Badla - Gosht Atyacharachi - 7 in Marathi Horror Stories by DEVGAN Ak books and stories PDF | बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 7

Featured Books
  • ગંગા સ્નાન

    ગંગા સ્નાન "गङ्गा पापं शशी तापं, दैन्यं कल्पतरुस्तथा । पापं...

  • પરંપરા કે પ્રગતિ? - 6

    પોલીસ મેડમ કહે છે: "તું જેના તરફથી માફી માંગી રહી છે શું તે...

  • આઈ કેન સી યુ!! - 3

    અવધિ ને તે પ્રેત હમણાં એ સત્ય સારંગ ના સામે કહેવા માટે કહી ર...

  • મમ્મી એટલે?

    હેપ્પી મધર્સ ડે... પર(સ્કૂલ માં વકૃત સ્પર્ધા હતી)મમ્મી નું મ...

  • ભાગવત રહસ્ય - 278

    ભાગવત રહસ્ય -૨૭૮   પરીક્ષિત કહે છે કે-આ કૃષ્ણકથા સાંભળવાથી ત...

Categories
Share

बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 7

अंधार पडले होते . तरी साहिलचा काहीच पत्ता नव्हता . श्रुती झोपली नव्हती , ती झोपणार तरी कशी तिला आज झोपच येईल तरी कसी तिचे डोळे रडुन रडुन सुजले होते . सोहम आपला विश्वासीघात करेलच कसा ? पण तिने जे काही ऐकले होते व पाहिले होते त्यावर तर ती विश्वास ठेवू शकत होती . 

अचानक दार उघडल्याचा आवाज आला . सोहम हळूच दारातून आत आला व त्याने आवाज न करता दरवाजाही बंद केला . तो मागे फिरला तर समोरच श्रुतीला उभे पाहून तो एकदम दचकला.

" तु झोपली नाहीस अजून ? ", सोहमने एक आवंढा गिळतच शब्द बाहेर काढले .

" तु असा निघसील मला कधीच वाटले नव्हते , मी तुझ्यावर विश्वास ठेवून माझे सख्खे आई वडील माझा भाऊ, माझे सर्व कुटुंब कायमचे सोडून आले आणि तुनी माझा विश्र्वासघात केलासश . तुला माहित आहे काय ? तुनी माझेच आयुष्य उद्ध्वस्त केले नाहीस तर ज्या ज्या मुलींसोबत तुझे संबंध आहेत त्यांचेही आयुष्य तुनी बरबाद केले आहेस कारण , त्यांनी सुध्दा तुझ्यावर माझ्यासारखाच विश्वास ठेवला असेल .", श्रुतीच्या डोळ्यातून आसवे ओंघळत होती अस्यातच ती सोहमशी बोलत होती . 

सोहम सावरत म्हणाला," बघ ! श्रुती तु जे काही बोलतेस तो सर्व तुझा गैरसमज आहे . अगं , मी तुझ्याशीवाय कुणा दुसऱ्याचा विचारच करूच शकत नाही."

" अच्छा मग हे काय आहे आणि तुझ्याजवळ इतके पैसे तरी येतात कसे ते आज मला समजले.", असे म्हणत श्रुतीने एक पॅनड्राईव्ह काढली .

ती पॅनड्राईव्ह बघताच साहिलच्या हालचाली बदलल्या, "श्रुती ती पॅनड्राईव्ह आण ईकडे... मी... म्हणतो आण..."

श्रुती," तुझा खरा चेहरा आज मला कळला , तुझ्यासोबत राहुन खरच मी स्वत: ला विटाळून घेतले , असे वाटते की तुझ्यावर विश्वास ठेवून मी फार मोठे पाप केले परंतु आता जाता जाता एकतरी चांगले काम करूच शकते ना ? तुनी आजपर्यंत कितीतरी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले पण आता ह्या पुढे करुच शकणार नाहीस कारण ही पॅनड्राईव्ह मी पोलीसांच्या हाती देनार आहे." श्रुती आपले डोळे पुसत म्हणाली  व जाण्यासाठी मागे वळली . तोच साहिलने तिचा हात पकडला," ती पॅनड्राईव्ह मला दे..." सोहम रागातच म्हणाला .

" मी म्हणते माझा हात सोड.... मला तुझा किळस येतो माझा हात सोड सोहम.." पण सोहमने तिचा हात घट्ट आवळला . श्रुती गार्रकन फिरली व सोहमच्या कानाखाली तिने एक जोरदार थप्पड हानली , त्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला . श्रुती मागे वळली व आपल्या खोलीत शिरली . सोहम रागाने थरथरत होता , त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता .

श्रुतीने आधीच आपले सर्व सामान आवरु ठेवले होते तिने आपल्या सुटकेस उचलल्या व खोलीबाहेर पडली ती हळूच जिना उतरू लागली तिथे खोलीच्या बाजूला उभा असलेला सोहम तिला दिसलाच नाही . पाठमोऱ्या जिणा उतरनाऱ्या श्रुतीच्या पाठीत सोहमने एक जोरदार लाथ हानली . त्या माराने श्रुती जिण्यावरून कोसळली . तिच्या डोक्याला व हाता पायाला पुष्कळ मार लागला होता .ती जोरात खाली आपटल्यामुळे तिची सुध्द हरपली .

श्रुतीला खुप वेदना जाणवू लागल्या तिने विव्हळतच उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उठनेही जमले नाही. ती हळूहळू सुध्दीवर येवू लागली . तिला जाणवले की तिचे हात व पाय घट्ट बांधन्यात आले आहेत तसेच तिच्या तोंडावरही पट्टी बांधलेली होती . तिच्या डोक्यातून रक्त वाहून सुकलेले होते . तिने धडपड करून उठण्याचा प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही ती तसीच पडली . कितीतरी वेळ निघून गेला होता . श्रुतीला फार भुक लागली होती व तिचा गळाही कोरडा पडला होता . तिला रातकिड्यांचे आवाजही ऐकू येत होते . तेवढयात दार उघडले गेले . सोहम डुलत डुलत आत आला . तो पुर्ण माजला होता , त्याच्या हातात एक लोखंडी रॉड होती .

" साली , मला मारतेस काय ? ", असे म्हणत तो रॉडने तिला मारू लागला . तोंडावर पट्टी बांधलेली होती त्यामुळे श्रुतीला ओरडनेही जमत नव्हते ती पलंगावरतीच विव्हिळत होती .

तिला मारुन मारुन  थकल्यावर .  सोहम तिथल्याच खुर्चीर बसला व तिच्या विव्हळण्याकडे व तडफड कडे पाहत हसत होता त्याला एक प्रकारचा आसुरी आनंद होत होता . 

" होय मी तुझा विश्र्वासघात केला . हा....हा...हा....

आणि त्याचसोबत हे घर आता माझे झाले आणि पैसांचे काय ? मी असाच श्रिमंत मुलींना आपल्या जाळ्यात फसवीन आणि त्यांचे MMS बनवून त्यांना लुबाडेन .", तो परत एकदा आसुरीपणे हसू लागला .

दिवस जात होते . दोन दिवसांपासुन श्रुतीच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता की पाण्यांचा एक थेंब . तिला फारच असक्तपणा जानवत होता .तिचे शरीरही कृष झाले होते . वरुन सोहमचा मिळणारा मार ह्यामुळे तर ती अर्धमेली झाली होती . अचानक श्रुतीला कसलातरी आवाज आला . तिने उठण्याचा प्रयत्न केला . पण ती जोरात पलंगाखाली आपटली . तिला जोरात मार बसला होता . पण आता तिला वेदना काहीच जाणवत नव्हती . ती कशीबशी सरकत दरवाजापाशी गेली . तिला मदतीची आश होती कोणीतरी बाहेर आहे व ते नक्कीच मला मदत करेल असा विचार करून . त्याही अवस्थेत श्रुती तिथपर्यंत गेली होती .  ती थरथरत दाराला रेलून उभी उठली बाहेर कोणातरी मुलीचा आवाज येत होता . आणि त्याचबरोबर सोहमचाही . 

श्रुती थरथरत्या पायाने दाराला टेकून उभी  होती  , अशक्तपणामुळे तिला काही वेळातच ग्लानी आली व ती येथेच कोसळली .

केव्हातरी श्रुतीला जाग आली  . समोरच सोहम उभा होता . तिने कसेबसे आपले डोळे उघडले . 

" जिवंत आहेस अजून मला वाटले मेली की काय .... उठ ..उठ..भुक लागलेय का ?", सोहम तिचे हात व तोंडावरची पट्टी सोडतच म्हणाला.

श्रुतीच्या तोंडातून कसेबसे काही शब्द बाहेर पडले," तु मला ..मारुन का टाकत नाहीस एवढा ... त्रास देण्यापेक्षा ..तिन दिवस झाले मी काही खाल्ले नाही...."

सोहम हसत होता ," ते काय आहे ना ? ... आपल्या शत्रुला असे सहजा सहजी मारण्यात ना काहीच मज्जा नसते .... थांब तुला भुक लागलेय ना मी काहीतरी आनतो . " असे म्हणत सोहम बाहेर गेला . त्याने एक प्लेट आनली त्यात जेवण होते . श्रुतीसमोर ती प्लेट ठेवत तो म्हणाला," मरणाऱ्याची शेवटची ईच्छा पुर्ण केली जाते हे घे!" 

सोहम समोरच्याच खुर्चीवर जाऊन बसला . त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला होता , आता ही पुढे काय करते ते त्याला पाहायचे होते .

" मी...मी.. नॉनव्हेज खात नाही तुला माहित आहे नारे..." श्रुती कसीतरी म्हणाली.

सोहम हसतच म्हणाला," माफ कर श्रुती पन माझ्याकडे दुसरे काहीच नाही तुला देण्यासारखे."

श्रुती," मी एक वेळ मृत्यू कवटाळेल पण हे खाणार नाही.."

" ओ ..श्रुती तुझा हात उठत नाही का आता ओह!  तर तुला भरवावे लागेल तर." असे म्हणत सोहम श्रुतीजवळ आला त्याने एक मांसाचा तुकडा उचलला व जबरदस्तीने श्रुतीला भरवू लागला . श्रुती काही केल्या खात नव्हती . अचानक सोहमने विव्हळत हात मागे घेतला .

" ओह!.. किती जोरात चावलीस तु माझ्या हाताला.", सोहम तिच्याकडे पाहत हसतच म्हणाला , कारण तिच्या तोंडात मांसाचा तुकडा होता . श्रुतीने ते सर्व हसणाऱ्या सोहमच्या तोंडावर थुंकले .

" घानेरड्या....", श्रुती म्हणाली .

सोहमचे सर्व हसने ओसरले . तो एकटक हसण्याचा प्रयत्न करू पाणाऱ्या श्रुतीकडे पाहत होता . त्याचे शरीरही रागाने थरथरत होते .

त्याने जोरात एक थप्पड हानली  व जवळच पडलेला लोखंडी रॉड त्याने उचलला .

" साली .. हरामखोर..", म्हणून तो तिच्यावर ओरडला व बेभानपणे तो तिच्या डोक्यावर वार करू लागला, अगदी बेभानपणे . संपूर्ण पलंग रक्ताने नाव्हुन निघाला होता .  शेवटी थकून त्याने रॉड खाली टाकली ती घरंगळत पलंगाखाली गेली . त्याने श्रुतीचे शरीर तिथेच घरासमोरच्या बगीच्यात पुरले . त्याने सर्व सबुत नष्ट केले व खोलीला एक मजबूत लॉक बसवले . ह्या घटनेनंतर त्या घरात त्याला एकही क्षण काढने कठीण जात होते , त्याला ते घर विकायचे होते , तो पुन्हा एकदा श्रुतीसारख्या सावजाच्या शोधात होता. 

......

माफ करा मित्रांनो हे असे लिहिले गेले म्हणून . पण हे जग कसे आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती ठाऊक असेल .

एक लक्षात घ्यावे कथेद्वारे कोणत्याही धर्माचा किंवा इतर कोणाचा अपमान करण्याचा कोणताच उद्देश नाहीये .

तरी काही चुकले असेल तर माफ करा .

.........

" आई .... आई... " निकीताच्या खोलीमधून ओरडण्याचा आवाज आला . आता कुठे तांबड फुटत होते व सुस्मिता स्वंयपाक घरातच होती . निकीताचे ओरडने ऐकताच ती वरती धावली व सरळ तिच्या खोलीत शिरली. निकीता भेदरली होती व बांधलेले हात पाय सोडवण्यासाठी धडपडत होती . सुस्मिताला खोलीत पाहताच ती म्हणाली," आई ! मला असे बांधून का ठेवले आहे? आई सोड नाग मला हात पाय दुखत आहेत ." आपल्या मुलीला बरं वाटतेय हे पाहून सुस्मिताला आनंद झाला तिने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला . निकीताचे ओरडने एकूण सुरेश सुध्दा धावतच तिच्या खोलीत आला होता  . सुरेशला पाहताच सुस्मिता त्याच्याजवळ गेली . " बघ सुरेश आपली मुलगी बरी झाली आहे.", सुस्मिता आपले रडू आवरतच म्हणाली . "आई ! मला काय झाले आहे? .. अगं आई सोड नाग लवकर ...दुखतंय " निकीता रडवलेला चेहरा करत म्हणाली ." थांब हं बाळा सोडतो." असे म्हणत दोघेही दोरी सोडू लागले." आई , मला असे बांधले का आहे ? ", निकीताने प्रश्न विचारला . तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सुस्मिता सुरेशला म्हणाली ," सुरेश त्या डॉक्टरांना फोन लाव एकदा त्यांनाही चेक करून घेऊ दे."निकीता थोड्या रागातच," म्हणजे त्या डॉक्टरांनी मला बांधायला सांगितले होते काय ? थांब मी त्याला बघतेच." सुस्मिता," अगं तसे काही नाही , वेळ आल्यावर तुला सगळे सांगतेच आधी तू फ्रेश हो बघू !"निकीता फ्रेश  झाली होती . तिने आपल्या अंगावर . एक पांढरा फ्रोक घातला , ती त्यात अत्यंत सुंदर दिसत होती . सुस्मिता व सुरेश डॉक्टरना घेऊन तिच्या खोलीत आले . नितेश तर तिच्या देखण्या रुपाकडे पाहतच राहिला त्याने कसेतरी स्वत: ला सावरले त्याने तिला चेक केले , त्याला सर्व काही नॉर्मल जानवले . काळजीत दिसणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांकडे फिरत नितेश म्हणाला ," काळजी करण्यासारखे काही कारण नाही मला वाटते सर्व काही चांगले झाले आहे."ते सर्व खाली आले नितेश निघणार तोच सुस्मिता म्हणाली," डॉक्टर नास्ता करून जा."" नाही नको , पुन्हा कधीतरी . आज खुप काम आहे मला लवकर जावे लागेल .", म्हणत नितेश घाईघाईत निघून गेला .सुस्मिता व सुरेश खाली सोफ्यावर काहीतरी बोलत बसले होते . समोरच करण आपल्या खेळण्यांसोबत खेळत होता . " आई मला बाहेर जायचे आहे , मला आठवत सुध्दा नाही का मी कधी घराबाहेर पडले होते किंवा नाही.", निकीता म्हणाली . " तु विचारतेस कसली जा की , आज खुप फिर", आपल्या खिशातून गाडीच्या चाव्या काढत सुरेश म्हणाला . निकीताने त्या चाव्या घेतल्या व सर्वांना बाय करत ती बाहेर पडली. तिने कार काढली व वेगात शहराच्या दिशेने पळवली .

"चढली का नशा तिला ?", खोलीतून हलकेच डोकावत काडुस म्हणाला . " होय , ये बाहेर असा कसा घबरतोस तू ", अनिकेत हसतच म्हणाला . आज बऱ्याच दिवसांनी त्यानी एका मुलीला फसवले होते . तिला घरी बोलावून तिला नशेची गोळी पाजली होती . ती मुलगी तिथे पलंगावर पेंगत पडली होती . दोघेही राक्षसा सारखे हसत सुटले होते . आज आभाळा पुर्ण भरुन आले  होते . बाहेर वारा जबर भिरभिरत सुटला होता . अचानक खोलीतील विज गेली ." अरे ह्या विजेला काय झाले ? ", अनिकेत म्हणाला ." वादळ किती सुटले आहे . म्हणून कट् झाली असेल वीज .", काडूस म्हणाला .त्या खोलीत किंचित अंधार पसरला होता . तोच हॉल मध्ये  काहीतरी आपटण्याचा आवाज आला . तसे दोघेही दचकले ." जाय बघ काय झाले आहे ते !", काडूस अनिकेतला उद्देशून म्हणाला .आपल्या धडधडत्या हृदयाने अनिकेत बाहेर पडला . हॉल मध्ये टेबलावरील फुलदाणी खाली पडून फुटली होती . अचानक दरवाजा खाड...खाड... करून जोरात हलू लागला . " अरे काय झाले ? ", काडूस तिथे येऊन पोहचला होता ." बघं दरवाजा कोणीतरी जोरात ठोठावत आहे .", एक आवंढा गिळत अनिकेत म्हणाला .त्यांची पाऊले हळूच दरवाजाच्या दिशेने उचलली गेली .  दरवाजा पुर्वीपेक्षा अधिक जोरात वाजत होता . अनिकेतने कडीला हात घातला . काडूस आपला श्वास रोखून दरवाजाकडे पाहत उभा होता .अनिकेतने जशी दरवाजाची कडी उघडली . तसा दरवाजा सर्र... करून उघडला . एक हवेची ताकतवर झोका आतमध्ये शिरला होता . दरवाजा धडाडला धड़् .... आपल्या तोंडावर हात घेत अनिकेत त्या झोक्याने मागे जाऊन आपटला .  हवा इतकी जोरदार होती की घरातील लहान मोठ्या वस्तू थरथरत नाचत होत्या . डायनिंग टेबलवरील प्लेट आणि काचेचे ग्लास थरथरत खाली आपटून फुटले . भिंतीला टांगलेले कॅलेंडर आणि फोटो खाली कोसळले . कॅलेंडर कोपऱ्यात जाऊन भिंतीला अडकून बसले होते .काडूस कसातरी धावला व आपली संपूर्ण दाकद एकवटून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करू लागला . अनिकेत ही त्याच्या मदतीला धावला . मोठी कसरत करून दोघांनी दरवाजा बंद केला ." हाय सुटलो !", दोघेही दरवाजाला रेलून उभे होते .घरातील वातावरणही एकदम शांत झाले होते .तेवढ्यात बाजूच्या खोलीतील दरवाजा करारला . " हे चालले काय आहे आज ? ", अनिकेत एकदम गोंधळून ओरडला ."थांब मी जाऊन बघतो .", म्हणत काडूस पुढे सरसावला .गोंधळलेल्या नजरेने पाहत अनिकेत  तिथेच खिळून राहिला .काडूसने दरवाजा लोटला व आतमध्ये प्रवेश‌ केला . खोलीत त्याची नजर भिरभिरू लागली .  कोपऱ्यात काहीतरी त्याला जाणवले.‌ तिथे अंधार पसरले होते .काडूस दोन पाऊले पुढे सरकला . तोच दरवाजा आपोआप एका क्षणात बंद झाला. कधीही न घाबरणारा काडूस एकदम दचकून उठला . त्याचे हृदय धडधडत होते , कपाळावर भितीने घाम जमा झाला होता . तेवढ्यात कोपऱ्यातून रडण्याचा आवाज आला . तसा काडूस घाबरून गेला . कोणीतरी कोपऱ्यात आपले डोके पायात खुपसून बसले होते आणि त्याच्याच तोंडातून रडण्याचा आवाज येत होता ." कोण आहे ?", आपल्या धडधडत्या हृदयाने एक आवंढा गिळत काडूस थोड्या‌ मोठ्या आवाजात म्हणाला .तो थोडे पुढे गेला तोच त्याची पाऊले जागची थांबली .कोणीतरी स्त्री आपले डोके पायात खुपसून बसली होती . अधुन मधुन ती रडत होती . तिचे केस खाली पसरले होते ." कोण आहेस तू ?", काडूसने घाबरत विचारले ." तू मृत्यूचे नाव ऐकलेच असशील .", एक हसण्याचा आवाज तिथे घुमला . तिने आपले डोके वरती उचलले . तिचे लाल डोळे काडूसवर खिळले होते .काडूस घाबरून मागे सरकला व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला . " अरे काय झाले ?", तिकडून अनिकेतचा आवाज आला ." अनिकेत वाचव मला ... एकाच  वेळी काडूसच्या ओरडण्याचा आवाज आला . अनिकेत घाबरून मागे सरकला . खोलीत विचीत्र आवाज आणि खन् ...खन्....काहीतरी आपटण्याचा आवाज येत होता .दाराच्या फटीतून रक्ताचा पाट वाहत बाहेर आला . तसा अनिकेत घाबरून उठला . तो काही करणार तोच दरवाजा खाडकरून उघडला .मोरच काडूसचा विक्षीप्त मृतदेह पडलेला होता . डोक्यातून मेंदू आणि रक्त बाहेर पडले होते . अनिकेतचे संपूर्ण अंग ते भयानक दृश्य पाहून शहारून उठले .समोरच एक पांढरा फ्रॉक घातलेली बाई उभी होती . तिचा तो पांढराशुभ्र फ्रॉक रक्ताने लाल झाला होता .अनिकेत एकटक तिच्याकडे थरथरत पाहत उभा होता ." निकीता....तू...तू !", एक उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडला ." होय घानेरड्या....खी....खी...खी....भेसूर हसत ती अनिकेतवर धावून गेली . एकवेळ तिच्या मैत्रिणींचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला . जिने ह्या दोघां मुळे आत्महत्या केली होती . तिच्यातच श्रुतीचा हात्माही सामावलेला होता . जिच्या नजरेसमोर अनिकेत नाही तर सोहम उभा होता . पुढच्याच क्षणी तिने पळणाऱ्या अनिकेतच्या डोक्यावर आपल्या हातातील लोखंडी रॉडने जोरदार वार केला . तो वार खुपचं जोरदार होता . त्यासरशी तिथे रक्ताची चिळकांडी उठली .

" उठ ... पलंगावर पडलेल्या मुलीला निकीता ने हात दिला . ती हळूहळू शुध्दीवर आली होती . ती तरुणी ओक्साबोक्शी रडू लागली होती ." घाबरू नकोस तुला काही एक झालेले नाहीये . ह्या आधी की काही गडबड होईल तू आपल्या घरी निघून जा !", निकीता म्हणाली ." तू कोण आहेस ?", निकीताच्या तोंडावर ओढणी बांधली होती म्हणून ती तरुणी तिला ओळखू शकली नव्हती." ते महत्त्वाचे नाही . चल लवकर .", म्हणत निकीता ने तिला घरातून बाहेर काढले .निकीता ने आपल्या अंगावरील तो रक्ताळलेला फ्रॉक बदलून घेतला . कार धावत होती . ती निकीता होती मात्र , पुर्णपणे नाही . तिच्यात श्रुती अजुनही घर करून होती .

आता ही श्रुती पुढे काय करेल ?  बघुया पुढच्या भागात .

( माफ करा वाचकांनो कथा पुर्ण करायला खुप वेळ घेतली पण जसा हा भाग इथे आपटेल तसे , लास्ट पार्ट मी वाटेस लावीन तिथं म्हणजे पाठवेन ....

धन्यवाद 🙏 🙏👍👍💐💐💐