भाग ५ महादेव महिमा आंतिम
आणी त्यांच्या वाक्यासरशी एक विलक्षण भयकारक गोष्ट घडली, बाजूलाच अंथरुणात झोपलेला अमर खाडकन जागेवर उठून बसला..
वटारलेल्या जळजळीत नजरेने तो रमाबाईंकडे पाहत होता..
ती नजर एका दहा वर्षाच्या सामान्य मुलाची मुळीच वाटत नव्हती..
त्या नजरेत द्वेष,संताप, क्रोध सर्वाँच मिश्रण होत..
घशातून गुरगुरल्यासारखा आवाज काढ़त अमर कधी - माधुरीबाईंकडे तर कधी रमाबाईंकडे पाहत होता ..
" अमर ? बाळा काय होतंय तुला असं का करतोयस..!"
माधुरीबाईंनी अमरला काळजीच्या सुरात विचारल.
पन प्रतिउत्तर अस आलं की ज्याचा ह्या दोन्ही मायलेकींनी कधीच विचारही केला नव्हता..
" ए भवाने गप्प!"
दहा वर्षाच्या अमरच्या तोंडून एका मोठ्या पुरुषाचा आवाज बाहेर आला. - ज्याची कोणीच कल्पनाही केली नव्हती..
" मी तुझा अमर नाहीये! तुझ्या ह्या कार्ट्याने माझ्या उता-याला खराब केलंन , ह्या ..ह्या..कार्ट्याला आता मी सोडणार नाही, येत्या पोर्णीमेच्या रात्रीला..
याला घेऊन जाणार मी , माझ्या सोबत घेऊन जाणार मी ह्याला.. ! आणी मी बघतोच तू ह्याला त्या भगत्या बाबाकड कशी घेऊन जाते ते..! "
अमरची ती खूनशी नजर माधुरीबाई आणि रमाबाई दोघींवर फिरत होती..
समोर घडणार दृष्य पाहून , त्या दोघिंची मतीच चक्रावली होती..
भीतिचा एक भयंकर असा स्फोट घडला होता..
त्या दोघीही विस्फारलेल्या भयभीत नजरेने अमरकडे एकटक पाहत होत्या तोच अमरच सर्व शरीर मागच्या
मागे अंथरुणावर कोसळल , त्याच्या अंगात आलेली शक्ती जणू सुप्त अवस्थेत गेली होती..
" आई..!" माधुरीबाईंनी आपल्या आईकडे पाहिल.
तोच माधुरीच्या आईनी तिला मध्येच थांबवल आणि बाहेर चल अस बोलल्या..
दोघिही बाहेर उन्हात आल्या, तसे माधुरीबाईंनी आता काय करायचं आई अस विचारल..
माधुरीबाईंच्या वाक्यावर रमाबाईंनी
तिला सांगितल की जावईबापू आणि तुझ्या पप्पांना फोन करुन लागलीच ईथे बोलावून घे , हे प्रकरण आपल्या हाताबाहेरच आहे , माधुरीबाईंनी
प्रथम आपल्या वडीलांना कॉल केला - त्यांना अमरबद्दल काहीवेळा अगोदर घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला.. !
मग माधुरीबाईंनी समिररावांना कॉल केला ,समिररावांना सुद्धा घडलेली हकीकत सांगितली.
काहीवेळाने समिरराव - आणि माधुरीचे बाबा रामचंदराव तिथे आले..
समिररावांबरोबर माझे मामा मंदार सुद्धा आले होते , कारण ते समिररावांचे जिगरी दोस्त होते.
समिररावांच्या सास-यांनी म्हंणजेच हेमचंद्र यांनी त्यांच्या ओळखीत एक बाबा होते , त्यांनी लागलीच बाबां आ फोन लावला आणि घडलेली हकीकत सांगितली..
ते बाबा हेमचंद्र यांचे ओळखीचे होते, म्हंणुनच ते समिररावांच्या घरी स्वत:हाच यायला तैयार झाले ..
व बाबा म्हंणाले ..
" की मी येई पर्यंत अमर जवळच थांबा..!"
सर्वजन समिररावांच्या घरातल्या हॉलमध्ये जमले होते..
कोणीही कोणाशीच काही बोलत नव्हता.
तेवढ्यात समिररावांच्या घरासमोर एक फॉर व्हीलर येऊन थांबली..
फॉर व्हीलर मधुन मागच्या बाजूचा दरवाजा उघडून एक सत्तर -एंशी वर्षाचा म्हातारा बाहेर आला. अंगात सफेद शर्ट, खाली काली पेंट, हातात घड्याळ.. कोण म्हंणेल हा माणुस कोनी बाबा वगेरे आहे?
पन खरच अशी मांणस आस्तित्वात आहेत, जी नेगेटीव एनर्जी पाहू शकतात,त्यांना रोखू शकताता..
ते बाबा समिररावांच्या घराच्या दिशेने आले ,
येताच पायरीवर थांबले, दोन तीन वेळा नाकपुड्या फुगवून त्यांनी श्वास घेतला आणी मग होकारार्थी मान हळवली..
घराची चौकट ओलांडून ते आत आले ,
आत येताच त्यांनी मंद स्मित हसत सर्वाँकडे पाहिल
" एक ग्लास पाणी आणा..!"
ते बाबा बोलले.
माधुरीबाईंनी एक ग्लास पाणि आणुन त्यांच्या हातात दिल..
" काय झालं पोराला !"
त्या बाबांनी विचारल.
तस समिररावांनी अमरच त्या रात्री अंगणात बेशुद्धीपासून ते दवाखाणे, आणी आताच्या घटनेपर्यंतचा सर्व घटनाक्रम त्या बाबांना सांगितला.
घटना ऐकता ऐकता त्या बाबांनी पाण्याचा एक घोट घेतला, आणी एक हात शर्टाच्या वरच्या खिशात घालून एक पुडी बाहेर काढली..
ती पुडी खोल्ली , व त्यात असलेली पांढरट राख पाण्यात टाकली..
" पोराला उठवा, आणी दोघांनी त्याला गच्च धरुन ठेवा..!" बाबा म्हंटले.
समिरराव आणि माझ्या मामांनी अमरला पकडून ठेवल..
अमर अद्याप झोपलेलाच होता..
त्या बाबांनी हळूच ग्लासातल थोडस पाणी
उजव्या हातात घेतल ,आणी अमरच्या तोंडावर शिंपडल.
पाण्याचा स्पर्श होताच अमरच्या आत लपलेली शक्ति मुळाच्या देठापासून ओरडली, तीचा तो आक्रोश सुरु झाला..
अमरच्या आत लपलेल ते हिंस्त्र दानव
मोठ मोठ्याने गलिच्छ श्ब्दाचे वापर करुन बाबांना शिवा घालत होत..
अमरचे एक एक खांदे पकडलेले समिरराव , माझे मामा मंदार दोघांनाही अमरच हे वागण आश्चर्य,नवळ,भीति ह्या सर्व भावनांच उद्दार करुन गेल होत..
" ए थेरड्या हरामखोर, तुझ्या आईची xx गांxx तुझ्या ! काय मुत शिंपडतो हे हा.. रांडxx ! एकदाच सांगतो माझ्या नांदी लागू नको, नाहीतर ..!"
अमरच्या अंगात आलेल्या त्या ध्यानाने बाबांना धमकी दिली.
" अरे ए चांडाळा दहा अकरा वर्षाच पोर आहे ते , त्याला तुझ्या उता-यातला काय फरक कळनार आहे हा? महिनाभर ह्या मुलाला तू कशासाठी पकडून ठेवलं आहेस , सोडून दे ह्या छोक -याला , हव तर मी तुला मुक्ति देतो..!" बाबा करड्या स्वरात बोल्ले.
" नाही मुक्ति बिक्ती नको मला..! मला हाच पाहिजे , मी ह्याला पोर्णीमेला घेऊन जाणार...!"
खर्जातल्या आवाजात ते ध्यान म्हंटल.
ते स्वत:च्या अटीवर ठामपणे उभच होत..
" म्हंणजे तू ऐकणार नाहीस तर !"
बाबांनी हातातल्या ग्लासातल पाणी हळू हळू
उजव्या हातावर घेऊन अमरच्या अंगावर शिंपडायला सुरुवात केली..
ते साधारणस पानी आता साधारण नव्हत, बाबांनी.त्यात ती राख मिक्स केली होती..
ज्या राखेत काही काही असे घटक होते, जे अमानवीय शक्तिला इजा पोहचावत होते..
अमरच्या देहात लपलेली ती आनिष्ठ शक्ति
त्या पाण्याच्या स्पर्शाने अखंड वेदना झेलत होती..
शेवटी वेदनेचा उच्चांक वाढला तसे तिने हार पत्कारली .. आणी अमरच्या सर्व शरीराला एक झटका बसला ,अमरच सर्व शरीर निर्जीव झाल.. अमरला तसे अमरल पुन्हा अंथरुणावर झोपवल गेल..
आणी ते बाबा बोलू लागले..
" तुमच्या पोराने एका द्रुष्ट आत्म्याच्या उता-याला हात लावल होत ,आणी त्या उता-यावर असलेली ती द्रुष्ट शक्ती अमरच्या पाठी पाठी ईतपर्यंत आली होती, आणि त्याला झपाटायचीच संधी शोधत होती..जी की त्याला तेव्हा भेटली जेव्हा अमर अंगणात बेशुद्ध झाला होता..! त्यानंतर रात्री चार दिवसांअगोदर तुम्हाला ज्या दारावर थापा ऐकू आल्या, तेव्हा तो द्रुष्ट काळ आत्मा तुम्च्या पोराला नेहायला आला होता..! पन तुम्ही जो महादेवाचा महामृत्युंज मंत्र पठण केलात , आणी ती रुद्राक्ष माळा कडीवर ठेवली , तेव्हा तो काळ घाबरला..- कारण महादेव भूतांचे धनी आहेत , साक्षात महादेवाने वेताळाला भुतांचा आधिपती बनवला आहे, आता मी काय सांगतो ती एक गोष्ट करा..! अमरच्या गळ्यात ती उपासनेची माळ महिनाभर घालूनच ठेवा - , आणी येत्या दोन महिन्यांवर महाशिवरात्री आहे , महाशिवरात्री येई पर्यंत घराच्या पायरीवर झोपायच्या अगोदर रात्री एक टिवळी पेटवून ठेवत जा..! आणी पटलंच तर अमरला महिनाभर कोठेतरी नातेवाईकांकडे पाठवा ."
बाबांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी जशाच्या
तश्या पार पाडल्या गेल्या होत्या..!
माधुरीबाई आपल्या बाळंतपणासाठी
अमरला.घेऊन माहेरी गेल्या , समिरराव मात्र महिनाभर घरी राहिले - आणी मग जेव्हा महिनाभरानंतर माधुरीबाईंची प्रसुती झाली तेव्हा त्यांना कन्या रत्न प्राप्त झाल होत.. !
तेव्हाच समिरराव सासरी गेले होते , आणी रात्री समिररावांच्या पायरीत दिवा माझे मंदार काका पेटवायचे..
मंदार काकांना दिवा पेटवतांना दोन-तीन वेळा मागे कोणितरी उभ असल्याचा भास ही झाला होता.पण त्यांनी मागे वळून पाहिल नव्हत..
शेवटी एकदाची महाशिवरात्री आली, आणी सर्वकाही ठिक झाल..
तो पर्यंत अमर सुद्धा ठणठनित बरा झाला होता..!
त्याच्या नशीबात आलेल्या द्रुष्ट चक्राच महादेवांच्या कृपेने अंत झाल होत...!
अमरची सुखरुप सुटका झाली होती..
समाप्त..!