ओंडका
एकदा असाच outing साठी resort ला गेलो असतांना सकाळी सकाळी सर्वत्र शांतता होती आणि mood fresh होता. तेथे दरी मधून झरा वहात होता. स्वच्छ निर्मळ पाणी होत. पाण्याचा खळखळाट soothing होता. इतक्यात माझे लक्ष पाण्याच्या प्रवाहात वाहणाऱ्या छोट्याशा एका ओंडक्या कडे गेलं.
प्रवाहाच्या हींदकोळ्यात त्या ओंडक्याच्या हालचाली म्हणजे एका आनंदात बागडणार्या हरणीच्या पाडसा सारख्या मोहक होत्या. बघून खूप आनंद झाला.
पण एक विचार आला की ह्या अल्लड, मोहक हालचाली मागे पाण्याच्या प्रवाहातील अडथळे, खाच खळगे जबाबदार आहेत पुढे जाऊन जसा प्रवाह मोठा होईल तसा हाच ओंडका पुढे वेगवान होईल आणि काही काळासाठी ह्याचा अल्लड पणा कमी होऊन एक पोक्त जबाबदार व्यक्ती प्रमाणे धीरगंभीर वाटेल. असाच काही काळ आणखी गेल्यावर हळूहळू हा ओंडका प्रवाहाच्या कडेकडेला ढकलला जाईल आणि शेवटी कुठेतरी गाळात अडकून पडेल, लाटांबरोबर बाहेर पडायचा प्रयत्न करील पण शेवटी हतबल होऊन पडून राहील नंतर त्याच्यावर कीडे आक्रमक होतील आणि काही काळानंतर त्याचा भुगा भुगा होऊन संपेल आणि मग तो पाण्यात विलीन होऊन जाईल आणि त्याचं अस्तित्व संपेल.
मानवी जीवनाची कथा सुद्धा काय ह्या ओंडक्या प्रमाणेच नसेलना ? आपलही जीवन असेच काळाच्या प्रवाहामुळे अल्लड बालपण, गंभीर व जबाबदार प्रौढत्व आणि शेवटी helpless व्याधीत जखडलेल वृद्धत्व ह्या टप्प्यातून व्यथित होऊन अंततः काळात विलीन होत असेल ?