Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 36 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 36

The Author
Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 36

खुरश्या किरखीट भाग 3

घामाने ओळंचिंब झालेला निनांद त्या झुडपापाशी पोहचला - हिरव्यागार झुडपाला अंधाराने काळ्या अवदसेच रुप दिल होत , त्या काळ्या झुडपामागे काहीतरी भयानक , अवतारमय ध्यान - दबा धरुन बसल होत ,  

  निनांद त्याच्या जाळ्यात येण्याची वाट पाहत होत . 

        बसच्या खिडकीतून मैडम सेनरीटा निनांदला पुढे पुढे जातांना पाहत होत्या. 

        " निनांद sss!" मैमनी त्याला मोठ्याने आवाज दिला.       

        त्या आवाजाने तो प्रथम दचकला - दचकतच त्याने मागे वळून पाहिल- बसच्या फुटलेल्या मागच्या काचेतून, फुटलेल्या लाल रक्ताने माखलेल्या सुर्पनखासारख्या मैडम त्यालाच पाहत होत्या.. 

           दोघांची नजरा - नजर होताच मैडमनी त्याला मानेनेच तिकडे जाऊ नको असा ईशारा केला.

         निनांदच्या मनाला धोक्याची जाणिव होत होती , शेवटी त्याने पाऊले मागे घेतली- दोन पावले टाकली ना टाकली तोच झुडपातून एक राखाडी रंगाचा - प्रेताड, आकार हवेतून निनांदच्या दिशेने झेपावला - 

        " आर्घ्र्घ्र्घ्ह्ह्ह्ह!" विचीत्र आवाजात त्याने गर्जना केली ..

        त्याच्या तोंडातले तपकीरी दात , दिसले..

        निनांदची पाऊले जागीच गोठली गेली , खोंबण्यातले डोळे झटकन लेंस प्रमाणे मोठे झाले , तोंडाचा आवासला .. 

         भीतीने अंगावरचा एक नी एक केस शहारुन उभा राहीला होता.
      
 ते अभद्र ध्यान हवेतून , चार फुट उंचीवरुन वेगान खाली आल, निनांदच्या अंगावर झेपावल- 

        निनांदचा तोल जाऊन तो पाठणावर पडला - किरखीट निनांदच्या छाताडावर बसला.. - 

        निनांदला आता अगदी चेह-या जवळ आता त्या ध्यानाचा चेहरा दिसत होता.- 

        पुर्णत चेहरा प्रेताड- राखाडी रंगाचा होता , टोकदार कान होते , त्या कानांच्यात वर दोन सोनेरी रंगाच्या वाळ्या होत्या , डोक्यावर टक्कल होत ,डोळ्यांतली - लालसर बुभळ  
अंधारात चकाकत होती.. 

        नाकांच्या जागी फक्त दोन होल होते - 
 

        " सस्स्स्स्स्स्स ह्हाह्हह्ह!" किरखीटने        
आपल डोक खाली झुकवल- घाबरलेल्या भेदरलेल्या निनांदच्या देहातून भीतीचा वास नाकातून घेऊ लागला.. 

        किरखीटने हाताचा एक पंजा वर आणला , हाताच्या पंज्याला तपकीरी रंगाची धारधार पौलादी नख होत..- 

        ती नख पाहताच निनांदची हवा गुळ झाली..-   

        " नाही नाही..!" निनांद जिवाच्या आकांताने ओरडला. 

       

        त्या हैवानाच नख्यांचा हात त्याने वेगाने खाली आणला - कोणत्याही क्षणी निनांदचा शरीर कलेवर होणार होत.

          तोच , वातावरणात एक धाड असा आवाज झाला..- त्या आवाजासहितच किरखीटच मस्तक कलिंगड फुटाव तस, लहान-लहान तुकडे होत फुटल - त्याच्या , डोळे , आतडे-कोतड्या, मेंदू, नसा, हिरव चकाकत रक्त निनांदच्या अंगावर आभिषेक होत सांडल.. 

        बिन मस्तकाचा किरखीट निनांदच्या बाजुलाच खाली कोसळला -   

        तसे समोर हातात एक लांबलचक - नळीची, देशी कट्टा असलेली बंदुक रोखून जरा दूर उभा असलेला तृप्तेश नजरेस पडला..- 

        बंदुकीच्या लांबलचक नळीतून सफेद धुर बाहेर पडत होत..
        त्या नळीतून निघणार धुर , त्याने तोंडाजवळ आणत, धुरावर फुंकर मारली-  

        " व्हूहू ssss!" मग देसी बंदूक - पाठीत कमरेत खोवली- 


        

    " आह्ह्ह स्स्स्स!" बंदुकीच्या गरम नळीचा चटका पाठीला बसताच - तृप्तेश जरासा विव्हळला..- परंतू त्याने चेह-यावर तस दाखवल नाही.. 
उगीचंच ईज्जतचा फालुदा नको ! 

        
        पैरागॉनची चप्पल - चट, चट वाजवत तो 
जमिनीवर पडलेल्या निनांदजवळ आला.

        " ऑय ब्रदर !" दात विचकत तृप्तेशने निनांदला हात पुढे करत जमिनीवरुन ऊठवल..

        " तुम्ही, त्याला मारलत थँक यू सो मच !" निनांदने मोठा सुपरहीरो असल्यासारखा , तृप्तेशच हात धरुन दोन वेळा हळवल..

        " अरे मेंशन नॉट ब्रदर , मेंशन नॉट..! ते.." तृप्तेशने ओठांवरुन जीभ फिरवली " दोन हजार रुपये झाले , आपल्या कामाचे !" तृप्तेश कसतरीच निर्लज्जासारखा हसला.. 

        " औह अच्छा म्हंणजे तुम्ही, पैसे घेऊन ह्या अश्या भुत, खेत प्राण्यांना मारता तर !" निनांद म्हंणाला. 

        त्याच्या मागून मैडम- बाकी मुल-मुलीही आली. 

        खर तर तृप्तेशच काम हे फ्री होत , पन भुत मारायचे पैसे त्याला फार कमी मिळायचे , त्याचा म्हातारा मालक सर्व क्रेडिट घेऊन ह्याला ठेंगा द्यायचा - म्हंणूनच तृप्तेश वेगळे मिशनचे पैसे मागायचा.. - एकप्रकारे लाच म्हंणा! ( हरामी साला )

        " हो , हो - आई , आई एम पैयिन्ग घोस्टबस्टर!"तोडक्या मोडक्या इंग्रजित तृप्तेश म्हंटला. 

        मैडम, मुलिंनी तृप्तेशला गराडा घातला- व याला हात मिळवू लागल्या, सेनरीटा मैमनी तर त्याला गालावर किसही केल.

         तृप्तेशच्या मनात चांगलेच लाडू फुटत होते ! मनातल्या मनात तो जाम खुश होत होता. 

        तृप्तेशने हळुच वर पाहिल.

        " च्यायला, भगवान देता हे तो छप्पड फाडके देता है, आज पाहिल पन..हिह्ही!:" तृप्तेश स्वत:शीच मनात म्हंटला.. 

        तोच त्याच्या पाठीत एक लाथ बसली, 
   तृप्तेश जाऊन थेट सेनरीटा मैमच्या गळ्यातच पडला..

        झटकन तो मैमच्या गळ्यातून मागे झाला, 
जापानेज स्टाईलने मान खाली झुकवत आदबीने म्हंटला..
       

         " सॉरी, सॉरी मैम, .!" 
अस म्हंणतच तृप्तेशने मागे वळून पाहिलंं.. 

        समोरताच पाहताच एक क्षण त्याला जरासा धक्का बसला..-     


तृप्तेश पासून पंधरा पावळांवर, एक सहा फुट उंच असा हाडकुल्या शरीरयष्टीचा , भयानक अभद्र, ध्यान उभा होता.- 

           अंगात एक काळ्या रंगाच पाय घोळ झगा होता -डोक्यावर टक्कळ पडलेल होत , फिकट लालसर कातडीच डोक होत - त्या लाल कातडीतून त्याच्या डोक्यातला मेंदू लहान मोठा होत - धडधडताना स्पष्ट दिसत होता , डोक्यावर वट वृक्षाच्या फांद्यांप्रमाणे लाल नसा उठून वर आलेल्या दिसत होत्या - 

        डोळ्यांतील ती निळसर कचकड्याची बुभळ , रागाने तृप्तेशला खाऊ की गिळू ह्या नजरेन पाहत होती - 

        त्याच्या एका हातात एक तीन फुट लांबीचा , टोकदार कर्सर असलेला - हाडापासून बनलेला भाळा धरला होता -   

      तृप्तेशने एक नजर आपण मारलेल्या त्या हैवानावर टाकली, बाजुलाच हाईवेवर त्या बिनधडाच्या सैतानाच निर्जीव प्रेत पडल होत..

        " हा तर मेला , मग तू कोण रे ?" तृप्तेशने न घाबरता विचारलं .

        " तू ज्या किरखीटला मारलंस , त्याचा भाऊ - खुर्श्या! " खुर्श्या आपळे डोळे वटारुन , तृप्तेशला भीती दाखवत म्हंटला - 

        परंतू तृप्तेश काही कच्चा खिलाडी नव्हता - गेली अडिज वर्ष तो घोस्टबस्टर सेवेत होता -
भुता खेतांचा सामना कसा नीडर , उघड्या छातीने करायचं हे त्याला ठावूक होत , तशी ट्रेनिंग मिळाली होती - खासच ! 
     

             ." ए खुर्श्या ब्रदर जास्त डोळे वटारुन पाहू नकोस , नाहीतर बायकांच काजळ भरीन त्यात..!"   

  खुर्श्याचाने आपले तपकीरी रंगाचे दात एकमेकांवर घासत , आपल्या भाळ्याचा हात - त्याने मागे नेहला , त्याची ती निळसर कचकड्याची नजर समोर उभ्या - तृप्तेशवर फ़ीट झाली होती.. 

        हात पटकन मागे नेहत , त्याने तीव्र वेगाने भाळा हातून सोडला - सूईंन sss असा आवाज करत , हवेला सट, सट कापत - भाला तृप्तेशच्या दिशेने निघाला..- 

        तोच तृप्तेशने घाईघाईने, उजव्या बाजुला उडी घेतली- परंतू भाला वेगान आला होता - त्या भाल्याला तृप्तेशची बैग अडकली गेली,भाल्याच्या पात्याने फाटुन त्यातल सर्व सामान अस्तव्यस्थपणे - अवतीभवती विखुरल गेल..

        जमिनीवर सेफ ड्राईव्ह पोजिशनने उभा राहत ; तृप्तेशने फाटलेल्या बैग , आणि विखुरलेल्या सामानाकडे पाहिलं 

        ." अं , माझी डॉरेमॉनची पिशवी फाडली !" तृप्तेशने डोळे वटारुन जरा रागातच खुर्श्याकडे पाहिल." ए खुर्श्या तुझ्या तर आईxxx( तृप्तेशने थांबून - बाजुला मैम- मुलींकडे पाहिल) साल्या लेडीज लोक ईथ आहे म्हंणुन शिव्या देत नाही, तस तुला शिव्या द्यायला हव्यात हरामखोर पण लेडीज लोक आहेत म्हंणून आखडलो..- पण तु माझी बाईह फाडली प्रिय डॉरेमॉनच्या पिशवी फाड़ली आता तुला ही त्या पिशवी सारख फाडतो , तुझ्या तर आ sssss!" तृप्तेश गर्जना करत - खुर्श्याच्या दिशेने धावत निघाला, एक हात जरासा मागे नेहत - त्याने खुर्श्याच्या थोबाडात पंचमुखी पंच लगावली.. 

        " फट्ट "आवाज झाला..- पंचने खुर्श्याचा चेहरा जरासा डावीकडे झुकला..

        तृप्तेशच्या चेह-यावर विजयी हसू उमटल, त्याला वाटल - खुर्श्याला लागल- परंतू नाही, त्या हैवानाची कातडी अशी काही मजबूत होती- की ह्या मानवी वारानी तिला ईजा पोहचवण शक्य नव्हत ! त्यासाठी दैवी, अमानवीय शस्त्र हव होत.. 

        खुर्श्याने डाव्या बाजुला झुकवलेल तोंड़ , सरळ केल- शुन्य नजरेने त्याच्याकडे पाहिल.

     ती नजर पाहून तृप्तेशची हवा लीक झाली..  

        " ऑय ब्रदर , कसा आहेस - बॉडी शोडी मस्त आहे रे तुझी, सॉरी हं , मी तुला मी मारल ना चूकी झाली रे माफ कर मला - चल - येऊ मी,!" तृप्तेश गर्रकन वळला.. 

        तोच खुर्श्याने त्याच्या पाठीवर हात ठेवला , 

        " एवढी पन काय घाई आहे रे , जरा हात तर साफ करु दे..!" खुर्श्याने अस म्हंणतच.. 

        एका हातानेच तृप्तेशला वर उचल्ल, 
वेगान पुढे फेकल , तो जाऊन थेट बसच्या पत्र्यावर आदळला..- 

        " आह्ह्ह!" तृप्तेशने ओठांना हात लावल- ओठ फुटल होत , त्यातून लालसर रक्त बाहेर येत होत.. 

        खुर्श्याने जागेवरुन एक अमानवीय ज्ंप घेतली- हवेतून पाच फुट उंच उडत तो थेट तृप्तेशजवळ आला.. 

        खाली पडलेल्या तृप्तेशला त्याने पुन्हा वर उचल्ल, तृप्तेशच्या मागे एक फुट अंतरावर बसचा पत्रा होता - त्या पत्र्यावर तृप्तेशची पाठ पाच - सहा वेळा धप , धप, धप, धप आवाज करत तृप्तेशला कपडे धुवाव तस त्याची पाठ धुपटली.. 

        त्याची नवीन हुडी त्या वारानी मागून फुटून त्यांच्या चिंध्या झाल्या.

        " अबे बस्स कर ना ब्रदर ,कपडे फाडले - आता काय मला पण फाडतो का ?"  

        खुर्श्याने आपली भयंकर, आसुरी निळसर कचकड्याची नजर- तृप्तेशवर रोखली , जबड्यातले टोस्कूले पिशाच्छी दात दाखवत .. 
क्रोधाने उच्चारला..

         " माझ्या भावाला मारलंस ना ? आता तुझी - बारी..!" खुर्श्याने आपल्या हाताचा एक पंजा वर आणला - त्या काळ्याशार फेंगड्या कातडीच्या हातांना धारधार , अमानविय नख होती. 

       तीच नख त्याने तुप्तेशच्या छाताडावर ठेवली- हळू हळू ती आत घुसवली.

       चामडी फाडुन नख, मांसात रुतली- रक्त लटा लटा बाहेर पडू लागल.. 

        तृप्तेश वेदनेने ओरडू विव्हळू लागला..- बाजुला उभी सेनरीटा मैम, निनांद -मुल- मुली घाबरुन हे सर्व पाहत होती, कुणाची ही तृप्तेशची मदत करायची हिंम्मत होत नव्हती.. 

       " हिहिहिही, तुझ काळीज काढून खाणार ..!" खुर्श्या जबड्यातली- काळीशार जीभ , ओठांवर फिरवत म्हंटला.

         " काळीज ? माझ!" , तृप्तेशने दात - ओठांत चावले.. वेदनेला कस तरी थांबवल , तेवढ्या वेळेत तृप्तेशचा संताप, क्रोध उफाळुन वर आला होता..- 

        तोच तृप्तेशने आपल्या दोन्ही हातांची हालचाल केली , हातांची बोट अंगठे खुर्श्याच्या डोळ्यात घुसवली- 

        " आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!" तृप्तेशचा संताप गर्जनेतून बाहेर पडला- त्यासहितच हाताची बोट चिबिक असा आवाज करत आत गेली..

        खुर्श्या पिशाच्छाच्या पातळसर बुभळांना फाडत आत घुसली.. 

बुभळ फुटताच, खुर्श्याची तृप्तेशवरची पकड सुटली , अंगाची लाही लाही झाली- जात
 तो अंधळा झाला होता - हात हवेत वाकडे तिकडे हळवत मागे मागे जात होता.. 

        त्याच्या फुटलेल्या डोळ्यांतून हिरवट रंगाच चकाकत रक्त बाहेर पडत होत..- 

        तृप्तेशने आपल्या हातांकडे पाहिल , दोन्ही हात हिरव्या रक्ताने माखले होते..- तेच त्याने हुडीला पुसले..

        " काय करणार ब्रदर !" तृप्तेशने एक हात पाठीमागे नेहला, लांबलचक , देशी काळ्या रंगाची रिव्हॉलव्हर ( कट्टा) बाहेर काढली..

        " बोले तो पेट का सवाल है ब्रदर, !" तृप्तेशने कट्टयाचा चाप ओढला..- गोळी बंदुकीच्या नळीत घुसली.. 

        तो चाप ओढल्याचा आवाज त्या हैवानाने ऐकला तसे त्याचे हवेत फिरणारे हात थांबले..

          " सॉरी ऑय ब्रदर, तसं खर सांगायचं तर मी उगीचंच कुणाला मारत नाही, बाटलीत भरतो - पण तुझ्यासारखी सैतानी बापाची निर्लज्ज पैदाईश असली , की कधी कधी माझा ही नाईलाज होतो!" तृप्तेशने एक डोळा बंद करुन रिव्हॉलवरचा खटका ओढला... 

        " धाड sss ..!" त्या स्मशान शांततेत - गोळीचा आवाज दुर दुर जात घुमला.. -

        बंदुकीच्या नळीतून सफेद धुर उडवत गोळी बाहेर पडली- वेगान खुर्श्याच्या मस्तकाच वेध घेत आत घुसली.. - 

        पुन्हा तेच घडल, खुर्श्याच मस्तकही कलिंगडासारख फुटल..- धड फुटताच आतून हिरवट खूनाचा झरा बाहेर पडल..- चारही दिशेना चमचमत उडाला... 

        खुर्श्या आणि किरखीट दोघांच अंत झाल होत -

       
     तृप्तेशने जरास नैराश्यजनक नजरेनेच स्वत: कडे पाहिल.. 

          " हुडी फाटली , ट्रैक पेंट पण फाडली , बैग पण फाडली..- आधिच भिकारी होतो, आता कंगाळ झालो..!" तृप्तेश स्वत:शीच पुटपुटत होता..   

       सेनरीटा मैम, निनांद - मुल-मुली सर्वाँनी तृप्तेशचे आभार मानले , परंतू पैसे घ्यायच तृप्तेश काही विसरला नाही..- शेवटी पोटा पाण्याचा प्रश्ण होता..

        सेनरीटा मैम, निनांद सर्वाँच्या फोनला , ती दोन्ही हैवान मरताच रेंज आली होती -    

तोच त्यांनी पोलिस - आणी एम्बुलेंस वाल्यांना कॉल केल.. काहीवेळातच ते घटनास्थळावर पोहचणार होते..

        तो पर्यंत तृप्तेशन तिथून सर्व सामान उचलून काढता पाय घेतला , त्याला स्वत:ची उपस्थिती तिथे ठेवण धोक्याच होत..- शेवटी तो एक घोस्टबस्टर - घोस्ट किलर होता.. 

       तसे सर्वाँना हाई- बाई करुन तृप्तेश द घोस्ट किलर निघुन गेला..- दुस-या मिशनच्या शोधा साठी 



समाप्त: