॥ दुर्गसेवक ॥
विचारांचे रूप हे आदर्श शिवरायांचे,
रायगड देखुनी अश्रू पाणावले डोळ्यांचे ।।
माणिकखांब हेच बघा माझे जन्मस्थान,
त्रिंगलवाडी अन् कावनई वाढविती इगतपुरीची शान ।।
पाहुनी उंच आणि दुर्गम तो गड हरिहर,
उंचावले स्थान महाराष्ट्राचे या भूमीवर ।।
रामशेज किल्ला पाहता काळजात भरे राणा,
अजिंक्य हा गड असे, मनोमन तुम्ही जाणा ।।
त्र्यंबकगड अन् माहुलीगड मनाला हे मोही,
गोरखगड, भैरवगड पाहुनी तृप्त होई देही ।।
पन्हाळगडाची ती शौर्यगाथा आजही गाजे,
प्रतापगडावर चमकते तेज शिवरायांचे साजे ।।
सागराच्या छातीवर उभा तो जंजिरा अफाट,
पद्मदुर्ग पाहुनी वाटे शिवशाहीचा थाट ।।
असे सुंदर हे किल्ले पाहतच राहावे डोळा,
दुर्गसेवक बनूनी जपला इतिहासाचा सोहळा ।।
कवी :-
श्री. दशरथ कृष्णा चव्हाण
(सह्याद्रीचे दुर्गसेवक)
- Dasharath krushna Chavan