शांत आज सागर का?
"शांत आज सागर का ?
गेली कुठे पाण्याची अवखळता,
पुनवेचा चंद्र पहिला,
रवीतेजाची सुंदरता,
ते बागडणे निरागस कुंतलांचे,
मनमोहिनी ! स्मितहास्यात लोपली का गूढता?
सागराची भाषा तुझ्या डोळ्यानेच जाणावी,
बघ! तुझ्या ओढीने त्याला ही भरती यावी!!!
आभाळ जेथे टेकलेले,
ते क्षितिज तुझ्याकडे पाहे,
बोले! भाव तुझ्या डोळ्यातले,
ओळखून मी आहे,
बघ ! या लता या वेली,
आहेत किती अबोली,
अंगणात माझ्या फुलूनही,
त्यांना वाचा का नाही आली.
©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३