Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 15 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 15

The Author
Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 15

भाग 15


अनुभव लेखण: जयेश झोमटे 

अनुभवकर्ता : रामदास धोंडे , कचरुबा भोईल
        
             सत्यअनुभव  कथा 

     !  भुल्या - ते बोलावतंय. !


     सदर सत्यअनुभव माझ्या काकांनी मला सांगितला आहे . तोच मी त्यांच्या हकीकतीनुसार ईथे सांगत आहे , ह्या सत्यअनुभवात काही काल्पनिक भयदृश्यांची जोड , वाचणा-यांच , ऐकणा-यांच भयमनोरंजन  ह्या हेतूने जोडल गेल आहे. 
  ह्याची सत्यअनुभवाच  वाचन व ऐकणा-यांनी 
नोंद घ्यावी.


        
        मित्रहो कोंकण म्हंटल की नजरेसमोर येणार प्रथम दृष्य म्हंणजे  मोठमोठाली हिरवी झाडे,  तो अथांग निळा समुद्र, केळी,नारळ, चिकू,पेरुची झाडे असलेली बाग-  

        कौलारु बसकी घर , आणी कोंकण बांधवांचा आवडीच वाक्य - 
       "येवा येवा कोंकण आपलाच असा !"  

मित्रहो तुम्हाला ठावूक आहे का ? कोंकणात खुपसारी भुत आहेत- काहीजण तर कोंकणात फक्त ह्यासाठीच जातात की भुत पाहायला मिळतील.

कोंकणात भूतांचे पुढील प्रकार आढळता  झाडावर बसणारा  मुंजा - हा दिड फुट उंचीचा असतो - ह्या भुताच्या डोक्यावर मुंज केलेल असत,  दुसर आहे वेताळ - कोंकणात ह्यांस देव मानल जा!  आणि हे भूतांचे आधिपती आहेत - सर्वभुतखेत ह्यांच्या हाताखाली असतात... सवाशीण, जखीण, ब्रम्हराक्षस , अशी खुपसारी भुत कोंकणात आहेत. 

       त्यातलाच एक विचीत्र आणी भयंकर अस पिशाच्छ भुताचा सत्यअनुभव मी तुम्हासर्वाँसमोर सादर करत  आहे , ज्याच नाव आहे - 
       भुल्या - ते बोलावतय.          


        

        सत्यअनुभवानुसार         ही सदर घडलेली घटना फार  तर 1989  च्या आसपासची आहे. 

        

   सन  1989 
     माझे काका रामदास घोंडे  त्यावेळेस  वीस वर्षाचे होते.  त्यावेळेस ही घटना घडली होती.   
काकांच्या सांगण्यानुसार 
     काकांच्या आईचे , बाबा म्ह्ंणजेच कचरु ह्यांसमवेत  हा सत्यअनुभव घडला आहे . 
   या पाहुयात  काय झालं होत कचरुबांसोबत! 

        
1989 

   कचरुबा भोईल वय वर्ष (60 ) पेशाने ते शेतकरी होते ,  गावात त्यांच   दूमजली घर होत , एकेकाली गावात  सरपंच राहिलेल्या कचरुबांना गावात चांगलाच मान होता, 

        त्यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी नामाबाई , एक लग्न झालेला मुलगा सुधाकर भोईल, आणी सुधाकररावांच्या पत्नी निर्मळाबाई असा परिवार राहत  होता...  

        सुधाकरावांना अद्याप अपत्य नव्हत.

       कचरुबांच्या शेतावर  उसाची लागवड  व्हायची , पाण्यासाठी त्यांनी शेतावर विहिर खणली होती.
        त्या विहीरीतल पाणी  उसासाठी वापरल जायचं,         

कचरुबांच शेत तस म्हंणायला गावापासून तीन  किलोमीटर अंतरावर होत . 

आणी शेतापासून पुढे  अ जंगली ,माळरानाची हद सुरु व्हायची , ज्याने जंगलातल्या प्राण्यांची, उसाचे पिक खराब करण्याची  भीति होती 

        हो म्हंणायला शेताला चारही बाजुंनी तारेच कंपाउंड घातल होत..

        ज्याने काही अंशी फायदा झालाच होता..

            शेतात उसाची लागवड  होत असल्याने  कचरुबांचे पुत्र म्हंणजे सुधाकरराव रोज रात्री पहारा देण्यासाठी शेतावर जात असत ..


        कचरुबांचा शेतावर मळा  बांधला होता त्या मळ्यात एक झोपडी असून ,  झोपण्यासाठी  एक खाट, व  अंथरुण होत. 
      

     सुधाकरराव  त्याच झोपडीत झोपायचे, मग मध्यरात्री केव्हातरी जाग आली की..  पुन्हा एकदा एक पहा-याची चक्कर व्हायची ..आणी हे ठरलेल होत.
          मग रात्र सरली की सुधाकरराव सकाळी आठ वाजेपर्यंत पुन्हा घरी परत यायचे ..

        असाच दिनक्रम सुरु होता.

पन अश्याच एकेदिवशी सुधाकररावांना त्यांच्या पत्नी म्हंणजेच निर्मळाबाईंबरोबर सासूरवाडीला  जाव  लागल.
       ज्याकारणाने त्यादिवशी शेतावर कचरुबा ह्यांना जाव लागल होत..
       नसते गेले,  तर  जंगली जनावरांचा उसाचे पिक खराब करण्याची भीती होती.  

   ठरल्याप्रमाणे  जेवणखावण करुन ,  साडे सात  वाजता कचरुबा आरामात  शेतावर जायला निघाले..


          

         त्यांनी आपल्या सोबत  एक टॉर्च आणि थंडीपासून वाचण्यासाठी खांद्यावर एक काळी घोंगडी घेतली होती.

        जंगली प्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी  संरक्षणाखातर एक जाडजुड दंडगोल आकाराची 
काठी हाती घेतली होती, ज्या काठीला घुंगरु बांधले होते.. 

        कचरुबा आपल्या धर्मपत्नींना शेतावर जात आहोत अस कळवून घरातून बाहेर पडले..

        
           

       गावातून जात असतांना , ओळखीची लोक हात दाखवत होते, विचारपूस करत होते..

        कोठे निघालात  कचरुबा असं तस..! 
त्यावर ते आज मुलगा सासूरवाडीला गेला आहे तर 
शेतावर चाल्लोय पहा-याला अस  सांगायचे.

       एन दहा मिनीटात त्यांनी गावची वेस ओलांडली,
गावची घरे ,दारे ,मांणसांची रेलचेल  सर्वकाही आता मागे पडल होत. 

       आता कचरुबा एकटे होते, सोबत होती ती फक्त आकाशात उगवलेल्या पुर्णत वर्तूळाकार चंद्राच्या प्रकाशाची , रातकीड्यांच्या किरकीरण्याची .. 

       हातात असलेल्या काठीला लावलेल्या घुंगरांचा छण छन असा आवाज होत होता..

        कचरुबांनी गावाची वेस ओलांडली  , तेव्हा         
  त्यांच्या उजव्या बाजुला गावातल स्मशान होत , 
आज गावातली हिराबाई वय 96 सकाळी वारल्या होत्या.त्यांचीच मयताची चित्ता जळुन गेली होती.
        
   आता   त्या स्मशानात  जळून गेलेल्या चित्तेचा विस्तव रात्रीच्या थंड हवेच्या ताळावर थिरकत , निखा-यांसहित ऊजळत होत.. 
     दूरुन स्मशानात हवेवर  ऊजळणारा  तो भगवा विस्तव पाहता अस वाटत होत , की जळुन गेलेल प्रेत जिवंत होऊन लालसर चकचकत्या  डोळ्यांनी आपल्याकडेच पाहत आहे. 

        कचरुबा एकक्षण जागेवरच थांबले , मग त्यांनी स्मशानात पाहत दोन्ही हात जोडले . 

        कारण त्यांना हे ठावूक होत , जळणा -या चित्तेपाशी मेलेल्या मांणसाच आत्मा स्वत:च शरीर पुर्णत जळेपर्यंत जागेवरच उभ राहून  पाहत असतो.  

       हात जोडून झाल्यावर कचरुबा पुन्हा वाटेला लागले..! 

  

      क्रमशः