Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 23 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 23

The Author
Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 23

महादेव महिमा भाग २ 

" हे विठू- रुख्मीणी आई, श्रीपती बाबा, महादेवा माझ्याकडून चुकून , नकळत हे झाल आहे, मला माफ करा आणी माझ्या घरावर कोणतही संकट येणार असेल तर त्या संकटापासून आमच रक्षण करा!" 

माधुरीबाईं देवांसमोर हात जोडून म्हंटल्या. 

     व त्यांनी वळून दरवाज्यात पाहिल, जिथे अमर उभा होता.  पन आता तिथे कोणीही नव्हता. 




       गेला असेल पुन्हा बाहेर  माधुरीबाईंनी मनातच उच्चारल ..! 

        आणि उजव्या बाजुला वळल्या, समोरच पुढे किचनची खोली होती , त्या किचनमध्ये जेवन बनवायला निघुन गेल्या...
चंद्राची कोर हळू हळू वर चढली जात होती, चौहू दिशेना कालोखाचे थैमान माजले होते !  
      बाहेरुन रातकीड्यांची किरकिर ऐकू येत होती..
समिरराव धंद्यावरुन घरी आले होते..!  
       तसे साडे आठ दरम्यान त्यांच जेवण खावन झाल   माधवीबाईंनी भांडी वगेरे घासून ठेवली..
       
        आणी रात्री साडे नऊ , पावणे दहाच्या दरम्यान त्यांची झोपायची तैयारी सुरु झाली..   

      हॉलमध्येच अंथरुन टाकल होत, वर छप्पराव असलेला पंखा वेगान गोल गोल  फिरत होता..  

        हॉलमध्ये असलेल्या पिवळ्या बल्बच्या उजेडात हे दृष्य दिसत होत.

        अमरला लघुशंका आली तसा तो अंथरुणातून उठला..  अमरला  उठलेल पाहून माधुरीबाईंनी त्याला विचारल 

      " काय रे अमर  काय झालं ? रात्र झालीये ना , मग  झोप पाहू आता , .?"   
       अमरने आपल्या आईच्या वाक्यावर  फक्त 
एक कलंगडी दाखवली.. 

        माधुरीबाई सुद्धा  त्याला जा जाऊन ये एवढच म्हंटल्या.  
      अमरने घराचा दरवाजा उघड़ला , बाहेर आला. 


        रात्रीची वेळ असल्याने चौहू दिशेना चांदण्याचा निळसर प्रकाश पडला होता.. ! 

        रातकीटकांचा किरकिरण्याचा अभद्र आवाज अंधारातून ऐकू येत होता ,  

        कोठेतरी अंधा-या गल्लीत मोकाट सुटलेली कुत्री घसाफाडून  ' व्हू ...व्हू..व्हू..!" करत रडत होती. 

        अवतीभवती पसरलेल्या स्मशानशांततेत , 
  तो आवाज पुर्णत गावभर गुंजत फिरत होता.. .

        अमरच्या घराबाजूलाच अजुन  तीन चार घर होती , पन रात्र  झाल्याने सर्व मांणस झोपली होती.. 

        अंधारात ती सर्वघर काळ्याकुट्ट कब्रस्तानातल्या मृत शवपेट्यांसारखी दिसत होती..!  

      लहान  अमर लघवी करता करता अवतीभवती पाहत होता.. 
       त्या लहानग्या कोवळ्या वयाच्या मुलाला 
अंधारात पाहता थोडीशी भीतिच वाटत होती.       

अमरपासून पूढे वीस पावळांवर बाजुच्याच एका रहिवासी धनुआज्जीने बनवलेल तिच अवार होता , 
धनुआज्जी तीन आठवड्या अगोदरच वारली होती..
  अमरने त्या धनूआज्जीच तिरडीवर झोपलेल ,मईत उभ्या डोळ्यांनी पाहिल होत... 

        धनूआज्जीच मईत शरीरयष्टीने जाडजुड,डोक्यावरचे वय झाल्याने पिकलेले पांढरे केस अस्तव्यस्तपणे बाहेर आलेले , मयताचे कालसर वर्तूळार डोळे मिटलेले होते, तोंडाचा आ- वासलेला- त्यात तुळस ठेवलेली , नाकांत कापसाचे सफेद गोळे कोंबले होते..
कपाळावर कूंकू आणि एक अठाण्याचा नाणा ठेवला होता, ते मईत पाहता  अमर जरासा घाबरलाच होता..

धनुआज्जीच्या आवाराच्या  चारही बाजुंना वईच कंपाउंड होत - आणी मधोमध काट्याकुट्यां पासून तैयार केलेल  एक गेट बनवलेल... 

        आवारात खालची जामिन शेणाने सारवलेली होती, आवारात एक सफेद खोडाच चिकुच झाड होत, बाजुलाच रानातून तोडून आणलेली फाटी होती, त्याच फाट्यांतली अर्धी लाकड मईत जाळण्यासाठी वापरली होती...

            अमर त्या आवाराकडे पहायचं पुर्णपणे  टाळत होता , कारण त्याच्या एका मित्राने त्याला सांगितल होत की मेलेली धनूआज्जी  , रात्री तिच्या आवारात भटकते, पेरुच्या झाडावर  डोक्यावरचे पांढरे केस मोकळे सोडून, दोन्ही पाय खाली सोडून ते हळवत बसते..
     अमरच्या बाळमनात एक भीतिची ठिंणगी पेटली होती,  

        मनातल्या भीतिच्या गाभा-यातला पेटारा , त्या पेटा-याचा दरवाजा हळूच करकरत उघड़ला होता.. 
      आणी कल्पनाशक्तिमार्फत डोळ्यांसमोर नाही नाही ते दृष्य दिसत होते..   

        अमरची लघुशंका उरकून झाली होती - 
त्याने पैंट वर केली- आणी लागलीच घरात जाण्यासाठी पाठमोरा वळला 

        आणी जसा पाठमोरा वळला , मागून म्हातारलेला खर्जातल्या आवाजातली हाक आली..



क्रमशः 


टीप :  कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे -  पण लेखकाच समाज्यातअंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !
आपला प्रिय लेखक   मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही !   

       
  सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच ,शहराच नाव आणि   हे जरी सत्य असल तरी सुद्धा तिथली परिस्थिती सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत   सर्वच्या सर्वच परिस्थितीच काल्पनिक नजरेने पाहावी- आणी 

    फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

      ह्या कथेत लेखकाने  गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या   कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह   वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून  कडक, एक्शन घेतली जाईल!


        सदर कथेचे सर्व हक्क लेखकाकडे अगदी सुखरुप आहेत - कथा कॉपी पास्ट करुन आपल्या नावे
खपवून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही !
त्यांवर ऑनलाईन कारवाई केली जाईल