चाळीतले दिवस

(7)
  • 20.8k
  • 0
  • 11.9k

शिक्षणासाठी पुण्यात माझ्यापेक्षा मोठ्या बंधूकडे, (त्याला मी आण्णा म्हणायचो) यायचे माझे स्वप्न होते.माझ्या दहावीनंतर दोन वर्षे ते स्वप्न मला हुलकावणी देत होते.आण्णा त्यावेळी एका नामांकित बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीत नोकरीला होता. बारावी झाल्यानंतर मात्र ते स्वप्न पूर्ण होईल असे वाटत असतानाच आण्णाला कंपनीच्या वतीने कुवेतला जाण्याची संधी मिळाली.तिकडे जाताना त्याने माझ्यावर त्याची नागपूर चाळीत असलेली झोपडीवजा खोली सोपवली. पुण्यात येरवडा जेल जवळच्या नागपूर चाळीत माझी रहायची सोय झाली.

1

चाळीतले दिवस - भाग 1

चाळीतले दिवस भाग 1शिक्षणासाठी पुण्यात माझ्यापेक्षा मोठ्या बंधूकडे, (त्याला मी आण्णाम्हणायचो) यायचे माझे स्वप्न होते.माझ्या दहावीनंतर दोन वर्षे ते मला हुलकावणी देत होते.आण्णा त्यावेळी एका नामांकित बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीत नोकरीला होता.बारावी झाल्यानंतर मात्र ते स्वप्न पूर्ण होईल असे वाटत असतानाच आण्णाला कंपनीच्या वतीने कुवेतला जाण्याची संधी मिळाली.तिकडे जाताना त्याने माझ्यावर त्याची नागपूर चाळीत असलेली झोपडीवजा खोली सोपवली.पुण्यात येरवडा जेल जवळच्या नागपूर चाळीत माझी रहायची सोय झाली.पुण्यात कोणत्या कॉलेजला जायचे हॆ आधी ठरवले नव्हते.बारावीत गट्टी झालेल्या आम्हा पाचसहा मित्रांनी एकत्र येऊन आम्ही कर्वेरोडवर असलेल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला.राजेंद्र ढवळे, विकास लोंढेआणि बाकीदोन मित्रकॉलेज जवळच्याहॉस्टेलला रहाणार होते.त्यांच्या बरोबर रहायची इच्छा असली ...Read More

2

चाळीतले दिवस - भाग 2

भाग 2त्या काळी कॉलेजमधून घरी आलो की अभ्यासाव्यतिरिक्त करण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते.वस्तीतल्या अनेक मुलांशी ओळख झाली होती.नित्यनेमाने संध्याकाळी रस्त्यावर असलेल्या मंडळाच्या पोरांच्यात गप्पा मारत उभे राहणे हाच माझा एकमेव टाईमपास होता.तिथे भेटलेल्या मुलांशी नंतर माझी छान मैत्री झाली. शिर्के बंधुबरोबरच बाळू नितनवरे,आसिफ पठाण,सुरेश गायकवाड,आल्फ्रेड सायमन, चंदू घोलप, अशोक कांबळे, सदा निकम नाना निकम असे वीस पंचवीस मित्र माझ्याशी जोडले गेले. यातले बरेचजण अर्धशिक्षित होते.काहीजण वर्कशॉपमधे छोटीमोठी कामेकरत.कुणी रिक्षा चालवायचे.एकाची पानटपरीहोती तर एकाचे किराणा मालाचे दुकान होते.त्यातल्या त्यात आमच्या या मित्रांमध्ये आल्फ्रेड सायमन हा अव्हेरी इंडिया सारख्या नामांकित कंपनीत नोकरी करायचा,यातले अनेकजण बेकार होते.काहीजण नियमितपणे दारूही पीत असत.अनेकांची लफडी ...Read More

3

चाळीतले दिवस - भाग 3

भाग 3आमची नागपूर चाळीतली खोली खूपच छोटी होती.चारी बाजूनी पत्र्याच्या भिंती आणि वर मंगलोरी कौलाचे छत होते.एका बाजूला साळुंके कुटुंब रहात होते. समोरच पाण्यासाठी सार्वजनिक नळकोंडाळे होते. नळ कोंडाळ्याला चार पाण्याच्या तोट्या होत्या. पाणी एकदा आले की आजूबाजूच्या सगळ्या बायका पाणी भरायला,धुणे धुवायला कोंडाळ्यावर जमायच्या. त्यांच्यातल्या गप्पा, एकमेकींच्या चुगल्या तर कधी कधी भांडणे पाणी बंद होईपर्यंत चालू असायची.मला खोलीत बसल्या बसल्याही बाहेरचे बोलणे ऐकू येत असे. यातूनही छान मनोरंजन व्हायचे. खोलीच्या समोर थोडया अंतरावर चारीबाजूनी बारदाणा लाऊन आडोसा करून आंघोळीसाठी मोरी केलेली होती. तिथेच पाण्याचा मोठा ड्रम भरून ठेवलेला होता.जवळ जवळ प्रत्येकाच्या खोलीसमोर अशीच व्यवस्थ्या होती.मी इथे राहायला आलो ...Read More

4

चाळीतले दिवस - भाग 4

भाग 4. साईबाबाचे मंदिर बांधायची आमच्या मंडळाची कल्पना वस्तीतल्या लोकांना चांगलीच आवडली होती.लोक स्वतःहून यासाठी वर्गणी देऊ लागले.जिथे आम्ही नियोजन केले होते ती रस्त्याच्या बाजूचा साधारणपणे पंधरा फूट बाय वीस फुटाची जागा होती.जमा झालेल्या वर्गणीतून मंदिराचे बांधकाम सुरु झाले.दरम्यानच्या काळात चंद्रसेन निकम ज्यांना आम्ही बापू म्हणायचो,त्यांच्या पुढाकाराने साईबाबा दिवाळी फंडही सुरु झाला.प्रत्येक सभासदांने काही वर्गणी जमा करायची आणि गरजू व्यक्तीला कर्ज द्यायचे अशी ही व्यवस्था होती.मी शिकत असल्याने या फंडाचा सभासद मात्र होऊ शकलो नव्हतो.मी स्वतः स्वयंपाक करून खायचो.बऱ्याच वेळा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा यायचा अशावेळी इस्माईल भाई पठाण यांच्या बेकरीतून मी छोटा ब्रेड आणि अंडे विकत आणायचो आणि ...Read More

5

चाळीतले दिवस - भाग 5

चाळीतले दिवस भाग5आमची वस्ती जरी चाळ म्हणून ओळखली जात असली तरी प्रत्यक्षात महानगरपालिका हद्दीत अंदाजे पंचवीस तीस एकराहून अधिक जागेवर अस्ताव्यस्त पसरलेली गरीब वा निम्नमध्यमवर्गातील लोकांची गलीच्छ वस्ती होती. आजूबाजूच्या छोट्या मोठ्या कारखान्यातले रोजंदारी कर्मचारी,रिक्षाड्रायव्हर्स, खाजगी कंपन्यात काम करणारा कुशल कामगार याबरोबरच सरकारी ड वर्ग कर्मचारी क्वचित पांढरपेशा व माजी सैनिक इथे मोठ्या संख्येने रहात होते.हाताला काम नसणाऱ्या तरुणांचा भरणाही इथे होता.दिवसभर मटका जुगार खेळणारे,बीडी शिगारेट दारूच्या व्यसनात अडकलेल्या लोकांची संख्याही खूप होती.काही सिनेमा स्टाईल सडकछाप प्रेमवीरही इथे होते. खुलेआम आपापल्या मैत्रिणीना घेऊन गुण उधळणारे तरुणही आजूबाजूला होते.इथे प्रेमापेक्षा तारुण्यसुलभ आकर्षणातून लपून छपून एकत्र येणाऱ्या तरुणाईला पाहून इथे रहाणाऱ्या ...Read More

6

चाळीतले दिवस - भाग 6

चाळीतले दिवस भाग 6 पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून मी पुण्यात यायचो तेव्हा माझे बंधू आणि वहीनी बऱ्याचदा एक दोन दूरच्या नातेवाईकांकडे मला घेऊन जायचे. त्यातलेच एक चौरे नावाचे कुटुंब रास्ता पेठेत क्वार्टर गेट जवळ राहात होते.तसे त्यांच्याशी दूरचे नाते असले तरी माझे बंधू आणि त्यांचे खूपच घरोब्याचे संबंध होते.श्रीयुत चौरे पुणे स्टेशनजवळ पेशवेकालीन दप्तर सांभाळणाऱ्या सरकारी ऑफिसात नोकरी करायचे तर चौरे मावशी घरीच असायच्या.त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती त्यातला मोठा मुलगा फुटकळ नोकरी करायचा दोन नंबरचा मुलगा आणि मुलगी कॉलेजला जात होते. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायचो त्यांच्याकडून आमचे उत्साहात स्वागत केले जायचे.मावशीचा स्वयंपाकात हातखंडा होता.रास्ता ...Read More

7

चाळीतले दिवस - भाग 7

चाळीतले दिवस भाग 7दिवसेंदिवस माझे नागपूर चाळीतले मित्र संख्येने वाढत होते.अशोक शिर्केच्या खोलीत त्याच्या चुलत्याच्या ऑफिसात काम करणारा एक तरुण रहायला आला होता.शशीधरण नावाचा तो तरुण बॅचलर होता आणि माझ्यासारखाच स्वतः स्वयंपाक करून खायचा.या शशी ला वाचनाची आवड होती,जास्त करून इंग्रजी पुस्तकेतो वाचायचा.त्याला थोडेफार हिंदी बोलता येत होते.माझे आणि त्याचे बऱ्यापैकी सूर जमले होते.तो तांदळाचे विविध पदार्थ करायचा.आपल्याकडची भाजी भाकरी त्याला आवडायची. वेळ असेल तेव्हा दिलीप आणि अशोक शिर्के बंधू यांच्याकडची तांदळाची भाकरी आणि सुकी मासळी,शशीचा केरळी स्वयंपाक आणि माझी भाजी भाकरी आम्ही एकत्र येऊन मस्त गोपालकाला करून खायचो.सणासुदीला बाळू नितनवरेची आई मला हमखास पुरणपोळी खायला बोलावायची.त्या चारपाच वर्षात ...Read More