सहा मार्चपासून मातृभारती वेब पोर्टलवर माझी बी एड फिजिकल कॉलेज, कांदिवली ही मालिका सुरू झाली सदर मालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आज अखेर मालिकेचे आठ भाग प्रकाशित झाले असून आठ दिवसात३००० वाचक संख्या गाठलेली आहे.अजून दहा भाग क्रमशः प्रकाशित होतील. मला प्रेरणा प्रोत्साहन देणाऱ्या रसिक वाचकांचे मी मनापासून आभार मानतो हे प्रेम आणि जिव्हाळा असाच राहू दे.