‘जगावेगळी ही माया!’
बालपणी मी बाबांना घाबरायचो,
त्यांच्या हाकेला धावत जायचो,
आज एक कुष्ठरोगी दारात येतो,
माझी जीवनसंगिनी त्याला प्रेमाने जेवू घालते!
तो मला ‘बाबा’ म्हणतो, नमस्कार करतो,
मन माझे त्या क्षणी भरून येते,
काय म्हणावे या नात्याला,
माणुसकीच्या या प्रेमळ भावनेला!
जगावेगळी ही माया,
नकळत जुळते नाती,
प्रेमाने दिलेल्या घासामध्ये,
माणुसकीची फुलते ज्योती!
दि. 28 ऑक्टो. 2026.
— प्रा. डॉ. विनोद राऊत,
से. नि. प्राध्यापक,
अमरावती.