क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1

(9)
  • 43.7k
  • 0
  • 19.3k

कथेवाटे कोणत्याही धर्माला गालबोट लावल गेलं नाही! मनोरंजन होईल ह्या दृष्टीने कथा लिहिली गेली व मनोरंजन होईल ह्या दृष्टीनेच कथा वाचा! लेखक कोणाच्या ही भावना दुखावात नाहीये ! त्यामुळे उगीचच कोणीही पर्सनलल मेसेज करून ज्ञान पाजलू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल! शाळेतल्या मुलांना एन दिवाळीची सुट्टी लागली होती . दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी भाविक वय तेरा वर्ष, शहरातून आपल्या मामाच्या गावी आला होता. भाविक तस शहरातला मुलगा होता. -शहरात, गावातल्या दिवाळीसारखी मज्जा मुळीच नसायची- म्हंणूनच तो दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीची मज्जा लूटण्यासाठी मामाच्या गावी यायचा ..ह्या ही वर्षी आला होता.

1

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 1

व्हिक्टोरिया 405 भाग 1 भाग 1] कथेवाटे कोणत्याही धर्माला गालबोट लावल गेलं नाही! मनोरंजन होईल ह्या दृष्टीने कथा लिहिली व मनोरंजन होईल ह्या दृष्टीनेच कथा वाचा!लेखक कोणाच्या ही भावना दुखावात नाहीये !त्यामुळे उगीचच कोणीही पर्सनलल मेसेज करून ज्ञान पाजलू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल! शाळेतल्या मुलांना एन दिवाळीची सुट्टी लागली होती . दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी भाविक वय तेरा वर्ष, शहरातून आपल्या मामाच्या गावी आला होता. भाविक तस शहरातला मुलगा होता. -शहरात, गावातल्या दिवाळीसारखी मज्जा मुळीच नसायची- म्हंणूनच तो दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीची मज्जा लूटण्यासाठी मामाच्या गावी यायचा ..ह्या ही वर्षी आला होता. आज लक्ष्मीपुजन होत. गावातल्या रसत्यांवर गावची लहान- ...Read More

2

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 2

व्हिक्टोरिया 405भाग 2 ....भाग 2तपकीरी रंगाचा मातीचा रस्ता कापत गाडी वीस पंचवीस मिनिटांत हव्या त्या ठिकाणी पोहचली.दुकानात खुप गर्दी वाण्या जास्ती जास्त एक जण संभाळु शकत होता.पन दुकानात मात्र वीस -पंचवीस गि-हाईक होते.गि-हाईंकाचा आवाज कानांवर ऐकू येत होता.तू- तू मैई,मैई सुरु होती." ओ वाणी पावशेर डाळ द्या."" ओ वाणी कांदे दा अर्धाकीलो!"" मला टोमेटो द्या हो अर्धाकीलो."गर्दीतून गि-हाईकांचा बोलण्याचा आवाज येत होता." ओ वाणी काका !" सुजय गर्दीतून आत घुसला." काय सुजय ईकड कुठे ? "सुजय वाण्याचा ओळखीचा असावा." अहो वाणी काका -आमच्या गावातली सर्व दुकान बंद झाली हो! मग आलो इकडे."" बर..बर.. काय पाहिजे ?" वाणी कसलीतरी पुडी ...Read More

3

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 3

व्हिक्टोरिया 405 भाग ३भाग 3." मामा - मला वटवाघळू नाय बनायचं रे मला वाचव ..मामा..मला वाचव..!"" अरे इथे माझीच फाटलीये ..तुला कुठून वाचु बाबा !"दोघेही धावता धावताच बोलत होते.काहीवेळ धावून झाल्यावर दोघेही एका अद्यात जागेवर थांबले."मामा हे काय आहे ? भुत आहे का हे ?"भाविक मोठ मोठे श्वास घेत म्हंणाला." काय माहीती नाही रे,पन ड्रेक्युला वाटतो तो माणुस-त्याचे डोळे पाहिले ना कसे लेझर सारखे चकाकतायेर."" हो ना ! आणी त्याची उंचीही खुप आहे! "" शुश्श्श्श्!" सुजय शुश्कारला." बुटांच आवाज येतय बघ!"धप- धप- धप मातीवर जोर जोरात पाय आपटत चालाव तसा तो आवाज होता." मामा तो ड्रेक्युला आला असेल तर ...Read More

4

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 4

व्हिक्टोरिया 405भाग 4 आंतिम..गाडी सुरु झाली होती." बस बस ..!" सुजय पटकन म्हंणाला.मागून भाविक सीटवर बसला." मामा स्टोरीमध्ये ही अशी तिस-यांदा स्टार्ट होते नाही!" भाविक म्हंणाला.आणी धक्के खात गाडी बंद झाली..दोघांच्याही छातीत श्वास अडकला-"मामा आता स्टोरी नुसार तो .."भाविकच्या चेह-यावर रडकूंडीभाव पसरले." ड्रेक्युला परत येइल..! आणी सगळ्यात अगोदर माझा मुडदा बसवशील- नंतर तुझा..!"सुजय पटकन म्हंणाला.त्या रक्तपिपासू अंधा-या काळोखी रात्री घोड्याच्या खिंखाळण्याचा आवाज जंगल दुमदूमून गेला - रातकिड्यांची किरकिर सावध झाली..सुजय भाविक दोघांच्या माना मागे वळल्या.काळ्या घोड्यांची ती अभद्र घोडागाडी त्यांच्याच दिशेने वेगाने येत होती." मेलो मामा आपण मेलो- आता ह्याच्याबरोबर दिवसरात्र पेटीत झोपायला लागल आपल्याला.ह्या येड्याकडेतर त्याची सेक्सी बायको ...Read More

5

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 5

पीर बाबाची कृपा 1 भाग १ .. मित्रहो ह्या पृथ्वीतळावर जो मानव जन्म घेऊन येतो - तो कधी ना मरणारच आहे , कारण ईथे कोणीही कायमचा पाहुणा आलेला नाही - प्रभु श्री कृष्णांच्या म्हंणन्यानुसर मृत्यु हेच आंतिम सत्य आहे !साक्षात श्रीकृष्ण भगवंताना सुद्धा आपला मृत्यु चुकला नव्हता. मित्रहो ज्या मानवाला अकाली,अपघाती , खून- हत्या अश्या श्रेणीतून मरण येत , तेव्हा त्याच्या काही इच्छा आकांशा मागे राहिलेल्या असतात ! मग असा अतृप्त इच्छेपोटी, वासनेपोटी, तो मानव ज्या ठिकाणी मृत पावतो - त्या स्थळावर, त्या ठिकाणी - त्या मानवाचा आत्मा अतृप्त भटकंती करत भटकत राहतो, ज्या दिवशी त्या मानवाचा अपघात , ...Read More

6

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 6

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! ..कथा सुरु....गाडी अंधाराला चिरत रस्ता कापत होती.काल्या रस्त्यावरून गाडीचे व्हिल्ज वेगाने फिरत होते..मध्येच येणा-या एखाद्या खड्डयाने गाडी जराशी हळत डूळत होती. गाडीच्या चारही बाजुंच्या काचा बंद होत्या.. त्या बंद काचेंवर हवेचे झोत आदळत होते. त्यांचा धप धप असा हलकाशार आवाज होत होता. गाडीचा पिवळसर हेडलाईटचा प्रकाश आजुबाजूची ती मोठमोठाली राक्षसी दैत्यासारख्या झाडांची आकृती नजरेस पाडून देत होता.. पन जशी गाडी पुढे निघुन ...Read More

7

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 7

पीर बाबाची कृपा भाग ३ दर्शनला काडीचीही कल्पना नव्हती- की समोर दिसणार हे दृष्य सामान्य नव्हत- नजरेस दिसणारा छलावा - एका अमानुष,हिंस्त्र, अमनाविय शक्तिच्या सापळ्यात दर्शन फसला होता. दोन मिनिटे झाली होती - पन पुन्हा काही केल्या ती म्हातारीच काय, तर एक गाडी सुद्धा त्याला समोरून जातांना दिसली नव्हती ! पन ती म्हातारी पुन्हा दिसली नाही , हा विचार करूनच त्याला जरास हाईस वाटल होत . पन जशी त्याची नजर समोर गेली - त्याचे डोळे विस्फारले , घशात श्वास अडकला - कोणीतरी नसांवरून थंडगार पातीचा धारधार टोकदार सुरा फिरवल्यासारखी जाणिव झाली- बसल्या अवस्थेतच पाठीच्या मणक्यातून थंडगार लाट पसरली . ...Read More

8

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 8

पीर बाबाची कृपा भाग४ गाडीचा अपघात झाला होता. गाडीत असलेले मागचे तीन जण जखमी झाले होते.! दर्शनच्या बाजुला बसलेला त्याच हात फ्रेक्चर झाल होत - आणी ड्राईव्हिंग सीटवर बसलेलादर्शन त्याच पाय फ्रेक्चर झाल होत. अपघातस्थळावर मदतीसाठी काही लोक जमली आणि त्यांनी ह्या सर्वाँना हॉस्पिटल मध्ये एडमिट केल. अस म्हंणतात की फळावर जेव्हा कीड लागते, तेव्हा ती किड फळाला हळू हळू नासवते ..! दर्शनला हॉस्पिटलमध्ये महिनाभर एडमिट केल होत - महिन्याभरा नंतर त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल, पण पाय अद्याप बरा झाला नव्हता .. चालताना लंगडत चालाव लागायचं. महिन्याभरा नंतर दर्शनला घरी आणल गेल, घरातली सर्वजन खुश होती.. कारण दर्शन सहिसलामत ...Read More

9

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 9

पीर बाबाची कृपा भाग ५दर्शनला त्या दिवशी पुर्णत रात्रभर बांधून ठेवल होत - दर्शनच्या देहात घुसलेल्या त्या शक्तिने सुटण्यासाठी प्रयत्न केले , शिवीगाळ, धमकी, सर्वकरून पाहिल.. पन दर्शनच्या घरातल्यांनी त्याला गच्च बांधून ठेवल होत..- सुटका होणे असंभव होत. दुस-या दिवशी सकाळीच दर्शनला दरग्यात आणल गेल- ती एक चौकोनो दहा x दहा ची खोली होती- खोलीत चारही बाजुंना भिंतीवर हिरवा रंग होता .. खाली पांढरी फरशी होती- दर्शनला खोलीच्या मधोमध मांडीवर बसवल होत. त्याच्यासमोर फकीर बाबा बसलेले त्यांच्या अंगात हिरवा जब्बा होता- गालांवर मोठी वाढलेली पांढरट दाढी होती ,डोक्यावर पांढरी गोलसर टोपी होती . हातात एक सफेद मण्यांची माळ आणी ...Read More

10

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 10

श्री गणेश महिमा भाग 1 भाग 1नमस्कार वाचक मंडळी . सुखहर्ता दुख:हर्ता म्हंणजेच लहानापासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या लाडक्या बाप्पांच निमीत्त आगमन झाल आहे. मित्रांनो गणेश जयंती निमित्ताने तुम्हाला रोज मोदक ,लाडू ,करंजी नवे नवे पदार्थ चाखायला मिळत असतीलच ना ? आणि त्या पदार्थांची मस्त मज्जा घ्या बर का !तर वाचकहो आता जास्त न बोलता सत्य अनुभवाकडे वळुयात , तर आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे सत्य अनुभव जो मला माझ्या मामाने सांगितल आहे..मामा म्हंणताफ की काही लोकांना फक्त गणपती आल्यावरच जुगार खेळायची सवय असते - बाकीचे महिने मात्र हे जुगारु कधीच जुगार खेळत नाहीत , पन गणपतींमध्ये ही अशी लोक ...Read More

11

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 11

भाग 2. " अरे दिग्या अस काहिही नसत रे , भुत -बित ह्या गोष्टी खोट्या आहेत - मी तर तू भितो म्हंणून तुला मुद्दामून सांगत होतो..हिहिहिहिही!" विलासराव हसू लागले. पण माझ्या मामांना म्हंणजेच दिगंबररावांना त्यांच हे बोलण पटल नव्हत - शेवटी मामांचा आणि विलासरावांच एक छोठस भांडण झाल आणि रागाच्या भरात मामा बोलून गेले . " ठिक आहे खुप हिंम्मत आहे ना तुझ्यात , तर एक काम कर , तुझ्या ह्या मटणाच्या पिशवीतून एक मांसाचा तुकडा काढ आणि पुढे शिंद्यांचा मळा लागेल ना , त्या मळ्यात एक चिंचेच झाड आहे बघ - त्या झाडाला नाही का गेल्या वर्षी येड्या ...Read More

12

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 12

भाग 3 शेवटी पाहता पाहता चार दिवस निघुन गेले ..पन ह्या चार दिवसात विलासरावांना खुपच विलक्षण अनुभव आले होते मध्यरात्री काही काही विचीत्र स्वप्ने पडत होती- झोपेतून दचकून जाग येत होती. सतत दोन्ही खांद्यांवर भार असल्यासारख अंग दुखत होते - अस वाटत होत की अंगा खांद्यावर कसला तरी ओझा आहे. रात्री दिड वाजेच्या समई छातीवर कोणीतरी बसल्याची जाणिव होई , एका कुशीवर झोपले असताना सतत मागे कोणीतरी मांडी घालून बसून आपल्याकडे एकटक पाहत्ंय अस मनाला वाटायचं , पन मागे वळून पाहिल्यावर रिकामी जागा नजरेस पडायची , रात्री - अपरात्री चार पाच वेळा त्यांनी आपल्या खोलीत कोणाच्यातरी हलक्या स्वरातल्या कुजबूजण्याचा ...Read More

13

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 13

भाग 4 घरीयेताच विलासरावांनी प्रथम बैटरी संपलेला नोकियाचा फोन चार्जींगला लावला आणि मग मस्त फ्रेश झाले, फ्रेश झाल्या नंतर वगेरे उरकुन..त्यांच्या पत्नी मोहीनीबाईंना आपण पत्ते खेळायला चाललो आहोत अस सांगितल.त्यावर मोहिनीबाईंनी "ठिक आहे एवढच प्रतिउत्तर दिल. सांगायच झाल तर मोहिनीबाईना विलासरावांचा हा छंद बिल्कुल आवडत नव्हता, पन म्हंणुन त्या वाद वगेरे घालत नसायच्या कारण त्यांचा स्वभाव खुपच प्रेमळ होता. म्हंणुनच तर आयुष्य सुखात सुरु होत. साडे आठ च्या सुमारास विलासराव थोडीफार रक्कम सोबत घेऊन अन्ना पाटलांच्या घरी पत्ते खेळायला निघाले. अन्ना पाटलांच घर म्हणायला एक बंगलाच होता. बंगला गावापासुन लांब होता, आणी बंगल्यापासून सत्तर मीटर अंतरावर गावच स्मशान होत. ...Read More

14

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 14

भाग 5 थंडीचा महिना असल्याने मध्यरात्रीच पांढ़रट मंद धुक अवतीभवती पसरल होत. त्याच धुक्यातून चालत जातांना थंडी अंगाला चिटकली एक तीव्र सनक हाडा मांसात घुसत होती व थंडीच्या स्पर्शाने सर्व शरीर शहारुन उठत होत.. विलासरावांच्या पायात असलेल्या पैरागॉन चपलीचा चट चट आणी रातकिड्यांचा किरकिर असा मिश्रित आवाज त्यांच्या स्वत:च्या कानांवरच पडत होता. विलासराव बैटरीच्या पिवळसर उजेडात वाट कापत निघाले होते ..! तोच अचानक त्यांच्या मागून कोणीतरी वेगाने धावत गेल.. जमिनीवर धावतानाचा धप धप असा पावळांचा आवाज कानांवर पडला तसे विलासरावानी गर्रकन वळून मागे पाहिल.. हातातल्या बैटरीचा पिवळा प्रकाश मागे मारला.. पन बैटरीच्या उजेडात मागे धुक्याव्यतिरिक्त कोणिही दिसल नव्हत.. आपल्याकडे ...Read More

15

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 15

भाग 15अनुभव लेखण: जयेश झोमटेअनुभवकर्ता : रामदास धोंडे , कचरुबा भोईल कथा ! भुल्या - ते बोलावतंय. ! सदर सत्यअनुभव माझ्या काकांनी मला सांगितला आहे . तोच मी त्यांच्या हकीकतीनुसार ईथे सांगत आहे , ह्या सत्यअनुभवात काही काल्पनिक भयदृश्यांची जोड , वाचणा-यांच , ऐकणा-यांच भयमनोरंजन ह्या हेतूने जोडल गेल आहे. ह्याची सत्यअनुभवाच वाचन व ऐकणा-यांनीनोंद घ्यावी. मित्रहो कोंकण म्हंटल की नजरेसमोर येणार प्रथम दृष्य म्हंणजे मोठमोठाली हिरवी झाडे, तो अथांग निळा समुद्र, केळी,नारळ, चिकू,पेरुची झाडे असलेली बाग- कौलारु बसकी घर ...Read More

16

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 16

भाग 16भुल्या 2! भुल्या पायाखालचा रस्ता लाल मातीचा होता ,दोन्ही तर्फ उन्हाच्या झळ्यांनी सुकलेल हिरव गवत , जामिनदोस्त दिसत होत. रातकीड्यांची किरकिर कानांत ऐकू येत होती-हळकीशी थंडी अंगाला झोंबत होती, आजूबाजुला जरास माळरानच होत.. वा-याचा व्हू व्हू घोंघावण्याचा आवाज कानी पडत होता. हातातळ्या टॉर्चच्या पिवळसर उजेडात कचरुबा आपला मार्ग हेरत चालत निघाले होते.. टॉर्चच्या पिवळसर उजेडात खालची लाल माती , दिसत होती. आजूबाजुला निर्मनुष्य भाग असल्याने , जमिनीवर रेंगाळणा-या किड़यांना फिरायला कसलेच बंधन उरले नव्हते - पिवळ्या रंगाच्या ...Read More

17

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 17

भाग ३ आंतिमहळू हळू रात्रीचा प्रहार वर चढत होता , चंद्र आपली जागा बदलत होता , ढ्ग चंद्राजवळून वाहत पुढे निघुन जात होती . अस म्हंणतात थंड हवेचे झोत दुर दुरचे आवाज आपल्या सहित वाहून नेहतात.. कारण जंगलातच कोठेतरी , गुढ गर्भात एका हिंस्त्र श्वापद लांडग्याची विव्हळ फुटली... " व्हू..व्हू..व्हू...हुहुह्हू..!"तो आवाज कचरुबांच्या झोपेला चालवून गेला,आपसूकच त्यांचे दोन डोळे उघड़ले गेले.. कचरुबांच्या डाव्या हातात एक घड्याळ होत , त्यात मध्यरात्री अडीज वाजले होते..! पुन्हा एक फेरी मारुन याव अस ठरवून कचरुबा खाटेवरुन उठले ...Read More

18

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 18

देवी योगेश्वरी माता महिमा भाग 1नमस्कार मित्रहो सदर कथा सत्यघटनेवर आधारीत आहे .! ही सत्यकथा एका सब्क्राईरने मला सांगितली , आणी तीच सत्यकथा मी एका वेगळ्याच धाटणीसहित, भय मसाला लावून सादर करत आहे! नोट- लेखकाला कथेमार्फत समाजात अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे - उलट लोकांच्या मनात देवाविषयीची देवभावना आधिकपटीने जागृत व्हावी हाच लेखकाच हेतू आहे , चला तर आपण कथेला सुरुवात करुयात ! सत्य- कथा सुरु : वर्ष 2003 नमिता विकास शिंदे वय बावीस ह्यांच नुकतच2000 मध्ये लग्न झाल होत ! नमिताबाईंनी चित्रपटात पाहिल होत , हिरो - हिरोईनच लग्न होत - मग ...Read More

19

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 19

भाग २...नमिताबाई देवांसमोर उभ्या होत्या - दिवा लावून झाल होत ,तस त्यांनी हळकेच डोळे मिटले .. मागे पिवळा बल्ब पेटत होता , नमिताबाईंनी डोळे मिटताच झपकन तो पिवला बल्ब विझला , लाइट गेली होती ना ! नमिताबाईंच्या बंद पापण्यांवर पिवळसर प्रकाश किरणे तरळली..- आणी त्यांनी झटकन डोळे उघडले.. काहीवेळा अगोदर बल्बचा उजेड होता , आणी डोळे उघडताच गडद अंधार पसरला होता . देवांसमोर जळणारा दिवा आणी दिव्याचा तो पिवळसर प्रकाश जेमतेम दोन फुटांपर्यंत अंधाराळा चिरत जात होता , बाकी पुढचा हॉल पुर्णत गडद अंधारात बुडाला होता. ...Read More

20

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 20

भाग ३ मंदा काकू नमिताबाईना धीर देण्याशिवाय काय करु शकत होत्या? शेवटी नवरा - बायकोच्या संसारात अशी मोठी भांडण होत असतात अस सांगून त्या निघुन गेल्या.. पण मंदाकाकूंना हे ठावूक नव्हत , की ही तर फक्त अशुभाच्या संकटाची वाळवी लागण्यापुर्वीचीचाहुल आहे - सुरुवात आहे , पुढे पुढे तर भयंकर घटना घडणार होत्या. त्या दिवशी सुद्धा विकासराव दारु पिऊन आले , दरवाज्यात ठेपाळले - कडीचा खडखड आवाज झाला.. ! तो आवाज ऐकून संध्याकाळच जेवण बनवणा-या नमिता जराश्या घाईतच बाहेर आल्या. त्या एकटक मळूल नजरेने विकासरावांकडे पाहत होत्या ...Read More

21

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 21

भाग ४.... " कुठे गेली ही जोगतीन !" नमिताबाई स्वत:शीच म्हंटल्या. मग जास्तवेळ करण्यात न घालवता , त्यांनी बाजुचा सूप उचल्ला आणि घरात निघुन गेल्या.. त्याचदिवशी दुपारी एक बाई नमिताबाईंच्या घरी बसायला आली होती, ही बाई म्हंणजे विकासरावांसोबत काम करणा-या एका मित्राची बायको होती .. आणी विकासरावांच्या त्या मित्राच्या बायकोने नमिताबाईंना विकासरावांबद्दल काही काही सांगितल होत. " की विकास भाऊजींच , बाहेर एका बाईसोबत अनैतिक संबंध आहे , ती बाई भैय्यीन असून विधवा आहे , नवरा मेला आहे ,आणी विकासराव गेल्या तीन महिन्यापासून तिला ...Read More

22

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 22

सत्यकथेचे नाव- महाशिवरात्री स्पेशल महादेवाचा महिमा.. तर मित्रांनो सदर सत्यअनुभव घडला तो काळ आहे सन 2000 ते 2001 माझ्या मामांचे नाव मंदार जाधव आहे, त्यांचेमित्र समिर कामत ह्यांच्या परिवारांसमवेत ही सत्यघटना घडली आहे. तर या पाहुयात काय घडलं होत समिररावांच्या परिवारा समवेत! .. समिर चिंतामण कामत वय वर्ष चौथीस , ते पेशाने टैक्सी चालक होते. त्यांच्या परिवारात त्यांच्या धर्मपत्नी माधुरी समिर कामत वय वर्ष एकतीस , आणी एक अकरा वर्षाचा मुलगा अमर असा तिकडी परिवार होता. त्यांचे आई- वडिल वारुन सहा वर्ष झाली होती. ...Read More

23

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 23

महादेव महिमा भाग २" हे विठू- रुख्मीणी आई, श्रीपती बाबा, महादेवा माझ्याकडून चुकून , नकळत हे झाल आहे, मला करा आणी माझ्या घरावर कोणतही संकट येणार असेल तर त्या संकटापासून आमच रक्षण करा!"माधुरीबाईं देवांसमोर हात जोडून म्हंटल्या. व त्यांनी वळून दरवाज्यात पाहिल, जिथे अमर उभा होता. पन आता तिथे कोणीही नव्हता. गेला असेल पुन्हा बाहेर माधुरीबाईंनी मनातच उच्चारल ..! आणि उजव्या बाजुला वळल्या, समोरच पुढे किचनची खोली होती , त्या किचनमध्ये जेवन बनवायला निघुन गेल्या...चंद्राची कोर हळू हळू वर चढली जात होती, चौहू दिशेना कालोखाचे थैमान माजले होते ! बाहेरुन रातकीड्यांची ...Read More

24

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 24

महादेव महिमा भाग 32001अमरची लघुशंका उरकून झाली होती -त्याने पैंट वर केली- आणी लागलीच घरात जाण्यासाठी पाठमोरा वळला आणी जसा पाठमोरा वळला , मागून म्हातारलेला खर्जातल्या आवाजातली हाक आली.. " अ..म....र...!" तो खर्जातला घोगरा आवाज ऐकताच.. अमरच्या मणक्यातून थंडगार बर्फाची लाट पसरली, सर्व शरीर काठीसारख ताठरल..गेल.. अमरच्या एका खांद्यामागून वीस पावळांवरचा चंद्राच्या निळसर उजेडात बुडालेला आवार, आणी आवारातला तो पेरुचा झाड दिसत होता , ज्या झाडावरच्या एका फांदीवर , काळया लुगड्यातल्या धनूआज्जीच , पिंजारलेल्या पांढ-या केसांच प्रेत बसल होत.. अंधारात धनूआज्जीच्या डोळ्यांतले बुभळांचे कवडसे पिवळ्याजर्द प्रकाशाने चमकत होते ...Read More

25

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 25

भाग. ४ " ठक...ठक..!" दार ठोठावण्याचा आवाज येताच माधुरी बाईंनी खाडकन डोळे उघड़ले , अंथरुणातच उठुन " ईतक्या रात्री कोण असेल?"माधुरीबाई स्वत:शीच म्हंटल्या. " ठक..ठक...!"पुन्हा दारावर ठोठावल गेल. माधुरीबाई हळूच जागेवरुन उठल्या , दरवाज्यापाशी पोहचल्या आणि दरवाजा उघड़ण्यासाठी त्यांनी कडीवर हात ठेवला.. पन माधुरीबाईंनी कडी उघड़ली नाही, कारण त्यांना वेळीच आपल्या आईची एक गोष्ट लक्षात आली होती.. की भुतखेत , दोनदाच दरवाजा ठोठावतात ..तिस-यांदा ठोठवत नाही, ह्या सृष्टीच्या रचेत्याचे -निर्मात्याचे काही नियम आहेत , ज्या नियमांना बाळगूणच त्या आनिष्ठ शक्तिंना ईथे आसरा मिळाला आहे.. ...Read More

26

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 26

भाग ५ महादेव महिमा आंतिम आणी त्यांच्या वाक्यासरशी एक विलक्षण भयकारक गोष्ट घडली, बाजूलाच अंथरुणात झोपलेला खाडकन जागेवर उठून बसला.. वटारलेल्या जळजळीत नजरेने तो रमाबाईंकडे पाहत होता.. ती नजर एका दहा वर्षाच्या सामान्य मुलाची मुळीच वाटत नव्हती.. त्या नजरेत द्वेष,संताप, क्रोध सर्वाँच मिश्रण होत.. घशातून गुरगुरल्यासारखा आवाज काढ़त अमर कधी - माधुरीबाईंकडे तर कधी रमाबाईंकडे पाहत होता .. " अमर ? बाळा काय होतंय तुला असं का करतोयस..!" माधुरीबाईंनी अमरला काळजीच्या सुरात विचारल. पन प्रतिउत्तर अस आलं की ज्याचा ...Read More

27

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 27

जखिन भाग 1मोहिनी मुकुंद शेट्टे वय वर्ष पसतीस पेशाने सरकारी शिक्षिका होत्या , त्यांच्या परिवारात पती मुकुंदराव दहा वर्षा एटेक येऊन मय्यत झाले होते - म्हंणजेच 1992 ला..! मोहिनीबाईं बद्दल सांगायचं तर त्या देवांवर विश्वावास ठेवणा-या मधल्या नव्हत्या, आपण त्यांना नास्तिकच समजुयात.. नव-याच्या अकाळी जाण्याने जर कोणी दुसरी स्त्री असती तर तिने देवाला दोष दिल असत !वर्षभर तोंडात पदर खोचून हूंदके देत रडत राहिली असती,स्वत:च्या नशीबाला दोष देत बसली असती.. पन मोहिनीबाइंनी तस काहीही केल नव्हत..कारण त्यांच्या मते देव थोडीना त्यांच्या मदतीला येणार होता..! देव ...Read More

28

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 28

भाग २, 1/2/2002 गुरुवार ..दूसरा दिवस..: दुपारचे साडे बारा झाले होते.चारही दूपारचा कडक असा पिवळ्या धमक रंगाचा उन्ह पडलेला होता , चारही दिशेना वाहणारी हवा ,आपल्यासोबत उन्हाचा उष्मा घेऊन फिरत होती.. हवा शरीरावर आदळताच त्वचेला गरम झळ बसत होती.. शाळेतल्या सर्व मुलांची साडे बारा वाजताची पहिली सुट्टी झाली होती.. ! रिया आपल्या दोन मैत्रिणींसमवेत शाळेचा परिसरहिंडत होती..! तिच्या मैत्रिणीं कडूनच तिला शाळेच्या मागे मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे हे सुद्धा कळाल होत.. मैदानात दोन झोके होते, आणी पिवळ्या लाल रंगाचे दोन सिसॉही होते..! ...Read More

29

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 29

भाग३ त्याच वाहणा-या पांढरट धुक्यात , की धुरात ? त्या म्हातारीची आकृती अचानक धुक वाढ़ुन अचानक अंधूक व्हायची, मग पुन्हा जस धुक कमी व्हायचं ती म्हातारी डोळ्यांना नजरेस पडायची . त्या म्हातारीला अस अचानक अवतरलेल पाहून रियाला थोडस आश्चर्य वाटलं ..! " अहो आज्जी , तुम्ही कधी आलात..! "रियाने विचारल. रियाच्या बाळमनाला हे प्रश्ण पडणे साहजिकच होत. कारण काहीवेळा अगोदर बोरीजवळचा सर्वभाग रिकामा होता ना? तिथे तर कोणीच नव्हत ..ना? नक्की नव्हत ना ? ती म्हातारी कोठून आली ? कशी आली ? की अवतरली? कोणिही काहीच पाहिल नव्हत.! ...Read More