Lagnantar Hoichal Prem - 1 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1

The Author
Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1

हि कथा आहे स्वरा आणि अद्वैत च्या अनपेक्षित लग्नाची..... स्वरा एक शांत स्वभावाची मुलगी , परदेशात एकटी वाढलेली , मोठी बहीण नेहाच्या लग्नासाठी १४ वर्षांनी घरी परत येते..... पूर्वाच लग्न तिच्या बालपणीच्या प्रेम अद्वैत सोबत ठरलेलं असत. पण लग्नाच्या दिवशी घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे अद्वैत ला स्वराशी लग्न करावं लागत . नशिबाने जोडलेल्या या नात्याचं पुढे काय होणार...?स्वर आपल्या होणाऱ्या ब्रदर इन लॉ ला पती म्हणून स्वीकारेल का.....?


जाणून घ्यायला वाचत रहा.... लग्नानंतर होईलच प्रेम.... 



----=====----------



एक मोठ घर जणू एखाद्या नववधू प्रमाणे सजला होत.... बघूनच वाटत होत कि कोणाचं तरी लग्न आहे. प्रत्येक गोष्ट खूपच महागडी आणि देखणी वाटत होती. सभोताली उपस्थित पाहुणेही त्या झगमगाटाने थक्क झाले होते.. तिथेच मंडपात बसलेली लाल जोड्यात सजलेली वधू , जी खूपच गोड आणि निरागस दिसत होती . चेहऱ्यावर काही भावना सावरण्याचा प्रयत्न करत होती.... चेहऱ्यावर काही भावना उमटत होत्या आणि क्षणात अदृश्य होत होत्या. पण स्वतःला संयमित करत ती तिथे बसलेली होती. गव्हाळ रंग ,छोटा गोलसर चेहरा , काळ्या गडत डोळ्यामध्ये काही वेगळं बोलकं होत . तिच्या ओठावर लाल रंगाची लिपस्टिक होती, जी तिच्या सोंदर्याला अधिक खुलवत होती. नाकात मोठीशी नथ , कपाळावर मथपट्टी ,टिकली, डोळ्यात काजळ, कानात झुमके आणि हातात भरलेल्या बांगड्या. संपूर्ण केलेली ती नववधू अतिशय मोहक दिसत होती. 


तर तिच्या शेजारी बसलेला वर . ज्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. हलकासा सावळा रंग , हलकीशी दाढी -मिशी , आणि कानाजवळ असलेला छोटासा तीळ , जो जणू त्याच्या आकर्षकपणा अधोरेखित करत होता. एकदा कोणी त्याला पाहिलं, तर पुन्हा पाहण्याची इच्छा नक्की होईल. मेहरूण आणि गोल्डन रंगाच्या शेरवानित , गळ्यात दुपट्टा आणि कंठमला घातलेला , कापल्लवर साफ घातलेला तोही कुणाही काही वाटत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तेज होता. हा त्याच्या आणि स्वराच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस होता. पण तरी हि त्याच्या चेहऱ्यावर हवी तशी ख़ुशी नव्हती. मंत्रोच्चारासह जयमाला झाली आणि पुन्हा दोघे आपापल्या जागेवर जाऊन बसले. 


घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर काहीसा ताण स्पष्ट दिसत होत. तरीही अद्वैत आणि सुस्वर स्वतःला संयमित करत मंडपात बसले होते. पंडितजी नि एक एक करून विधी पार पडल्या . कन्यादानासाठी जेव्हा स्वराच्या वडिलांना बोलावलं , तेव्हा तेव्हा संतापाने नकार दिला. पण कन्यादान करावंच लागणार होत, म्हणून हि परंपरा स्वराच्या भावाने पार पडली . फेरे सुरु झाले आणि पंडितजी फेऱ्यासोबत वाचन म्हणत गेले आणि त्या दोघांची संमती घेत गेले. एक एक करून सहा वाचन स्वीकारल्यानंतर पंडितजींनी शेवटचं सत्व वाचन सांगत म्हटलं 


"सातव्या वाचनात वधू वाराकडे मागणी करते कि प्रत्येक परकी स्त्री जी वयाने मोठी आहे तिला माता , वयाने लहान आहे तिला मुलगी. आणि समवयीन आहे तिला बहीण सामान मानलं. नवरा -बायकोच्या परस्पर प्रेमात इतर कोणालाही सहभागी होऊ देणार नाही. जर तुम्हाला हे वाचन मेनी असेल तर मी तुमच्या वामभागीं येन स्वीकारते. तुम्हाला ही वाचन मान्य आहे का ....?"


पंडितजींच हे वाचन ऐकून अद्वेत च्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रिया नव्हती, तर स्वर त्याच्याकडे एकटक पाहत होती. काही क्षण गेले आणि अद्वैतने त्याच्या भारदस्त आवाजात म्हटलं" स्वीकार आहे,..."

त्याच्या या उत्तरावर स्वराने डोळे मिटले. पंडितजींनी त्या दोघांकडे आणि म्हणाले"आता त्याच्या भांगेत कुंकू भरा ..."


अद्वैत ने कुंकूची डिब्बी उचलली आणि चांदीच्या नाण्यावर कुंकू घेऊन स्वराच्या भांगेत भरायला गेला, तेव्हाच स्वराने त्याचा हात पकडला . सगळेच आश्चर्यचकित झाले. अद्वैत हि स्वराकडे पाहू लागला. स्वरांत त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं" हे कुंकू माझ्या भांगेत तेव्हाच भरा , जेव्हा तुमच्यासाठी हे कुंकू , हे नातं काही तरी महत्त्वाचं असेल...."



अद्वैतने तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं . ज्या परिस्थितीत त्याच लग्न होत होत, ते सर्वाना ठाऊक होत. पण लग्न तर होतंच होत. त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला" फ्रोम नाऊ ओन .. आजपासून , या क्षणापासून , माझ्यासाठी जर काही सर्वात महत्त्वाचं असेल, तर ते तू, हे लग्न आणि आपलं नातं असेन ,आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त तुझाच असेल हे अद्वैत राणा च वाचन आहे.."

हे म्हणत त्याने स्वराच्या भांगेत त्याच्या नावाचं कुंकू भरला. त्याने समाधानाने डोळे मिटले. थोडं सिंदूर स्वराच्या नाकावर पडलं, तेव्हा अद्वैत ने डोळे उघडून स्वराकडे पाहिलं. तीही त्याच्याकडे फट होती. दोघाच्या मनात वेगवेगळ्या भावना होत्या. हे लग्न कास होत होत, हे तिथे उपस्थित प्रत्येकाला माहित होत. कोणाच्या मनात राग होता , कोणाच्या चेहऱ्यावर अजब भाव होते, तर कोणाच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं . अद्वैत स्वराचा हात पकडला आणि म्हणाला"एक वाचन मी तुला आणखीन तुला देतो . आजपासून तू स्वरा अद्वैत राणा आहेस . अद्वैतच्या प्रत्येक गोष्टीवर तुझा तितकाच हक्क असेल, जितका माझा आहे. जे झालं ते झालं, ते आपल्या नात्यात कधीच अडथळा आणणारं नाही. हे नातं आपलं आहे, जशी जोडलं गेलं असेल, पण निभावणं आपलच काम आहे. अशा करतो कि तू माझी साथ देशील."


स्वराने हळूच मान डोलावली. अद्वैतनेही मान डोलावली आणि दोघे उभे राहून मोठ्याच्या पायाशी आशीर्वादासाठी गेले. अद्वैत आपल्या आईच्या पाय पडून आशीर्वाद घेतला. त्यांनी प्रेमाने स्वराच्या आणि अद्वैतच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. अद्वैताचे वडीलही आशीर्वाद देण्यामध्ये मागे राहिले नाहीत. पण जेव्हा स्वराच्या कुटूंबाची पपाळी अली, तेव्हा स्वराच्या वडिलांनी पाय मागे घेतले आणि संतापाने म्हणाले 
"हि मुलगी माझी नाही . हिने तिच्या मोठ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, स्वतःच्या होणाऱ्या मेहुण्याशीच लग्न केलं आणि एकदाही तिच्या बहिणीबद्दल विचार केला नाही. आजपासून माझी एकच मुलगी आहे ती म्हणजे पूर्वा स्वरा माझ्यासाठी आजपासून मेली आहे..."


त्याच बोलणं सर्वजण चकित झाले. तिथे स्वर अधिकच हादरली . तो तिचा बाप होता. तो असं कास म्हणू शकतो...?तिच्या डोळ्यात अश्रू उतरले आणि त्याआधी कि ते अश्रू तिच्या गालावरुन गळून पडतील... अद्वैतने तिच्या वडिलांकडे पाहत सांगितले..."तुमच्या मुलीने स्वतःच्या सुखाला स्वतःच उद्ध्वस्त केलं आहे... अरे , तिने तिच्यासोबत माझी आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आणि तुम्ही इथे हळहळ व्यक्त करत आहेत...?तुम्हला माहित नाही तुम्ही काय करत आहात ...?एक दिवस तुम्हाला तुमच्या या कृतीचा पाश्चात्ताप होईल... माझे शब्द लक्षात ठेवा मिस्टर अश्विन सिसोदिया . ज्या मुलीला तुम्ही नाकारत आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच पस्तवा होईल ..."



हे होलम ऐकून त्याने स्वराचा हात पकडला. स्वराने डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रुनी त्याच्याकडे पाहिलं. अद्वैत तिला घेऊन बाहेर चालला होता. अजून ते बाहेर पोहोचले नव्हते, तेवढ्यात मागून एका मुलाचा आवाज आला 

"माझ्या जीवाला सांभाळून तर ठेवलं ना....?"


अद्वैत थांबला... अद्वैत आणि स्वर दोघेही मागे वळले . तिथे स्वर इतक्याच वयाचा, जवळपास २२-२३ वर्षाचा मुलगा उभा होता. त्याचा चेहराही स्वराशी मिळताजुळता होता. तो चालत त्याच्याजवळ आला आणि अद्वैतला पाहत म्हणाला"माया जीवाची नीट काळजी घ्याल ना तुम्ही....?"


अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला शांत करत स्वराला पाहिलं. स्वराने त्याला हाक मारली"आयु...!"

आयुने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या गळ्यात पडत म्हणाला "जातेंय ना.... पण आपण जुळे भावंड ना..!तू मला सोडून कशी जाऊ शकतेस... ? आपण एकत्र जन्मलो ना, मग वेगळे कसे होऊ शकतो....?"


हे बोलताना त्याचा गळा भरून आला होता.... डोळ्यात पाणी तरळत होते. स्वराने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हटलं"मी तुझ्यापासून मैलभर दूर थोडीच जात आहे...? इथेच शेजारी आहे घर. कधीही यायचं...."


आयु तिच्यापासून दूर आला आणि तिचे हात धरत म्हणाला" तू नाही येणार...."

स्वराने हलकंसं हसत वडिलांकडे पाहिलं जे, अजूनही तिकडे दुर्लक्ष करत उभे होते. स्वराने एक हलकीशी वेदनेची स्मित रेषा दाखवत म्हटलं"तू ये ना..!आणि तशी , मी तुझ्यापेक्षा १५ मिनिटानि मोठी आहे. माझं ऐकायला तुला लागणारच ना...!"

हे ऐकून वायूने तोड वेंगाडत म्हटलं" आजही १५ मिनिटाच्या मोठेपणाचा राग दाखवत आहेस.....!"

स्वराने त्याच्या कपाळावर किस घेत म्हटलं"जाते... स्वतःची काळजी घे..."


वायूने हळूहळू मान हलवली. स्वराने एक नजर त्या संपूर्ण घरात टाकली आणि कोपऱ्याकडे नजर रोखली तिथे तिची आई उभी होती. डोळ्यात अश्रू होते, पण त्याचे पाय अजूनही तिथेच थांबले होते... हे पाहून स्वराला आणखीनच वाईट वाटलं.... तिने हलकाच अद्वैत कडे पाहिलं आणि म्हणाली"प्लिज इथून लवकर निघू या....."

अद्वैत ने तिचा हात धरला आणि आयु च्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाला" आयुष्मान काळजी घे. काहीही गरज लागली तर मला फोन कर...."

आयुने हलकासा मान हलवली आणि अद्वैत आपल्या कुटूंबासह स्वराला घेऊन निघाला....

अद्वैत आणि स्वरा राणा मेन्शन च्या दरवाज्यावर उभे होते. दरवाज्यापाशी एक मुल्लगी उभी होती. तीच वयही स्वरासारखं होत. ती खूप गॉड आणि निष्पाप दिसत होती. ती अद्वैत ची धाकटी बहीण अहिरा राणा होती. तिने आपल्या भावाकडे पाहून हसत म्हटलं" भाई..! घरात यायचं असेल तर आधी खिशाला कात्री लावावी लागेल..."

अद्वैत भुवया उन्चावात म्हणाला"हे जरा जास्त होत आहि का...? तू माझ्याकडून माझ्या घरात येण्यासाठी लाच मागते आहेस का...?"


अहीरा ने तोड वेगाडलं... तेवढ्यात मागून अद्वैत च्या आई शैलवी याच्या आवाज आला " का त्रास देत आहेस त्यांना...? साइडला हो, मला अजून त्याची आरती करायची आहे आणि गृहप्रवेश हि ...."

अहिराने तोड वाकड करत बाजूला झाली. शैलवी यांनी स्वारासमोर तांदळाचा कलश ठेवला आणि खूप वेगळं वाटत होत. तिला इतकं लक्ष वेधून घेणं माहीत नव्हतं.. 

शैलवी यांनी स्वारासमोर तांदळाचा कलश ठेवला आणि म्हणाल्या " याला पायाने ढकलून घरात प्रवेश कर....."


स्वराने त्याच्या सांगण्यानुसार केलं... नंतर अलत्याच्या ताटात पाय ठेऊन पायाचे ठसे घरात सोडले. तेवढ्यात अद्वैत चा लहान भाऊ गर्व म्हणाला" भाई , आता इथे उभं राहून काय बघतोय...?उचलून वहिनीला तुझ्यासोबत घेऊन जा, त्या do not aenter असलेल्या रूममध्ये ....!"

त्याच्या बोलण्याने जिथे सगळे हसू लागले होते, तिथे अद्वैत गर्वकडे घुरून बघत होता. आणि स्वरा लाजून नजर चोरत होती. 

शैलवीने गर्वच्या डोक्यावर चापट मारली आणि म्हणाली"नालायक , काहीही बोलतोस.."

गर्व ने चेहरा करुउत्तर दिल"भैशिवाय उलट सगळेच नालायक वाटतात ...."

अद्वैत ने खिशातून नुकताच लॉन्च झालेला स्मार्ट फोन काढला नि गर्व फेकत म्हणाला" आता तोड बंद ठेव....."

गर्वने पटकन तो पकडत दात दाखवले आणि म्हणाला"अ ... मी काही बोललोच नाही ....."

सगळे पुन्हा एकदा हसू लागले . स्वर सगळं बारकाईने पाहत होती. हे कुटूंब, हे लोक तिच्या साठी नवे होते, त्यामुळे सगळ्यामध्ये मिसळायला तिला काही वेळ लागणार होता. 


अद्वैत ने आपलं कार्ड अहिराला देत म्हटलं"हवी तेवढी शॉपिंग कर. काही प्रॉब्लम नाही...."


अहिरा खुश झाली. शैलवीजींनी त्यांना खोलीत जाण्यास सांगितलं . त्या त्याच्या खोलीतच जेवण पाठवणार होत्या. 


अद्वैत पुढे निघणार होता, तेवढ्यात गर्व पुन्हा म्हणाला " भाई ..!वहिनीला उचलून घ ना.... त्या एवढ्या जाड लहानग्यासोबत वर कशा चढतील....?"


अद्वैत ने त्याच्या कडे घुरून पाहिलं आणि स्वराकडे नजर वळवली. ती जरा थकलेली वाटत होती.... अद्वैतने तिला आपल्या बाहुपाशात उचललं . स्वर चकित होऊन त्याच्या खांद्यांना धरून उभी राहिली. तिकडे गर्व आणि आहिरा त्यांना पाहून शिट्या मार्ट हुटींग करत होते, पण अद्वैत ने याकडे काहीही लक्ष दिल नाही. तो स्वराला घेऊन थेट आल्या खोलीकडे निघाला. 

त्याने स्वराला खोलीत नेलं आणि हळूच बेडवर बसवलं तिच्याकडे पाहत तो म्हणाला" Be comfortabale ....."


स्वराने त्याच्याकडे पाहिलं, तर तो तिच्या जवळ बसत तिचे हात प्रेमाने हातात घेत चुमत म्हणाला" Welcom into my life , Mrs स्वरा अद्वैत राणा ...."


स्वर त्याच्याकडे पाहत राहिली. अद्वैत पुढे म्हणाला" आपली पहिली भेट आणि हे सगळं घडलं. आपल्या पहिल्या टक्करने आपल्याला एकमेकांशी बांधून टाकलं, इतकं कि सात जन्मासाठी आपण जोडले गेलो. TO be honsest ....!माझ्या मनात तुझ्या साठी अशा काही खास भावना नव्हत्या . हि गोष्ट तुला माहित आहे. तुझ्या मनातही काडाटीच माझ्यासाठी काही भावना नसतील. आपण आधी आधी भेटलोच नाही. 

पण आता भेटलो आहोत , आणि अशा प्रकारे भेटलो आहोत कि आता वेगळं होण्याचा कोणताही मार्ग नाही. मी आयुष्यभर तुझा आहे. मी नेहमी तुझ्यासाठी उभा असें. आपण या नात्याला मैत्री पेक्षा पुढे नेऊ शकतो , पण प्रेम.... मी सांगू शकत नाही. पण माझी लॉयल्टी फक्त तुझ्यासाठी असेल. माझ्या आयुष्यात आता फक्त तू आहेस आणि तूच राहशील. हे माझं वाचन आहे...."

स्वर त्याच्याकडे पाहत राहिली. इतक्या आपुलकीने कोणी तिच्याशी पहिल्यांदा बोलत होत. ती हलकच हसली. स्वराने खोलीकडे एक नजर टाकली. पूर्ण खोली अतिशय सुंदर सजवली होती. बेडवर गुलाबी रंगाच्या फुलाच्या मला सजवल्या होत्या. पूर्ण बेडशीटवर गुलाबाच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. सेंटेड कँडल्सच्या सुगंधाने खोली दरवळत होती... लहान लहान फेअरलाईट्स ची प्रकाशरचना सुपर्ण बेडवर पसरलेली होती. हे सगळं पाहून स्वरांचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. 


काही वेळातच दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला . अद्वैतने दरवाजा उघडला तर तिथे आहिरा उभी होती. तिने त्यांना एक ट्रे दिले ज्यात जेवण नि दोन दुधाचे ग्लास ठेवले होते. अद्वैतने ती ट्रे घेतले आणि टेबलावर ठेवले. त्याने स्वराकडे पाहत तिला हाक मारली" स्वर जेवण करून घे...."

ती येऊन काऊचवर बसली. दोघांनी जेवण पूर्ण केलं. अद्वैत तिच्याशी काही हलक्या फुलक्या गप्पा मार्ट होता, ज्यांना ती उत्तर देत होती... अद्वैत तिच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देत होता. जस ती भाजीतील मात्र आणि टोमॅटो काढून एका बाजूला करत होती. तिच्या या लहानशा कृतिनी तो मनोमन हसत होत.... 

स्वराने थोडं खाल्लं आणि म्हणाली "बस झालं माझं...."

अद्वैत ने स्वराची प्लेट पहिली , ज्यात मात्र आणि टमाटर एका बाजूने ठेवलेलं होत. बाकी त्याने काहीही वाया घालवाल नव्हतं . अद्वैत ने दुधाचा एक ग्लास तिच्यासमोर ठेवला आणि म्हणाला" हे संपवून ताक , नंतर चेंज कर...."


स्वराने एका क्षणासाठी वित्त चेहरा केला, पण लगेच तिने गुपचूप ग्लास उचलला आणि डोळे बंद करून एकसाथ सगळं दूध पिऊन टाकला... मग उठून आरशासमोर बसली . अद्वैत ने प्लेट्स एका बाजूला ठेवल्या आणि लवकरच कपडे बदलून आला. त्याने काळ्या रंगाचा वेस्ट आणि लोअर घातलेला होत, ज्यामध्ये तो खूपच आकर्षक दिसत होता... 

स्वराने आरशातून त्याला पाहिलं आणि तिची नजर त्याच्यावर स्थिरावली. अद्वैत बेडवर बसून फोनमध्ये गुंतलेला होता, पण स्वराला आता बेचेनि वाटू लागली. तिला वाटलं कदाचित हे भारी दागिन्यांमुळे होत म्हणून तिने दागिने काढायला सुरुवात केली... 


स्वर जेव्हा दागिने काढत होती, तेव्हा अद्वैत ची नजर तिच्यावर गेली. त्याने तिला एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. तिच्यात काहीतरी खास होत, जे तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवत होत.आणि अद्वैतला तेच तिच्याकडे आकर्षित करत होत. तो उठला आणि तिच्या मगर जाऊन उभा राहिला . स्वराने आरशातून पाहिलं... 

ती उठली , तर अद्वैत ने तिच्या खांद्यावरून तिला थांबवलं आणि हलक्या हाताने तिच्या केसाचा अंबाडा सोडला. तिचे लांब केस तिच्या पाठीवर मोकळे झाले. त्याने तिचे केस एका बाजूला सारले आणि तिच्या मानेवर हलकासा किस घेतलं. स्वराने आपल्या मुठी घट्ट बंद केल्या. 


अद्वैत ने तिला स्वतःकडे वळवळ आणि तिचा हात धरून जवळ ओढलं . स्वरा त्याच्या मिठीत यरुन धडकली . तिने अद्वैत च्या छातीवर हात ठेवला आणि त्याच्या हृदयाचे ठोके ऐकून तिचेही ठोके वेगाने वाढले होते. अद्वैत हळूच तिच्या कमरेत हात घालत म्हणाला "चाल, या नात्याची एक प्रेमळ सुरुवात करूया.... स्वतःला तुझ्यावर समर्पित करतो.... मला सदैव धरून ठेव, मी माझं सगळं काही तुझ्यावर कुर्बान करतो...."


स्वराने त्याच्या या शब्दांनी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहिलं . अद्वैतच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. त्याने हळूहळू स्वारीला तिच्या जड दागिन्यांपासून मुक्त करायला सुरुवात केली. स्वराला काहीही बोलता आलं नाही. तीची नजर फक्त अद्वैतच्या डोळ्यावर स्थिर राहिली, जिथे काहीही खोत नव्हतं. 


अचानक स्वराने त्याला मिठी मारली. अद्वैत चकित झाला पण त्यानेही तिला आपल्या बाहुपाशात घट्ट कवटाळलं . त्याने तिला उचललं आणि बेडवर नेऊन हलक झोपवलं .स्वरा पालटून वळली . अद्वैत तिच्या पाठीवर असलेल्या तिच्याकडे पाहत होता. ते खूप सुंदर दिसत होत, ज्यामुळे अद्वैत चा संयम तुटत होता. 

त्याने हळूच झुकून तिच्या पाठीवर असलेल्या तिच्यावर किस घेतला. स्वर थोडीशी सीमांतली,पण अद्वैतच्या हातानी तिच्या ब्लाउजच्या डोरीला स्पर्श केला. पुढच्याक्षणी त्याने डोरी ओढून सोडली. स्वरा पटकन वळून सरळ झाली. 

अद्वैत ने तिच्या कमरेला धरून तिला खाली करून स्वतःच्या नियंत्रणात घेतलं. त्याने स्वराच्या चेहऱ्याकडे एकटक पाहिलं. स्वारानेहीत्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यामध्ये हलकीशी ओलसरता दिसत होती. अद्वैतने तिच्या डोळ्यावर किस घेतलं आणि म्हणाला " फ्रॉम नाऊ ऑन ...!तुझ्याशिवाय कोणीही नाही...."

या शब्दासह त्याने हलकं स्वराच्या ओठावर किस करायला सुरुवात केली.... त्याच्या हातानी स्वराच्या शरीरावर गोंजारायला सुरुवात केली. दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात हरवले. रात्रीचा रंग जसे गडद होत गेला , असे त्याच नातं अधिकच गहिरं होत गेलं. 


अद्वैत आणि स्वराच्या वाघलेल्या श्वासाचा आणि धडकणाचा आवाज आता खोलीभर उमटत होता. स्वराच्या सौम्य आवाजाने अद्वैतला बाजूंनी अधीर केलं. 

अखेरीस दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झोपले . स्वरा अद्वैत च्या छातीवर विसावली होती , तर अद्वैतने तिला घट्ट कवटाळल होते, जणू तो तिला आयुष्य भर असच जपणार होता.... 




---------===========-------------



हेय गाईज ...... कशी वाटतेय नवीन स्टोरी... नक्की कळवा ... बघूया पुढच्या भागात ...... त्यासाठी वाचत राहा....