एकटाच आहे
एकटाच आहे रस्ता, एकटाच हा प्रवास आहे,
सोबत कोणी नाही, पण सोबत माझा ध्यास आहे.
लोकं निघून गेली, वळून पाहिलं नाही कुणी,
मी मात्र थांबलो नाही, कारण थांबणं हा त्रास आहे.
खिशात नाही काही, हातात फक्त लेखणी आहे,
ह्याच लेखणीतून उद्या, माझं अख्खं जगणं आहे.
आज एकटा आहे, पण एकटाच राहणार नाही,
जो लढतो अंतर्मनाशी, तो कधीच हरणार नाही.