नातं मैत्रीचं...
शब्दांशिवाय जे समजून घेते,
ते सुंदर नातं मैत्रीचं असते..
सुख-दुःखाच्या प्रत्येक वळणावर,
जे खंबीरपणे पाठीशी उभे राहते..
कधी भांडण, कधी हसणे-रुसणे,
पण मनातून कधीही दूर न जाणे..
कठीण प्रसंगीही साथ न सोडता,
आयुष्याचा प्रत्येक क्षण जपणे..
पैशाने कधी मैत्री मोजता येत नाही,
आणि ती बाजारात कुठे विकत मिळत नाही..
लाखो माणसे भेटतील जगात,
पण खऱ्या मित्रासारखी सावली कुठे लाभत नाही.. 💯