एकदा एका भक्ताने श्रींना विचारले, "दत्ताला अवधूत कां म्हणतात ?' त्यांचा अवतार कशासाठी झाला ?" त्यावर श्रीमहाराज म्हणाले, "अवधूत म्हणजे विरक्त म्हणजेच विषयांचे, प्रपंचाचे प्रेम नसलेला, दत्ताचा अवतार साधकांसाठीं झाला दत्तावतार ब्रह्मा, विष्णू, महेश मिळून झाला आहे. म्हणजे त्यांचे ठिकाणी सत्व, रज, तम गुणांचा मिलाफ आहे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी यापैकी एक गुण प्रामुख्याने असतो. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला दत्तोपासना जास्त जवळची वाटते. दत्तोपासना करणारे लोक पुष्कळ असतात. रामाचा अवतार कर्तव्य कसे करावे हे दाखविण्यासाठी आहे, क्रुष्णाचा अवतार जीवन प्रेमाने कसे भरावे यासाठी आहे. दत्ताचा अवतार साधकाने विरक्तीने श्रीमंत कसे व्हावे हे शिकविण्यासाठी आहे. मागण्याची बुद्धि नाहीशी कर हेच मागणे दत्ताला मागावे. उपासना कोणत्याही सगुण रूपाची असली तरी ती एकाच भगवंताला पोचते, म्हणून जी ज्याची उपासना ती त्याने मनापासून करावी. गुरू, त्याने दिलेले नाम आणि भगवंत तिन्ही एकरूपच असतात. दत्त म्हणजे दिलेले, गुरू नाम देतो,नाम गुरूरूपच असते. नामांत गुरूला पाहणें हाच परमार्थ. भगवंताचे नाम घेऊन त्याचे सतत अनुसंधान ठेवावे व त्याला शरण जावे . ??????
श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय
????????