Badla - Gosht Atyacharachi - 4 in Marathi Horror Stories by DEVGAN Ak books and stories PDF | बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 4

Featured Books
Categories
Share

बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 4

त्या दोघांची पाऊले त्या खोलीच्या दिशेने जात होती . खोलीजवळ  येताच काडुसने दार जोरात ढकलले . दोघेही खोलीत शिरले , पण आत कोणीच नव्हते. 

काडूस," कुठे गेली ती ?  किती धुळ साचली आहे खोलीत ."

दोघेही खोलीभर फिरले पण त्यांना काहीच सापडले नाही.

काडूस," ती इथे नाही , चल लवकर बाहेर शोधू नाहीतर हातीतून निसटेल ती आणि पुढे आपल्यालाच अडचण निर्माण करेल ."

" कुठे जाण्याची गरज नाहीये मित्रा .....", काहीतरी लक्षपूर्वक पाहत अनिकेत म्हणाला . तो लगेच खाली वाकला व पलंगाखाली डोकावला . 

"हा... हा.. हा इथे आहेस तर तू ?"

निकीता पलंगाखाली लपली होती अनिकेतला पाहताच ती एकदम घाबरली . भितीने तिच्या मेंदूनेच आता काम करणे बंद केले होते . ती बावचळली आणि तेवढ्यातच तिच्या हाताला काहीतरी लागले . तिच्या शरीरातून एक विजेची लहर निघून गेली . वेळ न दवाडता तिने हातात लागलेल्या वस्तूने अनिकेतच्या डोक्यावर हानली एक खन... असा आवाज खोलीत घुमला . वेदनेने विव्हळत अनिकेत खाली कोसळला  त्याने आपला उजवा हात कपाळावर दाबला होता काही क्षणातच तो हात रक्ताने लाल झाला .

काडूस अनिकेतकडे पाहतच राहिला . त्याची जखम बघून आधीच तापलेल्या काडूसाचे डोळे लाल झाले तो रागाने भडकला . 

"साली... तुझी ही हिम्मत .... असे ओरडत तो खाली वाकला व निकीताच्या पायाला धरून त्याने तिला सर्र....कन ओढले . निकीता बाहेर ओढली गेली . पण आता तिच्या डोळ्यात जराही भिती नव्हती , मात्र चेहऱ्यावर एक हस्याची रेघ पसरली होती . तिने बाहेर पडताच काडूसच्या छातित एक जोरदार लाथ हानली त्या सरशी तो भिंतीवर जोरात आदळला . तो आदळला तितक्याच वेगाने पुढे ढकलला गेला . तो खाली कोसळणार इतक्यात त्याच्या डोक्यावर एक जोरदार वार निकीताने केला . तसा तो बाजूला जाऊन पडला . 

काडूसला जेकाही घडत होते ते अनपेक्षित होते . तो स्वतः एक खुंखार गुंड होता भल्याभल्यांची त्यांच्या पुढे पॅन्ट ओली व्हायची  , आज तो पहिल्यांदाच कोणाकडून तरी मार खात होता तोही एका बाईकडून . 

स्वत : ला सावरत कसाबसा काडूस उठला . त्याने आपल्या कंबरेला खोसलेला एक धारदार सुरा काढला . त्याला जाणवले की आपल्या तोंडावर काहीतरी गरमगरम ओंघळत आहे . त्याने आपला हात तोंडावर फिरवला . त्याच्या हाताला रक्त माखले . त्याचे हात पाय आता थरथरू लागले होते .  त्याच्या हातातला सुरा भितीने गळून पडला . तो तसाच बाहेर धावत गेला . आपल्या मित्राची अशी अवस्था बघून . अनिकेतचे तर भानच हरपले तो कसाबसा धडपडत खोलीबाहेर पडला . 

निकीता हळूहळू हवेत उचलली गेली . तिने एक जोरदार हास्य करत आपला आनंद व्यक्त केला ही...ही...ही..

निकीता खाली कोसळली तिची सुध्द संपूर्ण पने हरपली गेली . तिच्या हातात असनारी लोखंडी रॉड पलंगाखाली घरंगळत निघून गेली .

"किती दिवस हे असे चालनार ? नाही  कॉलेज , नाही इतर काही , मला तर टेंशन आली आहे , आज सुध्दा कसी पडली होती?", सुरेश. 

सुस्मिता ," सुरेश उगाचच का चिडतोस तिच्यावर तिची तब्येत बरी नाही ना ? आणि तसेही आजपासून तिच्या कॉलेजला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत . मी स्वता : जाऊन भेटले प्रिन्सीपलला ."

सुरेश ," अगं ! माफ कर मला  , रागात काहीही बोलून जातो तसेही ती आता मोठी झाली आहे पण आपल्यालाच नुसती तिची काळजी करावी लागते  ."

" घाबरू नकोस कोणीतरी भेटेल तिला तिची काळजी करणारा , आता डॉक्टर येतिलच." सुस्मिता हसतच म्हणाली . 

नितेश काळजीतच निकीताच्या खोलीत शिरला एक वेळ तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला  . त्याने निकीताला चेक केले .

नितेश खाली आला तसे सुरेशने विचारले ," कशी आहे , नेमके काय झाले आहे तिला ?" 

"काय झाले आहे ते तर सांगता येणार नाही ? परंतु काळजी घेऊ नका ती लवकरच सुध्दीवर येईल, " नितेश म्हणाला व तिथून बाहेर पडला .

निकीता सुध्दीवर आली . तिने कसे बसे जड पडलेले डोळे उघडले . संपूर्ण शरीर आखडत होते . तिने समोर पाहिले तर तिची आई बसलेली होती .  निकीताला सुध्दीवर आलेले पाहताच तिच्या आईला फार आनंद झाला . ती लगेच आपल्या जागेवरून उठली व निकीता जवळ गेली .

सुस्मिता," कशी आहेस बाळा ? चल थोडे जेऊन घे तुला बरं वाटेल ."

निकीता अगदी सावकाश बोलली ," मी फ्रेश होऊन येते."

सुस्मिता उठली ," ठिक आहे फ्रेश होऊन खाली ये ." असे म्हणत ती निकिताच्या खोलीबाहेर पडली. निकीता बाथरूममध्ये शिरली कितीतरी वेळ ती टबमध्ये पडून राहिली .

"अगं !  किती वेळ लागणार हिला ,इथे भुकेने माझ्या पोटात थैमान घातला आहे", सुरेश आपले पोट चोळत म्हणाला . तो एकटक जेवणाऱ्या करणकडे पाहत होता.

"ती बघ आली", असे म्हणत सुस्मीताने सुरेशला इशारा केला . निकीता अगदी सावकाश जिणा उतरत होती , जनू काही तिच्या वर कोणीतरी एखाद्या भार लादला आहे .

निकीता  आपल्या खुर्चीवर येऊन बसली . 

सुरेश ," किती सावकाश चालतेस तू आणि इतका वेळ लावलास आणखी वेळ झाला असता तर..." बोलता बोलता. सुरेशची नजर सुस्मितावर गेली ती रागानेच त्यांच्याकडे बघत होती . ते पाहून सुरेश गप्प बसला . निकीता मात्र खाली मान घालून बसली होती .

"आई ! माझे जेवण झाले ", असे म्हणत करण उठला व धावतच जिना चढू लागला .

" अरे! सावकाश जा ", सुस्मिता त्याला  ओरडली . तिने प्लेटमध्ये जेवण वाढले . सुरेशला आधीच फार भुक लागली होती तो अधासासारखा खाऊ लागला . थोड्या वेळातच त्याचे लक्ष निकीताकडे गेले पण निकीता आपल्या जागेवर नव्हती .

" अगं गेली कुठे ही इतक्यात , काही खाल्ले का नाही तिने ?", सुरेश आचर्य व्यक्त करत म्हणाला .

सुस्मिता हसली ," अहो खाल्ले ना दोन वेळा तर मागीतले तिने ."

"काय ?... सुरेशने एक वेळ निकीताच्या खरकट्या प्लेटकडे टाकली , " थोडी विचीत्र नाही का वागत ती  इतक्यात तर बसलो होतो आपण?" 

सुस्मिता ," विचीत्र तर आपण लागताहेत असे वाटते मला."

रात्रीचे नऊ वाजले सुस्मिता दुध घेऊन निकीताच्या खोलीत गेली . तिला वाटले होते की ही अजून पर्यंत झोपली नसेल . पण निकीता अंथरूणात शिरली होती . 

" नेहमी तर वाट पाहते माझी आज कसी झोपली  ?", सुस्मिता स्वत : शीच म्हणाली . निकीताला न उठवता ती आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली . 

ऑफिसला निघण्याची वेळ झाली म्हणून सुस्मिता घाई करू लागली पण निकीताचा सकाळपासून काहीच पत्ता नव्हता . घाईघाईत सुस्मिता निकीताच्या खोलीत शिरली . निकीता अजूनही झोपलेलीच होती .

सुस्मिता, " आजपर्यंत निकीता कधी ईतका वेळ झोपली नाही कधीच नाही.... सुरेश बरोबर सांगत होता ही विचीत्र वागत आहे ." सुस्मिता स्वत: शीच विचार करत म्हणाली .

" सुस्मिता .... अगं ! लवकर चल उशीर होत आहे ", खालुन सुरेशचा ओरडण्याचा आवाज आला .  तशी सुस्मिता भानावर आली . ती निकीता वर ओरडली," अगं! लवकर उठ आणि हो करणं आज साळेला जात नाही तो घरीच आहे त्याचीपण काळजी घे आणि उठ लवकर  " अंथरूणावर काहीतरी हालचाल दिसली निकीता उठत आहे असे सुस्मिताला वाटले म्हणून ती घाईघाईतच बाहेर पडली . करणला बाय बोलून दोघेही निघाले .

निकीताला अचानक जाग आली ती कशीबशी उठली  . शरीर काड..काड.. आवाज करत होते . " हे काय होतं "आहे मला!",  ती स्वत : शीच  बोलली  तिला फार अस्वस्थ वाटत होते , तिला कालचेही फारसे आठवत नव्हते .  तिची नजर समोरच ठेवलेल्या घड्याळाकडे गेली. दुपारचे साडेएक वाजले होते . 

" मी इतका वेळ झोपलीच कशी कोणी मला उठवले कसे नाही , नेमका काय होतं आहे मला ? ", निकीता स्वत : लाच प्रश्न विचारू लागली तेवढयात तिचा फोन घनाणला तिने तो हात्यात घेतला . तिची मैत्रीण दिपाली होती फोनवर . 

" हैलो दिपाली कशी आहेस ? काय करत आहेस तू यार ... किती दिवसांनी फोन केलास....." , निकीता आपल्या मैत्रीनीला मिस करत म्हणाली . तिला कसलातरी आवाज आला , रडण्याचा . 

" तु रडत आहेस काय ? काय झाले तुला ?", निकीता काळजीच्या सुरात म्हणाली  . " अगं ! तुझे रडने थांबव आधी मला सांग काय झाले ते ?" , निकीता परत एकदा दिपालीला विचारते .

" तुला एक व्हिडीओ पाठवलेला आहे  तो बघं तुला सगळं समजेल." दिपाली आपले रडू आवरत म्हणाली . निकीता ने लगेचच मोबाईल चाळला तिला  दिपालीने पाठवलेला व्हिडिओ सापडला . व्हिडिओ पाहताच तिने आपले डोळे बंद केले . 

निकीता दिपालीवर एकदम जोरात ओरडली " हा काय किळसवाणा प्रकार आहे दिपाली , तुला जरा सुध्दा लाज नाही वाटली पण मला लाज वाटत आहे दिपाली तुला आपली मैत्रीण म्हणायला तिही जिवलग आणि तो कोण आहे त्याचा चेहरा का दिसत नाही आणि तु असे..."

" बस कर निकीता ... दिपाली मोठ्याने रडत होती .... माझी त्यात कोणतीच चुक नाही निकीता... हे सर्व कसे घडले मलाच समजले नाही , मला ह्यातले काहीच आठवत नाही त्यांनी मला नसेची गोळी पाजली होती... मी..." दिपाली आपले रडू आवरत म्हणाली . 

निकीता," ते कोण ? कोण आहेत ते?"

" अनिकेत आणि त्याचा मित्र..." 

निकीता ," तो घाणेरडा तुला किती वेळां सांगितले होते की त्यांच्यापासून दूर राह म्हणून . तु  लगेचच पोलीसांना कळव ."

" माफ कर निकीता , मला माफ कर.. जर का ह्यातले मी काहीही कोणालाही कळवले किंवा सांगितले तर...तर .. ते माझा हा व्हिडिओ सार्वजनिक करतील , माझी इज्जत , माझ्या कुटूंबाचा मान सन्मान सगळे काही माझ्यामुळे धुळीस मिळेल..... आता तुच न्याय करु शकतेस ... माझा तुझ्यावर विश्वास आहे...

आता माझ्याजवळ एकच मार्ग उरला आहे निकीता मला माफ कर....." दिपालीने आपले शेवटचे शब्द उच्चारले होते .

निकीता ओरडली," एक दिपाली तू तसे काहीच करणार नाहीस हं ! मी येत आहे आत्ताच , तुझी मैत्रीण येत आहे ." 

पण फोन कट झाला .

" ओ ... शीट!", निकीताने आपला फोन फेकला व ती वाऱ्याच्या वेगाने उठली . ती उठली तोच एक प्रचंड वेदनेची कळ तिच्या पोटात उठली व डोके  सुन्न पडले आणि डोळ्यापुढे अंधारी पसरली . तिने दोन्ही हातांनी आपले डोके जोरात दाबून धरले ती मोठ्यांने ओरडली , ती किंकाळी संपूर्ण बंगल्यात घुमली . निकीता उभ्या कोसळणाऱ्या झाडाप्रमाने अंथरूणावर पडली . 

तो आवाज  एकून करण धावला होता  . तो निकीताच्या खोलीत शिरला पण निकीता निपचीत पडली होती .

पुढचे पुढील भागात.... आणि हे काडूस सारखे काही सर्प समाजात असतातच त्यांच्याकडे एवढे लक्ष देऊ नका .