####Good morning!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" श्री गुरु नानक जयंती "
------------------------------
*आज गुरुनानक जयंती*
गुरुनानकांनी १४ व्या शतकात शीख धर्माची स्थापना केली होती. त्याचा जन्मदिवस म्हणजे ‘गुरुनानक जयंती’ होय.
शीख धर्मात एकूण दहा गुरू झाले त्यापैकी गुरुनानक हे शीखाचे धर्मसंस्थापक आणि पहिले गुरू होते. तर गुरू गोविंद सिंग हे दहावे गुरू होते.
शीख या शब्दाचा अर्थ होतो की, शिष्य.
शीख धर्मात दहा गुरू झाले यानंतर गुरू का घडले नाही, हा प्रश्न लोकांना पडलेला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे गुरू गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांना गुरू ग्रंथसाहिबा या ग्रंथालाच गुरू मानायला सांगितले होते. त्याप्रमाणेच शीख बंधू गुरू ग्रंथसाहिबा ग्रंथाचा उपदेशच सर्वस्व मानतात. शीख बांधवाच्या गुरू ग्रंथसाहिबा या ग्रंथात वारकरी पंथांतील नामदेव महाराजांचे काही अभंग पाहायला मिळतात. त्यांनी केलेल्या प्रवचनांचा काही भाग गुरू ग्रंथसाहिबामध्ये पाहायला मिळते. शीख धर्माची शिकवण खालीलप्रमाणे आहे.
» देवाला हृदयात ठेवा.
» प्रामाणिकपणे जगा आणि भरपूर कष्ट करा.
» सर्वाशी समान वागा.
» दुस-यांची सेवा करा.
» दैवावर जास्त विश्वास ठेवू नका.
» श्रमाला देव माना.
गुरुनानकांनी अनेक शीख बांधवांना जगण्याची दिशा दिली. आपला धर्म फक्त आपल्यापुरता मर्यादित न ठेवता जो कोणी वरील नियम आणि शिकवण पाळेल, त्याला धर्माचा अनुयायी बनता येईल, असं त्यांनी सांगितले होते.
गुरुनानकांनी शीख धर्माची स्थापना केली आणि मानवपिढीचा उद्धार केला. त्यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी झाला होता.
पण कार्तिक पौर्णिमेला त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. कारण ग्रागोरियन दिनदर्शिकेनुसार त्यांच्या जन्माचा महिना इंग्रजी दिनदर्शिकेत नोव्हेंबर महिन्यात येते. त्याचा जन्म पौर्णिमेच्या तिथीला झाल्यामुळे नोव्हेंबर म्हणजे मराठी महिना कार्तिक या मासात त्याची कार्तिक पौर्णिमेला जयंती साजरी केली जाते.
गुरुनानकांबरोबरच काही शीख बांधव नामदेव महाराज हे त्याच्यासाठीच जन्माला आले होते असं सांगतात, कारण गुरुनानकांनी धर्माची स्थापना करून माणुसकीची कास धरायला शिकवली पण नामदेव महाराजांच्या कीर्तन प्रवचनामुळे ही शिकवण आचरणात आली. कबीर महाराज एके ठिकाणी गुरू कसा असावा, याचं वर्णन करतात
। गुरू तो गुरू ऐसा होय जो शिष्य से कछु ना लेत।*
। और शिष्य तो शिष्य ऐसा हो जो सब कुछ गुरू को देत ।
कबीर महाराज या ठिकाणी गुरू शिष्याचा संबंध सांगतात ते म्हणतात गुरू असा असावा, जो शिष्याकडून काही घेत नसेल नाही तर आज समाजात भरपूर बोगस गुरू झालेले आहेत.
मग तुम्हाला प्रश्न पडलेला असेल नेमकं गुरू कोणाला म्हणायचे, याचं ही उत्तर संतांनी अभंगातून दिलं आहे.
। देव दाखवी देव दाखवी ऐसा नाही गुरू।
। जेथे जाय तेथे दगड शेंदरू ।
संत म्हणतात, देवाचं नाव सांगून जो देव दाखवतो, असं आश्वासन देतो अशा व्यक्तीला कधीच गुरू करून घेऊ नका कारण गुरू देव दाखवत नाही तर गुरूच देव आहे, असं संत एका ठिकाणी म्हणतात,
। गुरूचरणी ठेविता भाव। आपोआप भेटे देव।
। म्हणोनि गुरूसी भजावे। रूप ध्यानासी आणावे।
। देव गुरूपाशी आहे। वारंवार सांगू काय।
। तुका म्हणे गुरू भजनी। देव भेटे जनीवनी।
तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला देव पाहायचा आहे, त्याने गुरू करावा, म्हणजे गुरूलाच देव मानावे. त्यामुळे शीख बांधवांची शिकवण आहे की,
दहा गुरूंनंतर फक्त गुरू ग्रंथसाहिबा या ग्रंथालाच गुरू माना. कारण नानकांनी सांगितले होते, गुरूंशिवाय मार्ग नाही. ज्याला गुरू नाही त्याला जगून फायदा नाही त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरू असणे गरजेचं आहे.
प्रवचनकार, ह.भ प.
सौ.सोनालीताई महाराज मोरे-कापसे
मो.7038920920