Badla - Gosht Atyacharachi - 2 in Marathi Horror Stories by DEVGAN Ak books and stories PDF | बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 2

Featured Books
  • एक कब्र का रहस्य

    **“एक कब्र का रहस्य”** एक स्कूल का मासूम लड़का, एक रहस्यमय क...

  • Kurbaan Hua - Chapter 45

    अधूरी नफ़रत और अनचाहा खिंचावबारिश अब पूरी तरह थम चुकी थी, ले...

  • Nafrat e Ishq - Part 24

    फ्लैट की धुंधली रोशनी मानो रहस्यों की गवाही दे रही थी। दीवार...

  • हैप्पी बर्थडे!!

    आज नेहा अपने जन्मदिन पर बेहद खुश थी और चहक रही थी क्योंकि आज...

  • तेरा लाल इश्क - 11

    आशना और कृषभ गन लोड किए आगे बढ़ने ही वाले थे की पीछे से आवाज...

Categories
Share

बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 2

संध्याकाळी समीर व सुस्मीता घरी आले . आल्याबरोबर सुस्मीता निकीताच्या खोलीत गेली . निकीता पलंगावर झोपलेली होती ."कशी आहेस बाळा ,तुझी तब्येत कशी आहे?"आई चा आवाज एकून निकीता उठली.," मी फार बरी आहे .", निकीता." जेवणाला खाली येतेस की खोलीतच आनू", सुस्मीता ." नको आई! मी फ्रेश होऊन येते खाली ", निकीता.रात्रीचे जेवण उरकले होते निकीता आपल्या खोलीत आली . तिने लगेच च आपल्या मैत्रिणीला फोन केला व एवढ्या दिवसात कॉलेजमध्ये काय घडले ते विचारून घेतले .निकीता अभ्यासाच्या टेबलाकडे वळली तिला दोन तिन दिवसांत गेलेला अभ्यास पुर्ण करायचा होता . काही वेळातच तिचा फोन घनाणला . निकीताने मोबाईल जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या , तरीही तिने तो फोन उचलला . तिकडून एका मुलाचा आवाज आला, "  आई लव्ह यू जाण  ,काय करतेस  ? तुला सुध्दा माझ्यासारखी झोप येत नाही वाटत."निकीता रागातच म्हणाली ," झाले तुझं , तुला किती वेळा सांगितले आहे की मला तुझ्यासारख्या लफंग्यात काहीच रस नाही म्हणून , आता परत फोन करू  नकोस."थोडा वेळ गेला असेल नसेल तोच दारावर ठक....ठक  वाजली. निकीता आपल्या जागेवरून उठली व तिने दार उघडले . एक पाठमोरी जानारी आकृती मागे फिरली . निकीता हसत म्हणाली," अग ! आई तु , मला वाटले कोण आहे ? "सुस्मीता ," मला वाटले झोपली की काय , म्हणून मागे फिरले होते. हे घे ! दुध आणि हो डिअर गुड ! नाईट ."निकीता," गुड ! नाईट आई आणि थॅंक यू ह्या दुधासाठी ."निकीता ने दुधाचा ग्लास घेतला आणि दरवाजा लाऊन परत ती आपल्या टेबलाकडे वळली .आता निकीता चे मन पुर्णतः अभ्यासात रमले होते . की तिचा मुड घालवण्यासाठी मोबाईल वाजला . परत त्याच मुलाने तो फोन केला होता . " जाण गुड.., त्याचे बोलणे सुरू होण्याअगोदरच निकीता ने त्याला फटकारले ," अनिकेत फोन ठेव आता नाहीतर उद्या तुला प्रिंसीपल समोर उभे करेन , समजले !"फोन आपोआप बंद झाला होता अनिकेत ने फोन ठेवला होता . फोन ठेवता , ठेवता  कोणतीतरी  शिवी हासडली होती . निकीताला त्याचे काही नवल वाटले नाही .अकरा बाराच्या सुमारास निकीता अभ्यास करता करता डुलक्या खाऊ लागली होती , तिला झोपेने काही अंश ग्रासले होते . तेवढयात रिंग वाजली एकदा दोनदा तीनदा त्या आवाजाने निकीता दचकून उठली, हा कसला आवाज होता? फोन तिने हातात घेतला व बंद केला आणि ती झोपण्यासाठी पलंगाकडे वळाली . ती अंथरूणावर पडली व पडल्या पडल्या तिचे डोळे लागले . पण तेवढ्यात दारावर काहीतरी  जोरात आपटले, अगदी जोरात धाड SSS निकीता पुर्णतः दचकून उठली . नेमका हा आवाज कसला होता म्हणून ती भित, भित दारापाशी गेली . तिने दार उघडण्यासाठी कुंडीला ( कडीला) हात घातला , तोच चर  असा आवाज आला . निकीताचा हात थरथरला , खोलीतील दिवे चर....चर.. आवाज करत चालू बंद होत होते . आता तिच्या गळ्याला कोरड पडली होती , निकीता ने एक आवंढा गिळला.दाराची कुंडी सरकवून तिने बाहेर डोकावले . तिने डाविकडे आपली मान वळवली पण तिकडे काहीच नव्हते, अचानक तिला कसलातरी  आवाज आला , निकीता ने लगेच उजवीकडे पाहीले . समोरच एक पाठमोरी आकृती उभी होती .  बाहेरील दिवेही चर.., चर .. आवाज करत चालू बंद होत होते . निकीताला ती आकृती ओळखण्यात वेळ लागला नाही ती तिची आई होती .निकीताच्या  थरथरत्या तोंडून कसाबसा आवाज निघाला ," आई ss" त्याबरोबर तीच आई मागे न बघता चालू लागली . लगेचच निकीता खोलीबाहेर पडली व तिचा पाठलाग करू लागली . काही अंतरावरच तिच्या भावाची खाली होती जिचे दार उघडेच होते , पण तिचा भाऊ काही आत नव्हता . बहुतेक तो आई - बाबांच्या खोलीत असेल. तिने परत आपल्या आईला हाक मारली पण तिची आई थांबली नाही .निकीता  आईमागे धावली , पण तोपर्यंत तिची आई जिण्यापर्यंत गेली होती. निकीताही तिथे पोहचली . एकवेळ पायऱ्या उतरणाऱ्या आपल्या आईच्या आकृतीकडे तिने पाहिले . आधीचनिकीता फार घाबरलेली होती . समोरच तिच्या आई बाबांची खोली होती जिचे दार किल-कीले उघडे होते . निकीताने आपल्या हाताच्या धक्क्याने ते दार लोटले पाहते तर काय आत कोणीच नव्हते .........