प्रत्येक ऋतू सांगे जवळ तू हवा....
पाऊसात भिजता ना रूप हे तुझं
ओल्या चिंब केसाने बावरलं मन
अंगावरून थेंब हा धावतो कसा
होठांच्या कोनात लाजतो हा वेडा
हिवाळ्याची पहाट देई प्रेमाचा भास
धुकायची चादर सांगे आठवणी ह्या खास
थंडगार वातावरण वाटे जवळ तू हवा
अंगावरचे शहारे देई स्पर्श तुझा नवा
दिवस हा वाटे मोठा
उन्हाचा वारा सोसेना
आठवणीने तुझ्या झालो घायाळ
प्रेमचा गारवा घेऊन येशील का?