अर्थ
आयुष्यभर जगत राहतात
केवळ बाळगून स्व स्वार्थ
कसा कळावा मुर्खांना त्या
मानवजीवनाचा खरा अर्थ
जगतात फक्त स्वतःसाठी
नाती तोडती अहंकारपोटी
आयुष्यभर केवळ पैसापैसा
जगणे शेवटी त्यांचे ते व्यर्थ
निघून जाते आयुष्य उमेदीचे
कळतो ना सुखाचा मतितार्थ
शेवटच्या दिवसात कुचकामी
कळून निरोपयोगी जीवनार्थ
वेळीच होऊन सावध जगावे
आनंदी मानव जीवनासाठी
होऊन जाईल जगणे सार्थ
येईल या जीवना खरा अर्थ
प्रल्हाद दुधाळ