Marathi Quote in Poem by Anu

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

स्वप्नांना पंख दे.....

कधी वाटतं थांबावं,
सगळं काही सोडून द्यावं,
पण मन हळूच सांगतं,
एकदा पुन्हा प्रयत्न करावं.

रस्ता कितीही कठीण असो,
पाऊल मात्र थांबू नये,
नशिबाने साथ दिली नाही,
म्हणून स्वप्नांनी रुसू नये.

आज अपयश मिळालं म्हणून,
उद्याचं आकाश काळं नसतं,
एक छोटंसं स्वप्नही कधी,
आयुष्य बदलून टाकतं.

डोळ्यांत स्वप्नं ठेव,
मनात विश्वास ठेव,
पडलीस तरी पुन्हा उठ,
आणि स्वतःवर विश्वास ठेव.

कारण जिंकणारे तेच असतात,
जे हार मानत नाहीत,
स्वप्नांच्या त्या वाटेवर,
शेवटपर्यंत चालत राहतात.

Marathi Poem by Anu : 112034312
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now