सदर अनुभव सत्यघटनेवर आधारीत आहे.
आपल्या चैनलच्या सब्क्राईबर गिरीजा भाईकुल्र ह्यांनी मैल मार्फत पाठवला आहे..
तोच पुढीलप्रमाणे..
सन 2001 :
दहा वर्षाच्या केतकला आज रविवारची सुट्टी होती - सुट्टी असल्याने त्याच्याच वयाचे , दहा - बारा मित्र क्रिकेट खेळण्यासाठी म्हंणून गावातून जरा दूर असलेल्या एका वर्तुळाकार ग्राउंड वर आले होते -
क्रिकेटचा खेळ चांगलाच रंगात आला होता - खेळाच्या नांदात सर्व मुलांना , वेळेची विसर पडली होती..
पाहता -पाहता आकाशात झाकोल पडायला सुरुवात झाली होती,
सफेद आकाशातल्या ढगांना हळकासा गुलाबी रंगाची छटा प्राप्ती झाली होती ,
वातावरणातही तो गुलाबी रंगाचा फिकटसर प्रकाश पसरला होता.
संध्याकाळची हलकीशी हवा सुटली होती, घामाने डबडबलेल्या मुलांची शरीर , हवेने सुखली होती, सर्व मुलांच्या कपड्याना घामाचा वास येत होता..
बैटसमेन म्हंणून स्ट्राईकरवर केतक उर्फ केतन उभा होता - त्याने दोन्ही हातात बैट पकडली होती , टपोरे डोळे बॉलरवर खिळले होते..
केतनच्या अंगात एक हाल्फ टि शर्ट - खाली हाल्फ पेंट होती, केतनच्या गळ्यातून
एक लॉकेट बाहेर आलेला दिसत होता..
काळ्या दो-याचा ज्यात , श्रीगणेश बाप्पाची प्लास्टीकची , सोनेरी रंगाची लहानशी मुर्ती होती ..
" बाप्पा - यार सिक्स जाऊदे , काही पण करुन मैच जिंकायचीये यार, चैन खुली की मेन खुली..!" केतनने बाप्पाची मदत मागितली, आणि ईकडून बॉलरने बॉम्ब फेकाव तस केतकच्या दिशेने बॉल फेकल.
केतनच्या चाणाक्ष नजरेने , दात ओठ खात बोलवर खूनशी नजरेने पाहत , हातात असलेल्या बैटला गच्च पकडत , तीच बैट मागे घेऊन जात , वेगान पुढ आणली, व अती प्रकांड वेगाने चेंडूचा मूडदा पाडला..
" फट्ट..!" असा आवाज होत, हिरव्या रंगाचा टेनिस बॉल- सुई असा आवाज करत आकाशाच्या दिशेने रोकेट प्रमाणे सुर घेत प्रस्थान झाला..
केतक तोंडाचा आवासत , हसत - मोठ्या आनंदाने उड्या मारत वर आकाशातून पुढे पुढे जाणा-या चेंडूला पाहत होता..
तोच तो चेंडू मैदानाची सीमा रेषा पार करत , एका कंपाउंड़च्या आत घुसला..
चेंडू त्या कंपाउंड़च्या आत घुसला हे पाहता हे केतनसहितच त्याच्या सर्व मित्रांचे चेहरे भयउत्पन्नक , भावनेने पांढरे पडले..
आकाशात पसरलेल्या झाकोळीने , अशुभ - धोक्याची जणू सुचना पहिलेच लाऊन दिली होती की काय ? म्हणुनच वातावरणात बदल झाला होता ?
मैदानावर उपस्थीत सर्व मुल गोळाकार वर्तुळात उभी राहिली-
ज्याचा बॉल होता तो बिचारा नाकातून शेंबूड निघ्स्तोवर रडू लागला , जणु बॉल नाही
त्याचा बाप मेला होता ? की काय !
" ए केत्या आईघाल्या, तूला फास्टचा कॉल आणि हळू माराचा कॉल दिला होता ना आता माझा बॉल कोण आणून देईल? मला माझा बोल पाहिजे, नाहीतर मला माझे पैशे दे ..! हं हं हं हं ह ह !" बॉल असलेला त्या मुलाने केतनला धमकी दिली, नाकातल्या बरण्यांमधून एकसारख शेंबडाची आईस्क्रीम खाली पडत होती..
" ए उद्या जाऊ बॉल बघायला हव तर आता नको, जाम काळोख झाला आहे , आणि त्या कंपाउंडच्या पलीकडे काय आहे माहितीये ना ? म्हंणे ति करणी करणा-यांची जागा आहे , लिंबे - बिबे , भुतांचे उतरवलेले उतारे टाकतात तिथे!" एक मुलगा म्हंणाला.!
त्याच्या स्वरात भयाची काजळी होती, स्वर भीतीने जरासा लहान चिरकस झाला होता डोळे ती हकीकत सांगताना जरासे मोठे , वटारल्यासारखे झाले होते..-
हलु हलू अंधार पडत होता , आणि अंधारात त्या मोकळ्या मैदानावर दूर दूर पर्य्ंत सर्व दिशेला ह्या मुलांव्यतिरीक्त कोणीही नव्हत होती ती फक्त ही मुले , आणि ती भयावह माहिती.. - ज्यात किती तथ्य होत , हे त्या मुलांनाच ठावूक..!
" हा ना , खर बोलतोय तू, आपल्या वाण्याच्या पोरीची लाडकी मांजर मणी पन दोन दिवस झाली म्हंणे घरी आली नव्हती, तर तिस-या दिवशी त्या मांजरीच मेलेल प्रेत त्याच बंगल्यात भेटल होत ,मांजरीची ग्ंचोंडी पार बाहुल्यासारखी मागे फिरवली होती , हात-पाय वाकडे करुन तोडले होते , शेपूट रबडने कापली होती, डोळे फोडले होते - त्या डोळ्यांच्यात लिंब घुसवून फिट बसवली होती, गळ्यात लसण, बिबे ओवळेली माळ घातली होती, कपाळावर लाल पिवळा बूक्क्याचा टिळा लावला होता..! तिच्या पोटात केकमध्ये मेनबत्ती घुसवतात , तशी पोट फाडून आत मेनबत्ती घुसवली होती- !" अजून एक मुलगा एक भयावह हकीकत सांगत म्हंटला..
जी ऐकून सर्वाँच्या देहावर काटा आला, दोन- तीन जण तर मागे चड्डीला हात लावत पळून गेले..
" कैत्या आईघालय , मला माझा बोल पाहिजे आताच्या आता , नाहीतर पैसे दे चल..!"
तो मुलगा केतकला धमकावत म्हंटला..
तोच केतकने त्याच्या एक थोबाडात लावली, फट असा गालावर चापट बसताच आवाज झाला..
तो मुलगा गाल चोळत अजुन मोठ्याने रडू लागला..
नाकातून शेंबडाचे बुडबुडे बाहेर पडू लागले.. बुड बुड आवाज होऊ लागला.
" साल्या , मला शिव्या देतो - माझ्या आईने बॉल घालवला का तुझ!" केतकने पुन्हा डावा हात वर नेहत पुन्हा एक चापट त्या मुलाच्या गालावर लगावली..
ह्यावेळेस तो मुलगा थेट जमिनीवर कोसळला..
" आईला जास्तच जोरात लागली वाटत, !" केतनने जिभ वाचवली..
खालती जमिनीवर पडलेल ते पोरग, त्याला आपल्या डोळ्यांसमोर चांदणे फिरतांना दिसत होते..-
दोन तीन वेळा त्याने मान झटकली, तेव्हा जाऊन कुठे त्याला जराशी शुद्ध आली..
" ए चला रे , ह्या लेकाचा आपण बॉल आणून देऊ चला !" केतन आपल्या मित्रांना म्हंटला..
" आपण?" आपण हा शब्द ऐकून केतनच्या मित्रांच्या तोंडच पाणी पळाल..
ज्या जागेत दिवसा जायलाही मोठी मांणस भीतात, तिथे आपण संध्याकाळी- ह्या काळोख्यात बॉल शोधायला जायचं?
सर्वाँचा नकार आला , सर्वाँना वाण्याच्या पोरीच्या मांजरीच जस हाल झाल तस स्वत:व्ह होईल.ह्या भीतीने कोणीही जायला तैयार नव्हत..
" ठिक आहे , मीच जातो, पन हा !" केतन हळूच दोन पायांवर खाली बसला..- तसा त्या आधीच दोन चापटी खाऊन गप्प बसलेल्या मुलाने दोन्ही गालांवर , एक आवंढा गिळ्त हात ठेवला..
" तुझा बॉल तुला आणून देतो , पण हा - बॉल दिल , की अजुन दोन बुक्क्या ताणून घ्यायला तैयार रहा.!" केतन अस म्हंणतच निघुन गेला..
मागे तो जमिनीवर गालावर हात ठेवून बसलेला मुलगा , बाकीची मुल - केतनला पुढे पुढे जातांना पाहत होती , काय माहीती तो पुन्हा दिसणार होता की नाही ? देवालाच ठावूक !
केतनने मैदानाची सीमा ओलांडली- आता तो एका आठ फुट उंचीच्या कंपाउंड पाशी उभा होता -
कसतरी केतन त्या कंपाऊंड वर चढला ,
कंपाउंडवरुन त्याने खाली उडी मारली, जमिनीवर पाय आदळताच धप्प असा आवाज झाला ..
कंपाउंडच्या पलीकडे एक बसक घर होत - न वापरातल घर, त्या घराकडे पाहून अस वाटत होत , की कित्येकतरी वर्ष ते घर बंदच असाव ,?
घराच्या अवतीभवती - कमरेईतक वाढलेल , उन्हात पिकून गेलेल सोनेरी रंगाच गवत दिसत होत ,
संध्याकाळच्या मंद हवेच्या ताळावर ती ते गवत थिरकत होत..- गवत हलताच सल सल आवाज येत होता.
केतनच्या समोर एक बसक घर होत - सात फुट उंचीची भिंत, ज्या भिंतीवर कुठे कुठे गवत उगवल होत , पिकून गेल होत -
घराच्या मधोमध पाच फुट उंचीचा , दारुड्या सारखा अर्धवट तुटून झुकलेला दरवाजा दिसत होता - दरवाज्यापासून तीन फुट लांब - दोन्ही दिशेना दोन काचेच्या चौकोनी खिडक्या होत्या , त्यातल्या एका खिडकीची काच फुटली होती..
नक्कीच त्या फुटलेल्या काचेतून चेंडू आत घरात गेला होता -
अर्धवट तुटलेल्या दरवाज्याच्या फटीतून
घरात दबा धरुन बसलेला काळोख नजरेस पडत होता ,
त्या कालोखाची गडदता ईतकी गर्द , खोल होती- की तो अंधार नाही, जणू एक कालोखाचा कपडाच आत लावला आहे अस भासत होत..
त्याच कालोखात दोन सेकंदाकरीता दोन पिवळ्या रंगाच्या दोन डोळ्यांची जोडी चकाकली..
अंधारातून ते डोळे वेगान केतनच्या दिशेने पुढेपुढे सरकत येऊ लागले.. -
केतनच्या पायाखालची जामिन सरकली, डोळे कासवासारखे मोठे झाले - तोंड भीतीने आ वासला , पाऊले एक एक करत मागे जाऊ लागली..
ते दोन पिवळ्या रंगाचे डोळे , ते जे काही ध्यान होत ते वेगान- दरवाज्यातून बाहेर पडल..
चार पायांवर चालत तुरु तुरु धावत केतन पाशी आल..
" म्याऊ, म्याऊ.! " ती एक मांजर होती - त्या मांजरीने आपल्या पिवळ्याधमक बेडकी डोळ्यांनी फिस्कारत , शेपूट ताठ करत केतनकडे पाहिलं व धावतच निघुन गेली..
" च्यायला ह्या मांजरीच्या , अर्धा जिव ईथच मरुन गेला माझा , वापस भेट मला , तुझी तर पुंगीच वाजवतो - साली..!" केतन स्वत:शीच म्हंटला.
तो उघड्या दरवाज्यातून आत आला , आत येताच एक घाणेरडा, कुबट, मांस कुजून गेलेला - वास त्याच्या नाकांत झिणझिण्या आणुन गेला..
" च्यायला , कय घाण वास आहे - ही मांजर नक्कीच , उंदरांना किडनेप करुन ईथे आणत असेल,आणि त्यांचा गेम वाजवत अशणार ..!" केतन स्वत:शीच म्हंणाला..
अंधाराला नजर सरावताच जागेवर उभ राहूनच त्याने अवतीभवतीच दृष्य नजरेने नेहाळल..
केतन जिथे उभा होता तो एक हॉल होता , हॉलमध्ये एक सोफा होता - त्या सोफ्याची कव्हर फाडली होती, त्यातून कापूस बाहेर पडल होत..
हॉलच्या उजव्या बाजुला एक दरवाजा होता - केतन त्या दरवाज्यात आला - सरळ एक कोरिड़ॉर पुढे गेली होती, अंधारात बुडालेली..कोरिड़ॉर - .. राक्षसाच्या जबड्यातल्या नाळीकेतली पोकळीच जणू..
केतन ज्या दरवाज्यात उभा होता - तिथून पुढे , पाच पावळांवर किचनचा दरवाजा होता -
अजुन पुढे दहा पावलांवर एक सताड उघड्या
रुमचा दरवाजा होता - ती नक्कीच बैडरुम होती..
केतन त्या दरवाज्यापाशी चालत आला -
आत एक बिना गादीचा बैड होता , बैड बाजुलाच एक झुलणारी लाकडी खुर्ची होती..
दरवाज्यापासून समोर केतन पासून वीस पावळांवर , बैड रुमची काचेची फुटलेली खिडकी होती,
" बॉल नक्की ईथच आला अशणार , लवकर शोधूयात आणि कल्टी घेऊयात !" केतनने शोधाशोध करायला सुरुवात केली..
केतन चालत बैडजवळ आला , हळुच खाली झुकत त्याने बैडखाली पाहिल- खाली टेनिसचा बॉल दिसला..-
" हूश्श्स , भेटला ! " केतनच्या चेह-यावर विजयी हसू फुलल! " आता मस्त दोन हात साफ करील तुझ्यावर मान्या!" केतनने एक हात बैड खाली घालत बॉल काढला.
बैडखालून दुस-या बाजूची बाजू दिसत होती - ती लाकडी झुळती आराम खुर्ची दिसत होती - आणि त्या खुर्चीच्या खाली दोन पांढरे फट्ट खुराच्या नखांसारखे चेटकीणीचे पाय दिसत होते..
ज्या पायांची नख हळत होती..- बॉल काढुन घेत, केतन हळूच उभा राहणार तोच त्याला आपल्या नजरेतून काहीतरी सुटलं ह्याची जाणीव झाली, स्मुर्ती पटळावर ते दृष्य पुन्हा झळकल ..
खाली वाकलो तेव्हा बाजुला असलेल्या झुळणा-या खुर्चीवर कोणितरी बसल होत ? त्याची पांढ-या फट्ट पायाची ती नख दिसत होती..
नुस्ती साधी सुधी नख नाही, खुरासारखी तीन- तीन ईंच लांबीची - सैतान, चेटकीणीची असतात तशी..
घाबरत गुबरत केतनने पुन्हा बेड खाली झुकून दुस-या बाजुला पाहिल..
त्याच्या कपाळावरुन घाम ओघळत होता - घश्याला कोरड पडली होती..
त्या चार भिंतींच्या खोलीत आपल्या व्यतिरीकत अजुन कोणाची तरी आस्तित्वाची चाहुल मनाला लागत होती..
ती रिकामी खोली , रिकामी खासच नव्हती .- मन मोठ्याने ओरडून सांगत होत , पळ धोका आहे -
केतनने बैडखाली वाकून दुस-या बाजुला पाहिलं , ती झुळणारी खुर्ची आता रिकामी होती -
' भास झाला असेल ! ' केतनने स्वत:ची समजूत काढली..
चेंडू तर मिळल होत , केतनचा त्या रडणा-या मुलाच्या अजुन दोन पाठणात रट्टे कसे बसवायचे ह्याचाच विचार सुरु होता ..
मनात त्या विचारांनी आसुरी आनंद होत होता ..! एक वेगळीच मज्जा येत होती.
बैड वळसा घालून केतन , खोलीच्या दरवाज्यातून बाहेर जाऊ लागला..-
दरवाज्यापाशी येताच , त्याच्या उजव्या अंगाला - त्याच त्या झुळणा-या खुर्चीत अंधुक द्रुष्यसहित कोणितरी बसल होत ...
पुर्णत अंगावर काळेशार कपडे होते ,
खुर्चीत बसून ते ध्यान झुळत होत..-
तोच त्या झुळणा-याच्या खुर्चीचा आवाज केतनच्या कानांत घुमला..
पाऊले जागीच गोठली, अंगभर शहारा फुटला , नुस्ता शहारा नाही भीतीचा शहारा..
उभ्या मणक्यावरुन कोणितरी धार धार गंजलेली सुरु फिरवावी , तशी भीती पायाच्या तळव्यापासून ते मेंदूपर्यंत करंट दौडून गेली..
थरथरत्या मानेने , विस्फारलेल्या नजरेने -
घामाने डबडबलेल्या चेह-यासहितच केतन उजव्या बाजुला वळून पाहिल-
तसे त्याच्या नजरेला दिसलं..
थरथरत्या मानेने , विस्फारलेल्या नजरेने -
घामाने डबडबलेल्या चेह-यासहितच केतन उजव्या बाजुला वळून पाहिल
तसे त्याच्या नजरेला दिसलं..
खुर्ची रिकामी होती- परंतू संथ गतीने पुढे मागे होत - झुळत होती..
परंतू हे कस शक्य आहे ? खुर्ची आपोआप कशी झुलू शकते ? कोणितरी तिला स्पर्श करायला हवा ना ? कोणितरी तिच्यावर बसून तिला मागे पुढे करायला हव ,? जर ईथे कोणीच नाही मग ही खुर्ची कशी झुलू शकते ?
केतनच्या मनात प्रश्णांनी काहूर माजवल होत..
तोच बैडवर असलेल्या फलीचा खड खड असा आवाज झाला - त्या आवाजाने केतनच सर्व शरीर भीतीने ठणकल..
झुळणारी खुर्ची आपो-आप थांबली, जनू कोणितरी तिच्यावद हात ठेवल आणि ती थांबली असावी?
" खाड, खाड, खाड!" आवाज होत - बैडची फळी वाजत होती..-
जणु अस वाटत होत , की खाली कोणी असाव , किंवा कोणाला दाबून ठेवल असेल..?
" कोण आहे .?" केतनने मोठ्याने विचारलं..
तसा एकदमच तो आवाज थांबला..
व एक खर्जातला , किन्नरी आसुरी हसण्याचा आवाज आला..
त्या आवाजाने केतनची कानसुळ तापली , अंग भीतीने गरम झाल.-
त्या आवाजाने मागे जे कोणी असेल ते फार भयानक असेल, हे नुसत त्या हास्यावरुनच कळून येत होत..
केतनला धोक्याची जाणिव झाली..
एक एक पाय मागे टाकत केतन मागे जाऊ लागला..-
" थांब कुठे पळतो , थांब हिहिहिह!"
कर्रर्र्रर्र्र्र्र असा आवाज करत बैडची फळी बाहेरच्या बाजुने उघड़ली, फळी उघड़ताच आतून सफेद रंगाच धुर मंद गतीने बाहेर पडु लागल...
त्या धुरातून हिरव्या रंगाचा प्रकाशझोत बाहेर पडला..- हळू हलू एक केसाळ काळशार डोक त्या हिरवट प्रकाश - धुर ह्यातून , जस पाण्यातून वर याव तस वर आल..
प्रथम काळशार केसाळ डोक- मग तो प्रेताड दुधासारखा पांढरा चेहरा आला..-
काळशार पायघोळ झगा , आणि ते खुराच्या नखांचे पाय..
प्रेताड चेह-यावरचे डोळे लिंबाएवढे मोठे वटारलेले होते - त्यात एक मिरीचा काळशार ठिपका होता..
चिंगमसारखा जबडा निताणून ते ध्यान - केतनला विखारी हास्यासहित पाहत होत..
" खिखिखिखी, फसला का नाय , फसला का नाय ! आता कुठ पळशील..! आता कोण येईल रे तुला वाचवायला कार्ट्या..! हिह्हिही!" त्या अभद्र , अवदसेने आपला एक हात उंचावला -
पुढे जे काही घडल , ते अमानविय शक्तिचा चमत्कार होता.
त्या अवदससेचा हात, चिंगमसारखा निताणला , हळू हलू त्या हाताची लांबी वाढली, तो हात वाढत वाढत - केतनपाशी पोहचला..
त्या हाताच्या पंज्याने केतनची मान पकडली- गळ्यावर पकड मजबूत होतात केतनला जमिनीवरु चार फुट उंच हवेत उचल्ल..
श्वास न मिळाल्याने केतन हात पाय झाडू लागला..
बिन पाण्याच्या माश्यासारख त्याच शरीर तडफडू लागल..
हळू हलु तो हात मागे मागे जात , आकार कमी होऊ लागला- हाताची लांबी कमी झाली.
केतनला त्या ध्यानाने त्याच्या अगदी चेह-याजवळ आणल.. !
बैड खालून सफेद रंगाच धुर , आणि हिरवा प्रकाश वेगान बाहेर येत होता..
" चल , चल माझ्या पाठी नरकात चल!"
ते ध्यान भसाड्या आवाजात म्हंणाल.
तोच नकळत , केतनच्या सर्व शरीराला एक झटका बसला - त्या झटक्याने केतनच्या टी-शर्टाआत दडलेला गणपती बाप्पाचा लॉकेट एक बचावाची किरण घेऊन बाहेर पडला..
त्या अमानवीय शक्तिचा आस्तित्व त्या दैवी शक्तिच अंश असलेल्या लॉकेटला , सकीय करुन गेल, जे सप्त अवस्थेत होत -
जो पर्यंत केतकला धोका नव्हता - तो पर्यंत बाप्पाचा लॉकेट सामान्य होत - परंतू जस केतनाच्या देहाला , त्या हैवानाचा स्पर्श झाला -
त्या बाप्पाच्या लॉकेटला केतन धोक्याच्या घडीत आहे हे कळून चुकल , किंवा बाप्पाच्या चमत्कारानेच ते लॉकेट दैवी अंश तयात प्रगट होऊन सक्रीय झाल होत..
तो प्लास्टीकचा बाप्पाचा सोनेरी रंगाक्षा बाप्पाची आकृती असलेला लॉकेट क्षणार्धात दैवी शक्तिलहरींनी चमकून ऊठला -
तो सोनेरी रंगाचा लॉकेट , तप्त विस्तवाप्रमाणे चकाकून उठला , बाप्पाची आकृती जनु लावह्यातून प्रगटली..
त्या तपकिरी विस्तवी प्रकाशाने उजळून निघालेल्या लॉकेटमधून सुर्यासारखी प्रकाश किरणे बाहेर पडली..
त्या शुद्ध प्रकाश किरणांच्या संपर्कात ती , वाईट, कृल्प्ती , मळीण शक्ति येताच , तिच्या अंगावर - चंदेरी रंगाच्या ठिंणग्यांचा वार झाला.
" आरीर्र्र्र्र्र्र्र घ्र्र्र्र्र्र्र्र !" विचीत्र स्वरात ती अवदसा किंचाळली- तिच्या काळ्याशार मैक्सीवर जिथे ठिंणग्या उडाल्या होत्या -
तिथे विस्तवासारखे तप्त डाग पसरले होते - ज्यांमधून पांढरी वाफ बाहेर येत होती..
वेदनेने म्हंणा की वाराने - त्या हैवानी अवदसेची
केतनच्या गळ्यावरुन पकड सुटली.
केतन बैडबाजुला जमिनीवर पडला.-
श्वास पुर्ववत झाल्यावर त्याने समोर पाहिल..
दळदळीत माणुस फसल्यावर जस आ खेचला जातो, तस ती हैवानी अवदसा , त्या पांढ-या धुरात , हिरवट आवरणात आत जात होती..
" आ वाचव, आ वाचव !" तिच सर्व शरीर बैडच्या आत जात नाहीस झाल, शेवटच्या क्षणी तिचा आवाज अगदी कमी कमी
होत बंद झाला.
केतन घाई करत जागेवरुन ऊठला , त्याने ऊठताच बैडची दुस-याबाजुला कळलेली फळी उचलून ती बैडवर टाकत तिला ब्ंद केली..
मग गळ्यातला लॉकेट काढला.
" गणपत्ती बाप्पा मोरया ..!" अस म्हंणतच केतनने तो लॉकेट- फळीला असलेल्या हँडलला बांधला -
चेंडू हाती घेऊन केतनने त्या श्रापित घरातून धुम ठोकली.. व तो सुखरुप बाहेर आला होता..
मैदानावर त्याचे त्याचीच मित्र वाट पाहत होते.. केतनने सोबत आणलेला चेंडू ज्या मुलाचा होता त्याला दिला -
व त्या हैवानी अवदसेचा सर्व राग दोन बुक्क्यांनी त्या शेंबड्या मुलाच्या पाठणावर काढला..
जे दोन बुक्क्या खाऊन चड्डी पिवळी होईस्तोवर मुतल होत..
त्या दिवसापासून केतनची बाप्पावर असलेली श्रद्धा अजुन बळकट झाली होती- व केतनने पुन्हा कधीच अस रात्री अपरात्री अज्ञात ठिकाणी जायचं बंद केल होत..
..
समाप्त: ...