मिठी
ओल्या मिठीतली
फुले सुगंधी
माळ तू
गजरा प्राजक्ताचा
याद माझी
वेडे गुलाबी
भासेल तुला
परिमळ माझा
महफिल रंगली
आता लाज कसली
धुंद होऊ दे
येऊ दे उधान
सांग प्रीतीला
बेधुंद सागराला
तू माझी
तुझाच मी
ना कळे आता
काही मला
नशा कसली
सांग असली
आता कुठे
होष कुठला
तुला ना मला
जाग नाही
भान नाही
अंतर ते
आता कसले
वळीव बरसला
बघ क्षण रे
अधीर मिलनाला
© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील 'मवि'
९४२२९०९१४३
©sanjweli.blogspot.com