Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

प्रिय शाहरुख...
आज तुझा वाढदिवस 🌹
तुला प्रिय म्हणायला काहीच हरकत नाही
एक तर तू आमच्या पुढच्या पिढीतला
त्यात आवडता...
त्यामुळे हे एकेरी संबोधन..❤️
तशी तुझ्या अभिनयाची उंची आभाळाला टेकली आहे
Tv च्या छोट्या पडद्यावरून
मागे कोणतीही पार्श्वभूमी नसताना
जी मुसंडी मारलिस त्याला तोड नाही
असंख्य ठिकाणी भरपूर मदत करणारा ज्याचा अजिबात गवगवा नाही..
Korona काळात तू स्वतःचे घर आणि सर्वांना मदत ही पुरवली आहेस
हाकला हिरो म्हणून ओळखला जाणारा तु लिलया बाहेर पडून अँटी हिरो म्हणून अनेक पिक्चर केलेस
तुझ   गालाला खळी पाडत  रोमँटिक दिलखेचक हसणे
अँटी हिरो च्या भूमिकेत तितकेच अंगाचा थरकाप उडवणारे वाटले
पत्नी गौरी सोबत संसार करताना आपल्या मुलासोबत तू पूर्ण गृहस्थी आहे
या मायावी इंडस्ट्री मध्ये कधीच कुठल्या हिरोईन सोबत तुझे लफडे ऐकिवात नाही
कुठल्याच गोष्टी वर तुझ्या काहीच कमेंट दिसत नाहीत
मुलगा ड्रग्स केस मधे अडकला तेव्हाही तू शांत राहिलास
कुणा मंत्री संत्री ची जीजी केली नाहीस
हे तुझ्या संयमित मनाचे लक्षण आहे
साठी नंतरच्या वयात सुद्धा आपल्या मुलीच्या वयाच्या हिरोईन बरोबर तू काम करतोस
इतका फिटनेस तू ठेवला आहेस
सदैव मितभाषी अर्थात वेळ पडली तर विनोद सांभाळत बोलणे
याचे श्रेय तुझा वाचन वेड्या स्वभावाला द्यायला लागेल कारण
तुझ्या हॉल मधे मोठ्या टीव्ही च्या जागी
मोठे पुस्तकांचे कपाट आहे असे मुलाखतीत ऐकले आहे
आजपर्यंत प्रत्येक पिक्चर मधील प्रत्येक वेगवेगळी भूमिका साकारताना त्या मागे ती घेतलेले कष्ट दिसून येतात
माय नेम इज खान तुझ्या अभिनयाची कमाल होती
तुझा D D L J चित्रपट तर अक्षरशः तुझ्या शिरपेच म्हणावा लागेल..
या चित्रपटांत तू अतिशय सुंदर असे सगळे युरोप दर्शन घडवले
ज्यांनी युरोप पाहिला नाही त्यांच्या मनात युरोप पाहायची इच्छा निर्माण झाली
प्रेयसीच्या शोधात पार तिच्या घरापर्यंत जाणारा हिरो...
त्या पिढीचा आयकॉन ठरला
अनेक प्रेमकहाण्या या चित्रपटामुळे घडल्या आणि यशस्वी झाल्या
ती पिढी तुला विसरूच शकणार नाही
अगदी आमच्या पिढीला सुद्धा या सिनेमाने वेड लावले
स्वित्झर्लंड इथे बर्फात तुझे आणि काजोल चे कट आउट लावलेत
त्या सोबत फोटो काढायला झुंबड उडते
आम्हीही त्यात होतोच..
तुझ्या अनेक भूमिका विषयी लिहायच म्हणले तर वेळ कमी पडेल
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎉
असेच अनेक वेगवेगळ्या भूमिकेतून आम्हाला भेटत रहा..
स्काय इज द लिमिट फॉर यू..

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112040468

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now