मास्तर
मास्तर ,पोराले शाळेत आणलं
म्या अडाणी अक्षरांचा दुश्मन
पर ही कोरी पाटी आता तूह्या हाती
जमलंच तर घडीव एखांदा गांधीबाबा
तसं हे लयच अवघड काम मास्तर
सत्य, अहिंसा या मुलखातून
कवाच हद्दपार झाली झाली
खोट वर आलं ,ख-याच्या कपाळी बालंट आल
मास्तर ,शिकिव त्याला लढण आणि झगडण
एकला चलो रे म्हणत ठाम उभे राहण
खोट्या झगमटापेक्षा,गरीबीची लक्तरे बरी
वाकलेल्या मानेपेक्षा, ताठ मान खरी
मास्तर, आता तूच आशा आमची
म्हणून पोराले आणलं तूझ्या दारी
आजचा भारत दिला तूह्या हाती
सांभाळ त्याले तूच आता सारथी
बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026