Marathi Quote in Poem by Vrishali Gotkhindikar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

तुझ्या अवती भवती वावरताना..मी खुप "सजग" असते रे..
तुझ्या आवडीची गाणी....तुझ्या आवडीची पुस्तके...
तुझ्या आवडीचे विषय...आणी बरच काही...
मात्र फक्त तुझ्याच आवडीचे...!!!!!
तुझ्या नावडत्या कोणत्याच गोष्टीमुळे..
आपल्या संवादाचा.."विसंवाद" होवु नये असा माझा प्रयत्न ..
फक्त तुझ्या आवडीतच मी माझे अवघे विश्व.."संकुचित "करते
तसे तर आजुबाजुला बरेच असतात...
माझे मन हरघडी जपणारे...
पण मी मात्र कुठल्याच.".लौकीक नात्यात " न बसणारी..
आपली "मैत्री" जपायला पहात असते..!
हे सारे काही घडत असताना तुला मात्र याची खबरही नसते...
तु असतोस आपल्याच कोषात गुंग..आणी रमलेला..!!!

..................... वृषाली.

Marathi Poem by Vrishali Gotkhindikar : 112034499
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now