मध्यरात्र उलटून गेली होती. समीरला अचानक जाग आली. कुठे थोड्या वेळापूर्वी त्याचे डोळे लागले होते . त्याला आज काही केल्या झोप येत नव्हती , त्याची बायको मात्र गाढ झोपेत होती.थोडा वेळ गेला असेल तेवढयात त्याला खोलीबाहेर कसला तरी आवाज आला. समीर उठला आणि दारापाशी गेला. त्याने दार उघडले व तो बाहेर डोकावला . बाहेर अंधार होते बहुतेक दिवे बंद केले होते. त्या अंधारात त्याची नजर भिरभिरली , काही अंतरावर त्याला काहीतरी दिसले, काय आहे ते म्हणून समीर निरखू लागला . अचानक त्याला विचीत्र वाटू लागले. आपल्या मागे कोणीतरी आहे असे त्याला वाटले , तो लगेच मागे वळला पण , मागे कुणी नव्हते .तो दार बंद करण्यासाठी वळला , तेवढयात त्याची नजर समोर गेली. त्याला समोर दोन लाल डोळे चमकताना दिसले . तो हादरला कारण ती आकृती त्याच्याकडे सरकत होती. समीरने वेळ न दवडता लगेचच दार बंद केले. धडधडणारे काळीज घेऊन तो आपल्या बिछान्यात शिरला .हे घर समीरने काही दिवसांपूर्वीच घेतले होते. हे घर त्याला स्वस्त दरात मिळाले होते . तरी घर काही लहान व जुने नव्हते . घर मोठे व मॉर्डन होते.घराभोवती सुंदर बगीचा होता तो आवारही फार मोठा होता. घर दोन मजली होते. वरती चार खोल्या होत्या खाली स्वयंपाकघर व एक बंद खोली होती जिच्या चाव्या न मिळाल्यामुळे ती अशीच बंद पडलेली होती . घरात सुरेश , त्याची बायको सुस्मीता , एक सात आठ वर्षाचा मुलगा आणि त्यांची १९-२० वर्षाची मुलगी निकीता होती, आणखी एक मोठी मुलगी होती जी सध्या तिथे नव्हती . शिक्षणासाठी ती परदेशात गेली होती .सुस्मीताने घाईघाईत जेवण बनवून सर्वांसाठी डबे तयार केले . सुरेश ने आवाज दिला ," अग ! किती वेळ लागेल मला उशीर होतोय." सुस्मीता घाईघाईत करणला घेऊन खाली आली .सुरेश," निकीता कुठे आहे ? लवकर सांग तिला उशीर होतोय." सुस्मीता," निकीता येणार नाही ,तिची तब्येत बरी नाही , तिला ताप येतोय म्हणून."सुरेश," ठिक आहे पण तिच्याजवळ अस्या स्थितीत कोणी तरी असने गरजेचे आहे ना ?"सुस्मीता," ती काही लहान नाहीये आणि ताप हलकाच आहे, लवकरच उतरेल."," ठिक आहे तर मग आपण निघुया! " सुरेश हा एका मोठ्या नामांकित कंपनीत एका महत्त्वाच्या स्थानी आपली जबाबदारी बजावत होता . तर सुस्मीता ही एका बँकेत नोकरीला होती आणि त्यांचा मुलगा करण हा सातवीत शिकत होता . निकीता घरात आपल्या खोलीत एकटीच पहुडलेली होती . तिचा ताप आता काही प्रमाणात कमी झाला होता , तिला आता पुर्वीपेक्षा फार बरं वाटत होतं . तिच्या हातात एखादे पुस्तक होते ती ते वाचण्यात मग्न होती . तिला कसलातरी आवाज आला . घरात तर कोणीच नाही आणि हा आवाज कसला . म्हणून ती आपल्या पलंगावरुन उठली. तिने दार उघडले. व तिने आवाजाचा अंदाज घेतला आवाज खालुन येत होता . निकीता जिना उतरून खाली आली.," बहुतेक आवाज स्वयंपाकघरातून येत होता ." निकीता स्वत: शीच म्हणाली . ती स्वयंपाकघराकडे गेली.," संपुर्ण घरात तर कुणीच नाही मग हा आवाज कसला?"," बहुतेक एखादी मांजर आली असावी." निकीताच्या घसाला कोरड पडली होती. तिने पाणी पिण्यासाठी फ्रिज उघडले आणि घाबरून ती मागे सरकली . मागे सरकण्याच्या नादात अडखळून ती खाली धपकन पडली. ती कापऱ्या आवाजत स्वत : शीच म्हणाली," मी फ्रिज मध्ये काहीतरी पाहिले होते , बहुतेक एखाद्या चेहरा होता आणि लाल रक्त सांडले होते. नाही.... नाही ... कदाचीत भाष झाला असावा. " ती पुन्हा उठली हिम्मत करून फ्रिजकडे सरकू लागली. आपल्याच हृदयाची धडधड आता तिला स्पष्ट जाणवू लागली होती. तिने फ्रिजमध्ये डोकावले , आत फळे , भाज्या आणि इतर पदार्था व्यतिरिक्त काहीच नव्हते. निकीता ने पाणी न घेता तसेच फ्रिज बंद केले.निकीता स्वत : चीच समजूत काढत म्हणाली ," माझी तब्येत बरी नाही , म्हणून असा काही विचीत्र भाष झाला असावा . मला अजून ही आरामाची गरज आहे." निकीता स्वत : च्या खोलीत गेली व तिने दार बंद करून घेतले . ती पलंगावर पहुडली . काही वेळ गेला नसेल तोच तिचा फोन घनाणला . तिने फोन हातात घेतला व नंबर पाहताच तिच्या कपाळावर आठ्या पडल्या , तोंड वेडेवाकडे करत ती स्वत : शीच म्हणाली ," आधीच डोके टणकत आहे आणि वरून ही डोकेदुखी , बापरे ! कधी सोडेल हा माझा पिच्छा ." तिने फोन कट केला व बंद करून ठेवला . जवळच पडलेल्या गोळ्या तिने हातात घेतल्या व पाण्याबरोबर घटाघटा प्यायली . काही वेळातच तिला . गाढ झोप लागली .
........
नवी कथा , आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा , धन्यवाद 💐💐🙏🙏👍👍