Chalitale Divas - 1 in Marathi Biography by Pralhad K Dudhal books and stories PDF | चाळीतले दिवस - भाग 1

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

चाळीतले दिवस - भाग 1

चाळीतले दिवस भाग 1

शिक्षणासाठी पुण्यात माझ्यापेक्षा मोठ्या बंधूकडे, (त्याला मी आण्णा  म्हणायचो) यायचे माझे स्वप्न होते.माझ्या दहावीनंतर दोन वर्षे ते स्वप्न मला हुलकावणी देत होते.आण्णा त्यावेळी एका नामांकित बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीत नोकरीला होता.

   बारावी झाल्यानंतर मात्र ते स्वप्न पूर्ण होईल असे वाटत असतानाच आण्णाला कंपनीच्या वतीने कुवेतला जाण्याची संधी मिळाली.तिकडे जाताना त्याने माझ्यावर त्याची नागपूर चाळीत असलेली झोपडीवजा खोली सोपवली.

 पुण्यात येरवडा जेल जवळच्या नागपूर चाळीत माझी रहायची सोय झाली.

  पुण्यात कोणत्या कॉलेजला जायचे हॆ आधी ठरवले नव्हते.बारावीत गट्टी झालेल्या आम्हा पाचसहा मित्रांनी एकत्र येऊन आम्ही कर्वे  रोडवर असलेल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला.राजेंद्र ढवळे, विकास लोंढे  आणि बाकी  दोन मित्र  कॉलेज जवळच्या  हॉस्टेलला रहाणार होते.त्यांच्या बरोबर रहायची इच्छा असली तरी माझ्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे मला ते शक्य नव्हते.

  मी येरवड्यात राहून गरवारे कॉलेजला जायला लागलो.

  पुण्यात आलो त्यावेळी मी पांढरा पायजमा आणि ढगळ पांढरा शर्ट घालायचो,पण आता कॉलेजला जायचे म्हणून आण्णाकडून पैसे घेऊन माझ्यासाठी कॉटनचे दोन पॅन्ट शर्ट शिवून घेतले होते.

    सुरुवातीला नागपूर चाळ ते डेक्कन जिमखाना हॆ अंतर मी पीएमटी बसने जायचा प्रयत्न केला,पण एक तर त्या काळी लोहगाव आणि विश्रांतवाडी साठी पीएमटी च्या बसेस संख्येने खूपच मर्यादित होत्या,शिवाय पुणे स्टेशनला उतरून बस बदलावी लागत होती. प्रवासात खूप वेळ जायचा,दुसरे म्हणजे बसने प्रवास करायचा तर दररोज जाऊन येऊन दीड रुपयाचा खर्च येणार होता आणि माझ्यावर तेव्हढा खर्च करणे आण्णाला शक्य नव्हते त्यामुळे त्याने मला नागपूर चाळीतल्या आल्बर्ट नावाच्या सायकल दुकानदाराकडून भाड्याची एक जुनी सायकल घेऊन दिली होती.नक्की आठवत नाही,पण त्यावेळी सायकलचे भाडे महिन्याला वीस रुपये असावे.

   आण्णा आखाती देशात गेल्यावर माझ्या वहीनी आणि छोटा पुतण्या पुणे सोडून लोणंदला माहेरी राहू लागले.

   त्या नंतर मी एकटाच त्या दहा बाय बाराच्या खोलीत राहू लागलो. अकरावी बारावीत असताना मी स्वतःची भाकरी करायला शिकलो होतो.इथेही मी जेवण स्वतः बनवून खाऊ लागलो.

   कॉलेज सकाळी लवकर असायचे त्यामुळे एक भाकरी आणि बेसणाची एक पोळी तयार करून व खाऊन बारा किलोमीटर सायकल दामटत मी घामाघूम होऊन कॉलेजची वेळ गाठायचो.दुपारी प्रॅक्टिकल्स असायची,ती उरकली की पुन्हा सायकल पळवत घरी यायचो.असा माझा दिनक्रम सुरु झाला.

   एकशे एक्यान्नव नागपूर चाळ येरवडा पुणे सहा असा सामूहिक पत्ता असलेली नागपूर चाळ म्हणायला चाळ असली तरी पुणे महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर ती येरवडा भागातली एक  मोठी गलिच्छ वस्ती होती.सरकारी जागेवर ज्याला जमेल तेवढी जागा व्यापून पत्र्याच्या किंवा प्लायवूड वापरून उभारलेल्या भिंती आणि वर मंगलोरी कौले असलेल्या हजारो अस्ताव्यस्त झोपड्यांची ही वस्ती होती.अनेक लोकांनी इथे स्वतःसाठी राहायची सोय करण्याबरोबरच खोल्या बांधून भाड्यानेही दिल्या होत्या.त्यातल्याच एका पवार नावाच्या माजी सैनिकाने बांधलेल्या चाळीत आमचा आण्णा भाड्याने रहात होता.

   सुरुवातीला विदर्भभागातून आलेल्या लोकांनी कदाचित या वस्तीचे नागपूर चाळ असे नामकरण केले असावे.प्रत्यक्षात मात्र इथे अठरापगड जाती व  धर्माची मराठी आणि परप्रांतीय लोकांची ही मिश्रवस्ती होती.

  आमच्या झोपडीच्या आजूबाजूला शिर्के, सपकाळ मोरे,सरनाईक,पवार,कळकुंबे, साळवी,कांबळे अशा मराठी आडनावे असलेल्या लोकांबरोबरच नायर,नायडू,शेख,फर्नांडिस,डिसोझा,पठाण अशी विविध आडनावे असलेली माणसे  गुण्यागोविंदाने राहात होती.आमच्या खोलीच्या पलीकडे माझ्याच वयाची अशोक शिर्के आणि दिलीप शिर्के अशी चुलतभावंडे एका खोलीत राहात.अशोक आयटीआय करत होता तर दिलीप वाडीया कॉलेजला शिकत होता.तिथेच जवळ नितनवरे कुटुंबं  रहायचे.बाळू  नितनवरे हा माझ्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहान असलेला मुलगाही आयटीआय करत होता.लवकरच शिर्के बंधू आणि बाळूशी माझी मैत्री झाली. दुपारी कॉलेजातून आल्यानंतर टाईमपास म्हणून तिथे रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलांच्यात मी गप्पा मारत उभा राहू लागलो. ही मुले तिथे कार्यरत असलेल्या छत्रपती शिवाजी मंडळाचे कार्यकर्ते होते.हळूहळू  याच मंडळाचा एक क्रियाशील सदस्य म्हणून वस्तीत माझी ओळख झाली.आमच्यापेक्षा वयाने आठ दहा वर्षाने मोठ्या असलेल्या गोपीनाथ वाळुंज, चंद्रसेन निकम आणि सर्जेराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आमचे मंडळ काम करायचे.साधारण पंचवीस तीस विविध वयोगटातले सदस्य आमच्या मंडळाचे कार्यकर्ते होते.

 (क्रमश:)-->--