Marathi Quote in Poem by Anamika Shakti

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

वाट मोडूनी घ्यावी की, पुन्हा प्रेमात पडावे?

सांज पहाटेच्या वेळी,
आठवावे जुन्या आठवणी,
की विसरूनि सारे,
लिहावी नवी कहाणी?

गोड गुलाबात त्या,
पहावे सौंदर्य तुझे,
की राहूनि वास्तवात,
सहावे काट्यांचे टोचणे?

चंद्राच्या त्या शीतलतेत,
स्मरावे तुझे स्मितहास्य,
की पाहूनि सूर्याकडे,
नव्या प्रकाशात पुन्हा उमलावे?

बुद्धीला हे वागणे पटेना,
ह्या हृदयाला तुझ्याशिवाय काहीच दिसेना.

सांग ना,
वाट मोडूनी घ्यावी की,
पुन्हा प्रेमात पडावे?

वाट मोडूनी घ्यावी की,
पुन्हा प्रेमात पडावे?

Marathi Poem by Anamika Shakti : 112038303
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now