सांग ना रे येईल का ती पुन्हा......?
काय सांगू मन माझं
गुंतू कशा मध्ये कळेना
घुटमळतोय आतून रोज हा
सांग ना.........
वाटा वेगळ्या जरी असे
मन तिच्या आठवणीत रमे
कुठे शोधू आता तिला
सांग ना..........
दुःख आता आपले वाटे
हास्य झाले परके कसे
अश्रू च्या धारा वाहत्या ह्या
सांग ना..........
उठताच तिच्या आठवणी ने
झोप रात्रीची लागे ना
विचारानं तुटलाय हृदय हा
सांग ना..........