पित्र देवो भव:
संस्कृतात एक म्हण आहे. मात्र देवो भव, पित्र देवो भव, गुरुर्देवो भव. पहिला देव म्हणजे आई. कारण आई ९ महिने बाळाला पोटात वाढवते.पोटात लाथ मारणारा बाळाला खूप कष्ट सोसून जगात आणते. नंतर सुध्दा, जर आई नोकरी करणारी नसेल तर, बाळाला आरामात संभाळते आणि वाढविते.स्वतः ला त्रास घेवून मूल मोठा व्यक्ती होईपर्यंत राबराब राबते.म्हणून तरी तिला देव म्हणतात.
पण, आई नोकरी करणारी असेल तर मात्र समस्या उद्भवतात. आपल्या पुरुष प्रधान भारतात, संसार चालविण्यासाठी लागणारे पैसे , बाप कमवितो.आई घर संभाळती.
काही उदाहरणे असे असतात की बायको नोकरी करून पैसे कमवती आणि नवरा बिजनेस करतो म्हणून घरी आराम करत असतो. असे कुटुंब पाहिलेली आहे. देव म्हणाला नवर्याला 'अरे बाबा, आरामात आयुष्य घालू नको. बस झाला आराम. आत्ता थोडा चांगले कर्म कर.माझ्या या बाळाला मोठा कर.' असे म्हणून देवाने त्या जोडप्याला एक सुंदर मूल दिले. लग्नानंतर २० वर्षानी झालेल्या या मुलाला नीट संभाळून मोठा करणे, हा २५ वर्षाच प्रोजेक्ट त्या जोडप्याला मिळाली.
त्या बापाच काम किती अवघड असते, पुढे वाचून समजेल. बाळ जेंव्हा आईच्या पोटात होता, ८व्या महिन्यात च दवाखान्यात जावे लागले कारण आईला हाय बीपी चा त्रास होता. डॉक्टर नी सांगितले होते की २०० चा वर बीपी झाली की दवाखान्यात अड्मिट करा. सीजरिंग करून बाळाला बाहेर काढाव लागले.
मुलगा झाला म्हणून आनंद एकीकडे, बाळाची तब्येत नाजूक म्हणून काळजी दूसरी कडे. बाळाच हार्ट मध्ये प्राँब्लेम म्हणून इन्कुबरेटर मधे १२ दिवस ठेवावे लागले. नंतर घरी आणले. आई भित्री, म्हणून बापाला च दवाखान्यात बाळाला घेवून जाणे व आणणे करावे लागले. बाळा चा मान धरे पर्यंत बापालाच बघायला लागला, कारण तो घरातच होता. बाळाला दूध पाजविणे, स्पंज करणे, शू आणि शी झाल्यावर बाळाला स्वच्छ करून पावडर लावणे, लंगोट बदलणे, कपडे बदलणे हे सगळे काम बापच करत होता, आई नोकरी करत होती.
दिवस जात होते. बाळ वाढत होता. बापरूपी देवाचे क्रपेने. आई घरी असताना होईल तेवढे मदत करायची. बाळ आत्ता रांगणे न करता चालायला लागला. चालताना पडायचा, बाबा पळत पळत रडणारा बाळाला उचलून कडेवर घ्यायचा. बाळ हळूहळू बोबड बोलायला लागला. बाळाच्या प्रत्येक क्रिया मधे आनंद मिळत होता, त्या आई बाबाना.
असा संसारात, जिथे आई नोकरी करती तिथे बापलाच आईचे काम करावे लागतात. धन्य तो बाप.
येथे मात्र, वरचे म्हण असे बदलून म्हणावे लागेल,
पित्र देवो भव, मात्र देवो भव, गुरुर्देवो भव.