#KAVYOTSAV -2
#खेळी_आयुष्याची
रोजचाच मी तरी स्वत:ला नव्याने पाहतो
हरलो कित्येकदा तरी शर्यतीत नव्याने पाहतो
जाळून आलो होतो चिता भंगलेल्या स्वप्नांची
पून्हा त्याच स्वप्नांना नव्याने रंगवून पाहतो
नशिबाचे नि माझे गुण कधीच जुळले नाही
तरीही नशिबाला नव्याने आजमावून पाहतो
सरळ वाटॆनॆ करीत आलो प्रवास आयुष्याचा
आता थोडा आडवाटॆने चालून पाहतो
तेच चंद्रसुर्य, तेच आकाश अन मी ही तोच असणार
फक्त आयुष्याची खेळी नव्याने खेळून पाहतो
चंद्रकांत शास्त्रकार