स्त्री...
स्त्री हे केवळ नाही रे अक्षर
तिच्याविना शून्य अवघे चराचर
कौसलेचा राम आणि यशोदेचा श्याम आहे
राधेविना कुठे कृष्ण, घनश्याम आहे
जिच्या प्रेमासाठी भुकेला ईश्वर
तिच्याविना शून्य अवघे चराचर
आई, पत्नी, मुलगी, बहीण
शक्तीपीठ साडेतीन
धडधाकट पुरुषही अपूर्ण रे जिच्याविन
सासर, माहेर असेच नाते
नाही स्वतःचे रे घर
तिच्याविना शून्य अवघे चराचर
ती नसली तर अवघे ब्रह्मांड हे व्यर्थ
तिच्यावीना वांझोटा अवघा पुरुषार्थ
प्रेमाचेच जगी उधळते अत्तर
तिच्यावीना शून्य अवघे चराचर
~ शितल महादाने पडोळे