पटकन जाऊन दार उघडले . बाहेर एक व्यक्ती उभी होती. जिने सुट बुट घातले होते गळ्यात टॉय व अंगावर कोट घातला होता . तो व्यक्ती राजस्थान मधील एक मोठा व्यवसायिक होता .
ती व्यक्ती," रुद्र येथेच राहतात का?"
रुद्र उठला ," होय मी आहे, आत या!"
त्या व्यक्तीने आपल्या बरोबर आलेल्या माणसांना बाहेरच राहण्याचा इशारा केला व ती व्यक्ती आत आली . नितेश ने स्वागत केले," या आत या , इथे बसा ." तो व्यक्ती सोफ्यावर बसला .
," नमस्कार माझे नाव यशवंतराव आहे , मी राजस्थान मध्ये राहतो तिथे माझा मोठा व्यवसाय आहे . ह्या गोष्टीला काहीच दिवस झाले की आमच्या गावात अचानक लहान मुले बेपत्ता होऊ लागले होते . म्हणून लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे धाव घेतली . त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मी माझी माणसे कामाला लावली ती रात्री व दिवसा पाहणारा देऊ लागली , तरी पण गावातून मुले बेपत्ता होत होती . मग आम्ही जागोजागी कॅमेरे बसविले . शेवटी आमच्या तावडीत मुलं चोरणारा हाती लागला . त्याला पाहताच आम्ही सर्व हादरलो कारण तो कोणी माणूस नव्हता किंवा कोणी व्यक्तीही नव्हती, ते एक..."
यशवंतरावांनी समोरच ठेवलेला पाण्याचा ग्लास आपल्या तोंडाला लावला .
नितेश , " तो माणूस नव्हता , कोणी व्यक्तीही नव्हती मग काय होते ते ?"
यशवंतराव," ती एक चेटकीण होती . आम्ही तिला तिथेच जिवंत जाळले कारण आम्हाला भिती होती की ही काही जादू- टोना तर करणार नाही ना ? म्हणून गावकऱ्यांनी वेळ न दवाडता तिला जाळ्यातच जिवंत जाळले."
नितेश," मग ! अडचण काय आहे आपली ? समस्या तर संपली ना?"
" नाही समस्या तर इथून खरी सुरू झाली . काही दिवस तर चांगले गेले पण अचानक तोच प्रकार गावात सुरू झाला . मुले पुन्हा बेपत्ता होऊ लागली. आता हा सर्व काय प्रकार सुरू झाला म्हणून . पुन्हा माझी माणसे डोळ्यात तेल घालून पहारा देऊ लागली . ऐके रात्री नोकर धावतच आला .
" साहेब लवकर चला म्हणून सांगू लागला."
.. मी सुद्धा वेळ न दवडता त्याच्या मागे गेलो . एका खोलीत गावात लावलेल्या कॅमेराचे फुटेज दिसन्याची सोय केली होती तिथेच . फुटेज बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्यात मुले चोरणाऱ्याचा व्हिडिओ होता . ती मुले चोरणारी माझी बायको होती . मी हादरलोच . काही दिवसातच ही बातमी गावभर पसरली . लोक माझ्या बायकोला मारण्यासाठी म्हणून बंगल्यावर आले कसेबसे माझ्या माणसांनी त्यांना रोखून धरले आहे . माझी बायकोही फार विक्षीप्त वागते आहे म्हणून आम्ही तिला एका गुप्त खोलीत बंद केले आहे .", यशवंतराव म्हणाले .
रुद्र," मला तिथेच यावं लागेल ,मला वाटते तुम्ही ज्या बाईला मारले तिचाच आत्मा तिच्यावर हावी झाला आहे."
यशवंतराव," तुम्हाला नेण्यासाठीच आलेलो आहे मी परीस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत लवकर चला, नाही तर गावकऱ्यांना रोकने कठीण होईल."
रुद्र," ठिक आहे मी येतो."
रुद्र पुर्ण तयारी करून यशवंतरावांसोबत निघतो. ह्या वेळी मात्र त्याने नितेशला नेले नाही कारण त्याला दवाखाना सांभाळायचा होता , म्हणून इतक्या दूर त्याला नेने शक्य नव्हते.
आज निकीताला बरे वाटत होते . पण आजही ती कॉलेजला गेलीनव्हती . तिला आईने आज घरीच आराम करण्यास सांगितले होते . तिचे आई-वडील दोघेही कामाला गेले होते व लहान भाऊ साळेत ती आज एकटीच घरी होती . कागद व पेन्सिल घेऊन ती चित्रं रेखाटण्यात मग्न होती . इतक्यात तिला दारावरची बेल वाजण्याचा आवाज एकू येतो .
कोण असेल बरे ह्या वेळेस म्हणून ती दार उघडण्यासाठी खाली आली . तिने दार उघडले तो दारात अनिकेत व त्याचा मित्र काडूस उभा होता .
निकीता," तु ह्या वेळी इथे ?"
अनिकेत," का? आवडले नाही?" अनिकेत हसतच म्हणाला.
निकीता," काय काम आहे तुमचे, निघा इथून ."
असे म्हणत निकीता दरवाजा बंद करू लागली . तोच अनिकेत व त्याच्या मित्राने दरवाजा जोरात ढकलला . निकीता मागे जाऊन कोसळली . तिला आता सर्व परीस्थिती समजली होती . तिला आधीपासूनच माहीत होते की अनिकेत चांगला मुलगा नाही म्हणून ती नेहमीच त्यांच्यापासून सांभाळून असायची, पण आता ती त्यांच्या तावडीत सापडली होती तिने जरी आरडाओरड केला तरी इथे तिचा आवाज ही ऐकणारे कुणी नव्हते . कारण घर शहरी वस्तिपासून दुर होते व आसपासही कोणीच नव्हते .
अनिकेत," तुझ्या मॉम -डॅडचीच जण्याची वाट पाहत होतो आम्ही , फार गर्व आहे ना तुला तुझ्या सौंदर्याचा , आज बघतोच आम्ही कशी वाचतेस तू ."
निकीता," हे काय बोलतोस तू डोके ठिकाणावर आहे काय ? शेवटचे सांगते निघा इथून नाहीतर..."
" नाहीतर काय ?" दोघांनी एक मोठे हास्य केले .
"पकड तिला", आपल्या हातातील कॅमेरा बाजूला फेकत काडूस म्हणाला.
दोघेही तिला पकडण्यासाठी धावले . आतापर्यंत निकीताने आपल्या हातात उचललेली खुर्ची त्यांच्या दिशेने फेकली व ती जिणा चढून वरती पळाली .
" पकड तिला", म्हणून दोघेही तिच्या दिशेने धावले पण तोपर्यंत निकीता जिणा चढून पळालेली होती . दोघेही जिण्याच्या मधोमध आले तोच निकीता समोरच्याच खोलीचतून एक टेबल धक्का देत निघाली व तिने तो टेबल जिण्यावर सोडला . घाईघाईत जिणा चढत असलेल्या त्या दोघांनाही ह्याची कल्पनाच नव्हती तो टेबल नेमका येऊन त्यांच्यावर आदळला मार बसल्याने दोघेही घरंगळत जाऊन खाली कोसळले . ती संधी साधुन निकीता कशीबशी वेगात जिणा उतरून लपण्यासाठी पळाली .
दोघेही कण्हत उठले .
काडूस," नाही सोडणार मी हिला , तो कॅमेरा सांभाळ हिचे संपूर्ण आयुष्यसच बरबाद करतो मी ."
अनिकेत," पण ही लपली कुठे?"
," इथेच कुठेतरी लपली आहे शोध तिला , जाईल कुठे ती?"
दोघांच्याही चेहऱ्यावर एक आसुरी हास्य होते . ते लगेचच खाली आले . त्यांना एका खोलीचे दार हलतांना दिसले .
" ते बघं त्या खोलीत आहे ती."
.........
जास्ती काळजी करू नका पुढचा भाग लवकर येईल... ....