संपली सारे नाते आणि आस ही जळली
शेवटच्या संवादाची वेदना प्रिये आज मला कळली
भरून आलं मन माझं जे तुझ्यासाठी झुरत होत..
निरोप लग्नाचा मिळाल्यावर हळू हळु मरत होत
नष्ट झाले स्वप्ने सारी आणि जे स्वप्नांच घर साजलं होत
कधीच साथ सोडणार नाही म्हणणार पाखरू माझं दुसऱ्या साठी नटलं होत.....
कस सावरू स्वतःला मी ह्या हळव्या क्षणाला
कस जोडू सांग प्रिये मी या तुटलेल्या मनाला
आतून बाहेरून रक्ताळला हा प्रियकर तुझा
कस जपू तुझ्याविना मी या अपूर्ण जीवाला..
जास्त काही तक्रारी नाहीत माझ्या ,एका प्रश्नाच उत्तर देशील का
जिवापाड प्रेम करणारा मी प्रियकर तुझा आठवणीत मला घेशील का
माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची पात्र आहेस तू
या आयुष्याच्या वाटेवर पुन्हा फिरून येशील का...
सुखी संसाराची पाहिलेली स्वप्ने सारी नष्ट झाली
काही आवडत्या इच्छांपैकी तू एक आवडती अपूर्ण इच्छा राहिली,
तुझ्याशिवाय कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नव्हती तुझ्याकडून
कारण मी माझ्या घरची लक्ष्मी सुद्धा तुझ्याच रूपात पाहिली...
जवळ नसली जरी तू माझ्या आठवण मात्र कायम राहील
आयुष्यात येणार नाही तू माझ्या परत तरीपण वाट तुझीच पाहिल ,
ह्या आठवणींशिवाय दुसर काही नाही तुझं माझ्याजवळ
पण एक शेवटची आठवण म्हणून मी माझ्या मुलीच नाव तुझ्याच नावानं ठेवील.....
प्रिये तुझ्याच नावानं ठेवील
..........ओम सोनवणे