बंध नात्याचे
साथ तुझ्या प्रेमाची...
आस तुझ्या येण्याची...
सतावते माझ्या मनी...
तूच माझा प्रिय धनी...
मनी माजतो तुझ्या प्रेमाचा काहूर...
तुझ्या भेटीसाठी मनात होते हुरहूर...
यावेस तू जवळी आणि मी बिलगावे अलगद तुला...
तुझ्या आठवणींचा मनी झुलतो मग तो झुला...
ध्यानी मनी असावा फक्त तुझाच विचार...
तुज विन जगणे ही मज नाही सोसणार...
अखंड वाहुदे तुझ्या प्रेमाचा झरा माझ्या आयुष्यात...
मग नाही मी रमणार माझ्या त्या भूतकाळात...
कधी जुळणार आपल्या या नात्याची दोर...
कधी होईल ते गोकुळ माझे घर...
तूच हो माझा सखा साजणा...
मीच होणार तुझी सखी साजणी...
- जुही भोईर