प्रीती
भ्रमर ही पडला बळी,
नाही उत्तर कोणते प्रीतीला,
भाषा अवखळ डोळ्यांची,
सांगा कळते येथे कुणाला
नशा नावाची सांगाती,
सांगा आहे का कोणाला,
बेफिकीर सारी जिंदगानी,
वाहीली याच मोहाला,
रंगरंगीली अनजान मदहोशी,
कैफियत सांगु कशी कुणाला,
महफ़िल तीच रोजची,
नाही उपाय जालीम या औषधाला,
सौंदर्य तेच लाघवी,
कामदेव शरण तो रतीला,
आर्तता ओढ तीच अवीट गोडी,
जो तो याच गर्तेत बुडाला,
मरणाची उरली कुठली भीती,
जगण्याचा मोहपाष तो कुठे उरला,
दिव्यावर झेप पतंगाची,
असीम आतुर तो मिलनाला.
© म.वि.