लेख : जयेश झोमटे
💀 : खुर्श्या किरखीट
स्थळ :नाशिक फोरेस्ट हाईवे मध्यरात्री एक वाजता
आसमनांत चौहूदिशेना ठळक अशी काजळरात पसरली होती - मध्यरात्रीच्या त्या कातर अशुभ समई , त्या घनगर्द जंगलातल्या मोठ मोठ्या वृक्ष कायेमधून भुतासारखा वर्तूळाकारात , हिरवी पाने सोबत घेऊन हसत - खिदळत वारा वाहत होता -
जंगलातल्या झाडांवरच्या फांद्यांवर कित्येकतरी काळ्या कातडीच्या पिसांचे कावळे बसले होते.
आवाज न करता ते सर्व कावळे बसले होते..
जणु त्यांची बैठक सुरु होती ? किंवा काहीतरी घडणार होत ? अशुभ! अनाकलनिय, असा थरार.? ज्या भयानक घटनेची ह्या सर्व कावळ्यांन आधीच चुणूक लागली होती ?
वातावरणात हळकासा थंडावा जाणवत होता - किटकांची किरकिर सुरु होती, मध्येच झाडावरच्या शेंड्यांच्या वरुन आकाशातून एक टीटवी- टीवटीव करत अभद्र मृत्यूनांद घुमवत उडून गेली..
रस्त्याबाजुलाच एक हिरव्या रंगाचा पत्र्याचा फळा होता- लोखंडामार्फत जमिनीत गाडलेला दिसत होता- त्याच फळ्यावर सफेद अक्षरांत नाव लिहिल होत , (नाशिक वनविभाग ) त्या नावाखाली जंगलाचा नकाशा कोरला होता. त्याखाली जंगल कीती मोठ आहे , हे लिहिल होती -
जंगल पूर्ण दहा 10 किलोमीटर पर्यंत चौहूदिशेना पसरलेला होता - त्या जंगलातून हा हाईवे वाकडे तिकडे वळण घेत , आतून जात होता -
ह्या जंगलाची एक खासियत होती - की दिवसा हिरव्यागार झाडांनी नटलेला हा निसर्गाच वरदान लाभलेला जंगल, रात्र होताच- एक वेगळंच आणि विचीत्र , भयावह असा रुप घेऊन उभा राहत होता..
दिवसा ढवळ्या हिरवीगार शाळूची गुढघ्यांईतकी वाढलेली गवते - दिवसा हवेच्या ताळावर डुलत असायची, सकाळ -दूपार ह्या जंगलात पक्ष्यांची चिवचिवाट चालायची, त्या आवाजांनी ते जंगल अगदी मन प्रसन्न फिल द्यायचं ! ऐकणारा संमोहिंत होऊन ते आवाज ऐकत असायचं!
परंतू जशी रात्र व्हायची, ती दिवसा वा-याच्या ताळावर थिरकणारी गवत , एका बुटक्या भुताच रुप घेऊन उभ असल्याचा भास व्हायचा -..
संध्याकाळ होताच , पक्षांची - किलबिल पार बंद होऊन जायची- वातावरण अगदी भक्कास , शांत होऊन जायचं !
ह्या हाईवेबद्दल एक गोष्ट सांगितली जायची, अफवा की हकीकत ? कोणासठावूक पण लोक सांगाययची - की ह्या नाशिकच्या जंगलात खुर्श्या किरखीट नामक पिशाच्छ फिरतो,
किरखीट पिशाच्छ दर पाच वर्ष झोपलेल असतो , मग दर पाच वर्षानंतर नऊ दिवसांसाठी तो जागा होतो, नऊ दिवस फक्त आणि फक्त खात राहतो, हा किरखीट माणसाच शिकार करतो - मानवी शरीरातील - अवयव खातो , आतडे, हदय, डोळे, तोंड-जीभ, नाक, कान - स्नायू, माणवाच सर्व शरीर आतून आळीसारख पोखरुन खाल्ल , की उरलेली माणवाची खाळ- त्वचा , त्या खाळेत भुसा भरुन - तो त्याच्या बंगल्यात भिंतींवर अटकवून ठेवतो - त्याला त्या कामात आसुरी मज्जा मिळते - आपण किती कर्तब करुन दाखवले त्याच्या साठी त्या मानवी प्रेतांची खाळ म्हंणजे एका बक्षीसे पेक्षा कमी नसत..
2020 कोरोना वायरस नंतर नाशिकच्या जंगलात - आज 2025 ह्या वर्षी पुन्हा एकदा ती वेळ आली होती , तो त्याच्या असीम निद्रेतून जागा झाला होता - नव दिवस आता फक्त आणि फक्त हवरटा सारखा चरण्यासाठी.. तो निद्रेतून जागा झाला होता.
नाशिकच्या हाईवेवरुन ती पिवळ्या रंगाची बस , वेगान धावत निघाली होती - रात्रीचा प्रहार असल्याने गाड्या कमीच होत्या -
ड्राईव्हरला भलताच उत आला होता - गाडी तब्बल शंभरीच अंक ओलांडून दिडशेच्या वेगाला धरायला निघाली होती.
स्पीडोमीटर वर गाडीचा स्पीड काटा वेगान 110,120 , 130, 140 अस करत करत 150 वर पोहचला होता -
बसची पिवळसर हेडलाईट रस्त्यामधोमध असलेल्या धुक्याला धडक देत - सरसर आवाज करत , हाईवेच्या मधोमध असलेल्या क्रोसलाईनच्या सफेद पट्टयाना एक एक करत गिळत मागे टाकत पुढे जात होती..
ड्राईव्ह सीटवर सत्तरी पार केलेला म्हातारा बसला होता - ड्राईव्हरचे पांढरे केस पाहता , तो एक हैवी ड्राईव्हर वाटत होता..गाडी त्याच्या चांगलीच हातात बसलेली दिसत होती.
त्या म्हाता-या ड्राईव्हरच्या बाजुला एक लाल साडी, अंगावर काळा स्टाईलीश ब्लाउज, साडीचा पदर ब्लाऊजला असा काही बसवला होता , की त्या ब्लाऊज मधून उरोजांची ती दूहेरी रेषा दिसत होती -
गौर वर्ण चेहरा , लहानसर डोळे, कोरीव भुवया- डोक्यावरचे फिकट तपकीरी रंगाने रंगवले होते..
छातीवर असलेल्या लाल साडीवर एक काळी पट्टी लावली होती - त्यावर ह्या मैडमच नाव लिहिल होत , सेनरीटा बक्षी ..
सेनरीटा मैडम तरुण होत्या - मॉडर्न विचारांच्या होत्या -
त्यांच राहणीमान पाहून कळल असेलच!
बसमागे पेसेंजर सीटवर बारावीच्या कॉलेज- मुल -मुली गाण्यांच्या भेंड्या खेळत बसली होती..
त्या सर्वाँचा आवाज येत होता.
" यह..ssss मेरा दिल प्यार का दिवाना ..!"
त्याच मुलांमधला - एक तरुन!
गो -यापान चेह-याचा मुलगा आपल्या सीटच्या जागेवर उभा राहून , एका मुलीकडे पाहत गाण बोलू.. लागला..
" दिवाना , दिवाना प्यार का परवाना - आता है मुझको प्यार में जल जलना , यह मेरा दिल प्यार का दिवाना ..!" तो त्याच्या सीटवरुन बाहेर पड़ला - बाकीची मुल हसत ,टाळ्या वाजवत त्याला साथ देत होती -
बसच्या रुफ साईटवर पिवळ्या रंगाच्या ट्यूब लाईटज पेटल्या होत्या- ज्या पिवळ्या ट्यूबचा प्रकाश , ह्या सर्व मुला -मुलींवर पडला होता..
त्याच मुलींच्यामध्ये एक गोरीपान , अगदी स्वर्गातली अप्सराच जणू अशी - मुलगी बसली होती , तीचे ओठ गुलाबी होते , गुलाब्यांच्या पाकळ्या जनु - तीचे काळेशार केसांच्या दोन वेण्या बांधल्या होत्या - भुवया जरा मोठ्या होत्या - डोळ्यांची फुलपाखराच्या पंखाप्रमाणे बुभळ होती - फडफड करत होती..
तीचे टपोरे पाणीदार डोळे त्याच्याकडेच पाहत होते - मध्येच लाजेने -नजर खाली जात होती, आणि तिच्या गो-यापान गाळांवर एक गुलाबी खली पडत होती..
मध्येच त्या गुलाबी लालसर स्ट्रॉबेरीसारख्या ओठांवर हसू उमटत होत..
नक्कीच , नक्कीच ते हसू त्याला पाहताच उमटत होत..! (त्याची ती छपरी गिरी पाहूण उमटत होत . ईतिहास गवाह है, पोरींना ही असली छपरी पोर आवडतात असो! )
तो तिच्यापाशी चालत आला ,
पाठ थोडी वाकवून अगदी तिच्या चेह-या जवळ जात म्हंटला..
" दिल वो चाहे जिसे, चाहे जिसे उसे पाए प्यार वो , यार के जो नाम पे ही मीट जाए - जान के बदलें में , जान लू नजराना -
पल पल एक हलचल , दिल में एक तुफान ही आने को है वो मंजिल - जिसका मुझे अरमां है, भुलेगा ना तुझे , दिल का ये टकराना ..!"
एवढ म्हंणतच- तो बिनधास्त, आजुबाजुच्या मुला-मुलींचा विचार न करता - तिच्या अगदी चेह-याजवळ आला , ईतका की अगदी दोघांच्या नाकपुड्यांमधून निघणारे गरम श्वासांची देवाण घेवान होत होती..
डोळ्यांची बुभळे अगदी - बुभळांना कनेक्ट झाली होती- अचानक घडलेल्या ह्या प्रसंगाची तीने कल्पना केली नसावी, तीचे छातीतले ठोके धडधड करत वाजत होते..
डोळ्यांच्या पापण्या न मिटताच त्याने एकवेळ तिच्या टपो-या घा-या डोळ्यांमध्ये पाहिल, आणि मग एक कटाक्ष हळूच लालसर ओठांवर टाकला , मग पुन्हा डोळ्यांत पाहिल- तो ती हळूच दोघेही काय समजायचं ते समजून गेले आणी दोघांही आप- आपले ओठ पुढे आणले..
आजूबाजूची मुल- मुली डोळे फाडून पुढे घडणारा हा रोमांस पाहत होता..
अचानक त्या मुलाच्या पाठीवर एक हात आला , त्या हाताने त्या बिचा-याच्या ओठांच रसपान न होऊ देता झटकन त्याला मागे खेचल..
त्याने आपल्या ओठांचा पाऊच केला होता - पन किस वगैरे अस काहीच झालं नाही हे पाहता , त्याने डोळे उघड़ले आणि समोर पाहिल, तर समोर सेनरीटा मैडम उभ्या होत्या..
एक भुवई उंचावून त्याच्या कडेच पाहत होत्या.
मैडमना पाहताच त्याच्या पाऊच केलेल्या ओठातून भसकन सिगारेटसारख धुर निघाल..- व तो खोकू लागला..
" म म...म मैडम तुम्ही.!"
तो म्हंटला.
" हो मीच , गाण्यांच्या भेंड्या खेळत होतात ना तुम्ही ? की किस किस खेळत होतात.!" मैडम जराश्या गाळात हसल्या..
तशी बाजुला बसलेली ती मुलगी ही लाजली..
बाकीची मुल मुली दात - काढ़त हसत होती.
तोच अचानक बसला ब्रेक बसला - टायर घासल्याचा मोठा आवाज झाला - त्या सुनसान हाईवेवर ती पिवळ्या रंगाची बस थांबलेली दिसत होती..
बसच्या दोन्ही बाजुला हिरव्या रंगाची झाडे होती - खालचा रस्ता नुकतच पाऊस पडून गेल्यासारखा , ओळा झाला होता..
त्याच रस्त्यावर बसच्या चाकांतून पांढरट रंगाच धुर निघाल जात बस उभी होती .
अचानक बसला ब्रेक बसल्याने मैडम पडता पडता वाचल्या होत्या - तो मुलगाही पडता वाचला होता.
" ओ ड्राईव्हर काका ? काय झालं ? अस अचानक ब्रेक का दाबलं ? !" मैडम अस म्हंणतच ड्राईव्ह सीटपाशी आल्या..
परंतू ड्राईव्ह सीट मात्र रिकामी होती - काहीवेळा अगोदर ड्राईव्हसीटवर बसलेला तो म्हातारा आता सीटवर नव्हता.
" ड्राईव्हर काका ? हा ड्राईव्हर काका कुठे गेला ?" मैडम स्वत: शीच म्हंटल्या.
" काय झालं मैम ? एनी प्रॉब्लेम.!"
तो मगाचसा मुलगा सेनरीटा मैडम जवळ आला.
" अरे यश - ड्राईव्हर काका त्यांच्या सीटवर नाहीयेत ,कुठे गेले कुणास ठावूक!"
सेनरीटा मैडम.!
अच्छा त्या मुलाच नव यश होत तर !
" डोंट वरी मैम, ईथेच कुठेतरी असतील ते , मला वाटत जरा वॉशरुम गेले अशणार !" यश म्हंटला.
" हो ना यश बरोबर बोलतोय, तस्ंही सीटवर बसून बसून तुंबले असतील काका( बाजुला एवढी भारी आईटम बसलेली असतांना म्हातारा हर्नी झाला..! !"
यशचा मित्र निनांद गालात हसत म्हंटला ( शेवटच वाक्य त्याने अगदी पुटपुटल्यासारख म्हंटल...!
सेनरीटा मैमनी फक्त मान हळवली मग अचानक मैमना निनांदच्या वाक्यातल ते श्ब्द आठवल
" एक मिनीट तुंबले असतील ,म्हंणजे?"
सेनरीटा मैम न समजून म्हंटल्या..
" अहो मैम, म्हंणजे !" यशने निनांदच्या पोटात कोपरा मारला.! " आह्ह!" निनांदने जरा विव्हळतच पोटाला हात लावल.
" जरा वॉशरुमला गेले असतील, येतीलच..!"
" अच्छा !" सेनरीटा मैमनी समजून मान हळवली..
मैमसहित सर्व मुल -मुली ड्राईव्हर काकांची वाट पाहत होते.- परंतू वाट पाहता पाहता अर्धातास उलटून गेला होता..
ड्राईव्हर काका काही केल्या परत आले नव्हते..
" अरे यश , हा म्हातारा वॉशरुमला गेलाय -की टॉयलेट बांधून कार्यक्रम करुन येणार आहे , किती वेळ झालं यार.. !" निनांद यशला म्हंटला.
ज्याच सर्व लक्ष त्याच्या क्रशकडेच होत -
निनांद काय म्हंटला त्याने ते ऐकल सुद्धा नव्हत..
"धप्प.." अचानक बसच्या पत्र्याच्या रुफवर काहीतरी आदळल.
मोठा आवाज झाला , सेनरीटा मैम, यश, निनांद , ती मुलगी - सर्वाँच्या नजर रुफवर वळल्या..
सर्वाँच्या नजरेत प्रश्ण चिन्ह होती? की बाबा वर काय आदळल असेल ? हा आवाज कसला आला ? काही काही मुलांनी कुजबुजायला सुरुवात केली..
" सायलेंस !" मैडमचा आवाज आला , सव मुल-मुली शांत झाली ..
" यश ? चल बाहेर जाऊन, पाहू!"
मैम - यश , निनांद , तिघेही घाबरत घाबरतच बसच्या दरवाज्यातून बाहेर आले..
तिघांनीही एकदाच बसच्यावर पाहिल,
तोच त्यांच्या नजरा विस्फारल्या , तोंडाचा आ वासला.
" आsssssssssss!"
सेनरीटा मैडम भीतीने किंचाळल्या..-
त्या स्मशान शांततेत तो ओरडण्याचा आवाज गुंजला , व झाडांवर बसलेले कावळे- त्या कावळ्यांचा थवा काव काव , मृत्यूनांद घुमवत आकाशात घिरट्या घालू लागला.
जंगलातल्या हाईवेच्या रस्त्यावर पिवळ्या रंगाची ती बस थांबली होती - बसचे दोन्ही साईडच्या इंडीकेटर लाईटज ...
' तिक, टिक,टिक ' आवाज करत पेटत होत्या - एक सेकंद पेटून पुन्हा बंद होत्या..
इंडीकेटर लाईटजचा तो भगव्या रंगाचा प्रकाश , खाली हाईवेवर पडला होता - आजुबाजुला झाडांवर , त्यांखाली असलेल्या कमरेईतपत उंच झुडपांवर पडला होता.
बसच्या चारही दिशेना पांढ-या रंगाच धुक जमल होत - कुतूहूल, आश्चर्यकारक नजरेने त्या बसला पाहत होत -
बसच्या पिवळसर पत्र्याच्या रुफवर , ड्राईव्हर काकांची , वेताळासारखी - छाती ईतक भाग खाली झुकलेली - डेडबॉडी पडली होती , बॉडीचे दोन्ही हात रुफवरुन खाली झुकले होते -
चेह-यावरची कातडी धारधार नखांनी कुरतडून टाकली होती - चामडी , मांस फाडून- आतून रक्त बाहेर निघाल होत , बसच्या पिवळसर रुफवर , खाली काचेवरुन सरपटत खालच्या काळ्या डांबरी रस्त्यावर थेंब- थेंब करत पडत होत..
डेडबॉडीच्या चेह-याची अवस्था फार भयानक होती- बॉडीचे दोन्ही डोळे खोंबणीतून बाहेर काढले होते - खोंबणीत फक्त लाल रंगाच खून, आणि ती बुभळांना जॉईंट असलेली वायर्स सारखी रक्ताने माखलेली नस दिसत होती..
बॉडीच्या तोंडाचा आ-वासला होता , मरताना नक्कीच काहीतरी भीतीदायक, भयउत्तपन्नक दृष्य पाहिल्याच ते चिन्ह होत , खास.!
बसच्या आत भेदरलेली, घाबरलेली, मुल- मुली उत्सुकता , नवल, भय ओथंबूनी वाहणा-या अश्या कित्येकतरी भावहिंत नजरेनी सेनरीटा मैडम , यश, निनांद कडे पाहत होते..
मैडम एका सीटवर बसलेल्या, भीतीने त्यांची अशी काही बोबडी वळली होती- की ती विस्फारलेली बुभळे, त्या बुभळांच्या पापण्या सताड उघड्या पडल्या होत्या-
मिटता मिटत नव्हत्या.
दोन्ही हात भीतीन थरथर काफत होते -
मैडमच्या बाजुलाच यश , निनांद दोघेही उभे होते - त्या दोघांचीही तिच अवस्था होती.
" ड्राईव्हर काका मेले !" निनांद हळूच म्हंटला.
सर्व बाकी मुल - मुली निनांदच वाक्य ऐकून हादरले , भीतीने सर्वाँनी एक एक करत आपल्या मित्रांच्या चेह-याकडे पाहिल..
" मेले ? मेले म्हंणजे ?" ती मुलगी म्हंणाली.
सेनरीटा मैडमनी वटारलेल्या भयजनक डोळ्यांनी त्या मुलीकडे पाहिल व म्हंटले.
" वीणा त्यांची बॉडी वर आहे , चेहरा विद्रूप झालाय, डोळे फोडलेत , की बाहेर काढलेत ? माहीत नाही , पण ते मेलेत ? त्यांना मारल कोणीतरी !" मैडमचा आवाज शेवटच्या वाक्यावर घोगरा झाला होता - हळकेच त्यांनी बोलून झाल्यावर घशाखाली आवंढा गिळला..
" पन मैम , - गाडीचा वेग किती? 150 च्या स्पीडने गाडी धावत होती! आणि जंगलातले वाघ , सिंह, चित्ता, बिबट्या- जर ह्या अश्या काही हिंस्त्र प्राण्यांने ड्राइव्हर काकांवर हल्ला केला असता ? तर मग आवाज तरी यायला हवा होता ? आणि अशक्य कोटीतली गोष्ट अशी - की डेडबॉडी बसच्या रुफवर पडाल्याचा इतका मोठा आवाज झाला होता , की जणू प्रेत आकाशातून खाली पडलय ?" वीणा च्या वक्तव्याने नकळत सर्व मुलांच्या अंगावर भीतीचा सरसरता काटा उभा राहिला..-
" हेय वीणा , तू तू तूला काय म्हंणायचं ग! हे हे खून काही कोण्या भुत-पिशाच्छाने केलाय ?" निनांद थरथरत्या स्वरांत म्हंटल्या.
" यस ऑफकोर्स !" वीणा काहीशी गंभीर झाली- चेह-यावर जराश्या आठ्या पडल्या..
" मी झोमटे सरांच्या नोवेल मध्ये वाचलं आहे , हा हाईवे फार जुना आहे , म्हंणे ईथे खुर्श्या किरखीटचा साया आहे !"
" खूर्श्या किरखीट?!" यशने न समजून भुवया लहान करत वीणाकडे पाहिल्ं..
" हो, खूर्श्या किरखीट ! " तीने यशकडे ती थंडगार नजर फिरवत पाहिलं ताठ स्वरात सांगू लागली , बस मध्ये शांतता पसरली होती..
सर्व मुल- मुली , मैडम वीणाच बोलण अगदी मन लावून ऐकत होते..- चारही दिशेना पसरलेल्या स्मशान शांततेत - वीणाचा आवाज फक्त ऐकू येत होता..
" दर पाच वर्षांनी , जानेवारी महिन्यात नऊ दिवसांसाठी , तो त्याच्या निद्रेतून जागा होऊन शिकारीसाठी बाहेर पडतो- जो कोणी दिसेल , त्याचा मूडदा पाडतो , प्रेताच्या रक्तमांसाने अंघोळ धुतो - मांसावर चरतो.!"
" व्हॉट नॉनसेन्स वीणा, तू जिपर्स -क्रिपर्स
पाहूण आलीस वाटत ! किंवा तो राईटर झोमटे येडा असेल बिन डोक कुठचा , हे लोक पैशा साठी काहीही लिहीतात , अस फक्त मुवी मध्ये असत - रियल मध्ये नाही...- खुर्श्या किरखीट म्हंणे हिहिहिहिहिहीही!" यश हसू लागला..-
त्या स्मशान शांततेत त्याचा हसण्याचा आवाज , अगदी दूर दूर पर्यंत जात होता.
सर्व मुल ही यशला अस हसतांना पाहून दुजोरा देत हसू लागली..
वातावरणातला ताण थोडवेळ का असेना , नाहीसा झाला होता.
बाहेरुन- .
बसपासून जेमतेम पन्नास मीटर दूर, जंगलातल्या एका झाडावरच्या फांदीवर तो -माकडासारखा पायांवर बसला होता.
अंगात एक काळ्या रंगाच पाय घोळ झगा होता - टक्कळ पडलेल , फिकट लालसर कातडीच डोक होत - त्या लाल कातडीतून त्याच्या डोक्यातला मेंदू लहान मोठा होत - धडधडत होता , डोक्यार, वटवृक्षाच्या फांद्यांप्रमाणे लाल नसा उठून वर आलेल्या दिसत होत्या -
डोळ्यांतील ती निळसर कचकड्याची बुभळ , एक डोळा बंद होता - तर दुसरा उघडा , अस वाटत होत , ते ध्यान नेम धरतंय -
त्याच्या एका हातात एक तीन फुट लांबीचा , टोकदार कर्सर असलेला - हाडापासून बनलेला भाळा होता -
तो भाळ्याचा हात - त्याने मागे नेहला , त्याची ती निळसर कचकड्याची नजर- बसमध्ये पेटलेल्या पिवळ्या दिव्यांच्या उजेडात उभ्या - हसणा-या यशवर खिळली होती.
निशाणा पक्का होताच- त्याच्या धारधार टोस्कूल्या दातांवर एक विखारी,जहरील विजयी हसू उमटल ....
भाला असलेला हात त्याने तिप्पट वेगाने पुढे आणला - सुई , असा आवाज करत भाला अगदी अचुक वेध घेत, हवेतून रॉकेटसारखा उडत निघाला.
" हहहहहहहहह, जिपर्स -क्रीपर्स हिहिहिही!" यशने एक हात वीणाकडे दाखवल- व मग तोच हात खाली घेत - दुसरा हातही पोटावर ठेवत तो वीणाच बोलण मस्करीवर नेहत मोठ्याने हसू लागला..
बाकीची मुल मुलीही , त्याला अस हसतांना पाहून- खिखिखी, करत दात काढत हसत होती..
वीणाला यशवर राग येत होता - परंतू ती काहीही म्हंटली नाही, वीणा,सेनरीटा मैडम, निनांद तिघेही शांत उभे होते..-
सर्व मुल दात काढत हसत होती-
' खळ, ' अचानक काच फुटल्याचा आवाज झाला व त्यासहितच एक हाडांपासून बनलेला टोकदार कर्सरच्या आकाराचा भाळा, तुटलेल्या खिडकीतून वेगान आत शिरला, पुढच भाल्याच पात ..
' सप्पक! ' असा आवाज करत यशच्या डाव्या कानातून आरपार होत, थेट उजव्या कानातून बाहेर रक्ताच्या लहान लहान चिलकांड्या उडवत बाहेर निघाल -
भाल्याच्या वाराने , यशच्या डोळ्यांतील सफेद बुभळे त्यातला काळा ठिपका असे दोन डोळ्यांची जोडी चिबिक आवाज करत खोंबणीतून बाहेर पडले.. यशच्या तोंडातून रक्त बाहेर पडू लागल..
त्याच निर्जीव कलेवर जागेवरच स्टेच्यु होऊन , स्टेन्ड़ लावलेला बाईक प्रमाणे एका बाजुला झूकला जात - जागेवरच उभ होत..
तिथे उपस्थित सर्वाँना हे अस काही घडेल ह्याची कसलीही - कोणालाही शुन्यमात्र कल्पना नव्हती ,
सर्वाँच्या चेह-यावरच हसू ओसरल , भीतीने चेहरा पांढरा पडला , तोंडाचा - डोळ्यांचा आ वासला..
थरकाप उडवणार ते दृष्य पाहून काही -काही जणांची पेंट ओली झाली,
एकापाठोपाठ ,- मुलींच्या ,भयउत्तपन्नक, आर्तकिंकाळ्यांची रिंगटोन वाजू लागली..
उभा आसमंत त्या आवाजांनी दणाणून ऊठला..
निनांद भीत भीतच एक एक पाऊल मागे टाकत मागे मागे जाऊ लागला - चार पावळ चालून होताच त्याने मागे गर्रकन वळून गिरकी घेतली पुढच्या दिशेने धावायला सुरुवात केली..
पाच -पावळांतच , तो ड्राईव्ह सीटपाशी आला, देवाच्या कृपेने इग्निशनला बसची चावी ईन केलेली होती.
ड्राईव्ह सीटवर बसून त्याने चावी पिळली धड़ धड करत पुर्णत बसला धक्के बसले जात इंजिनचा घरघराट वाजवत बस सुरु झाली..-
' भुर्र्र्र्र , भुर्र्र्र्र्रम!' बसच्या मागच्या नळीतून काळशार धुराचा लोट हवेत उडाला !
' खट,खट ' आवाज करत निनांदने एकदाच दोन गियर शिफ्ट केले ..- क्ल्च सोडल, लागलीच एक्सीलेटरवर वेगान पाय दिली..
हाईवेवर उभी बस - जागेवरुन हळली, बसची चाक गरागरा फिरत वेगान हाईवेवरच्या रस्त्यावर धावू लागली.
निनांदचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता - कपाळावरुन घामाचे द्रव बिंदू घळाघळा काळी कोसळत होते..
बसची पिवळसर हेडलाईट हाईवेवर दूर दूर पर्य्ंत पसरली होती- धुक्याला चिरत बस भुर्रम भुर्रम आवाज करत धावत होती..
बसच्या सर्व खिडक्यांतून वहू , वहू ,वहू
करत वारा आत घुसत होता - त्या थंड वा-याने आधीच घाबरलेल्या ह्या सर्वाँच्या अंगावर भयाची म्रुत्युधारी लाट उसळत होती..
बाहेर :
हवेतून एक धार धार वर्तुळाकार भिंगरी गरा गरा फिरत येतांना दिसत होती, त्या भिंगरीला चार लोखंडाच्या धार धार पाती अडकवल्या होत्या , धार ईतकी ताकदवार होती , की मांणसाच हाड ही दोन भागांत विभागेल, तुकड करेल.
आणि हिच भिंगरी वेगान बसच्या प्लास्टीक टायरवर येऊन आदळली..
" फट!" आवाज झाला.- चंदेरी रंगाच्या स्पष्ट ठिंणग्या उडाल्या , टायरचा काम जागीच तमाम झाला.- टायर फ़ट आवाज करत फुटला होता..
टायर फुटल्याने वेगान धावणा-या बसच कंट्रॉल बिघडल , बस हाईवेवर कधी डाविकडे तर कधी उजवीकडे हेळकावे खात होती..
झुकत होती..
सर्व मुल-मुली एकमेकांच्या अंगावर पडू लागली, सर्वाँचा जागेवरुन तोळ जाऊ लागला.. मुल- मुली सर्व जण भीतीने ओरडू लागले..
मृत्युचा थयथयाट माजला, सैतानाचा नंगानाच सुरु झाला- चांडाळी रात्रीची आसुरी खेळी सुरु झाली..
किरखीटचा मौतेचा डाव सुरु झाला..
निनांदच्या हातून स्टेरिंग निसटली, पुर्णत स्टेरिंग उजव्या बाजुला वळली गेली- बसचे पुढील दोन चाक उजव्या बाजुला वळले..
आणी बस हाईवेबाजुला असलेल्या एका , झाडावर जाऊन धडकली..
' धड '....
धडक बसताच , बसच्या आतील काचा हवेच्या दाबाने फुटल्या , खळ खळ करत काचांचा भुगा हवेत उडाला..
फुट उंचीच्या त्या झाडाच्या खोडावर बरोबर मधोमध , बसच इंजिन आदळल होत -
बसच्या इंजिंनचा भाग , म्हंणजेच पत्रा - धक्क्याने चेंबून आत घुसला होता-
त्या इंजिनमधून सफेद रंगाच धुर मंद गतीने बाहेर पडत होत - नक्कीच इंजिनला डेमेज झाल होत - आता उरलेली एक सुटकेची आशाही निवळली होती - बसमध्ये बसून सर्वजन ईथून रफू चक्कर होऊज , वाचले असते - सुखरुप बाहेर निघाले असते परंतू ते ध्यान पिसाळलेल्या रागीट हिंस्त्र श्वापदासारख ह्या मुल-मुलींच्या मागावर लागल होत!
त्याच्या नजरेतून एकही सुटणार नव्हता , खुर्श्या किरखीट एक एकाचा फडशा पडणार होता.
इंजिनची वाट लागली होती , इंजिनचा गेम झाला होता - बंद पडलेल्या इंजिनमुळे बसध्ये पेटलेली लाईटज , ऑफ झाली होती -
अंधकाराने बसला आता विळखा घालून, आपल्या विशाल गर्भात सामावून घेतल होत -
बसमध्ये ड्राईव्हिंग सीटवर बसलेला निनांद
- त्याच डोक बस झाडावर आदळल्याने - स्टेरिंगवर आपटल होत , कपाळावरची कवटी फुटून त्यातून ताज्या लालसर रक्ताची - धार बाहेर पडली होती ,
लाल रक्ताच्या मैकअपने चेहरा अभद्रपणे रंगून ऊठला होता - शर्ट- पेंट सर्वकाही लाल गडदसर रक्ताने भिजल होत !
मागे सीटवर बसलेल्या सेनरीटा मैडम - त्यांच्या नाकाला मार बसला होता - नाकाच फुटून रक्त बाहेर आल होत , वीणाच्या पोटातून पुढच्या सीटची लोखंडी पातळसर सलई तुटून , आत घुसली होती - मागून पाठणातून तीच , टोकदार लाल रक्ताने भिजलेल टोक बाहेर आल होत -
पाहणा-याला वाटले असते ही बया मेली , खल्लास झाली- परंतू देवाची कृपा तीचे श्वास सुरु होते -
बाकीची उर्वरित मुल- मुल