विरक्ती
विरक्त मी विरक्त
चिंतांनी सदैव त्रस्त
विचारांत मी ग्रस्त
सुखाच्या वाटेवर,
डोळे घालीती सदा गस्त.
तरीही मी विरक्त
उलटवून प्रेम तख्त
काळीज माझे सख्त
अपेक्षांचे जाळे विणते,
दिल माझे कंबख्त
विरक्त मी विरक्त
अविरत सुख लोलुप्त,
वैभवासाठी आसक्त.
जाळतो माझेच रक्त
माझ्याच प्रेमात मी युक्त
तरीही मी विरक्त.
हास्य मुखावरुन लुप्त
भावना माझ्या साऱ्या सुप्त
आनंद झाला कुठे गुप्त
मी होणार कधी तृप्त..?
तरी खरच का मी विरक्त..?
मी विरक्त....मी विरक्त....!